पाब्लो पिकासो
विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून गौरव केलेला चित्रकार म्हणजे पाब्लो पिकासो. ह्या स्पॅनीश चित्रकाराने विसावे शतक आपल्या कुंच्यल्याच्या जोरावर प्रचंड गाजवले. सहजच कुतुहल म्हणून पिकासोची चित्रे जालावर धुंडाळत असताना एक गोष्ट लक्षात आली. पिकासोची सुरुवातीची चित्रे आणि शेवटची चित्रे ह्यात खूप फरक आहे. सुरुवातीला बर्यापेकी (मझ्या सारख्या ह्या कलेतल्य ढ लोकांना) समजणारी चित्रे नंतर नंतर अधिक कठीण होत जातात आणि शेवटची काही चित्रे तर इतकी ऍब्स्ट्रॅक्ट आहेत की त्यांना चित्रे का म्हणावे हेच मला कळत नाही. उदा.
हे पिकासोचे पहिले (प्रदर्शान लावलेले) चित्र..पिकासोच्या कुंचल्यातील ताकद त्याच्या ह्या पहिल्या चित्रातुनच दिसते.
नंतर नंतरची काही (साधारण विसाव्या दशकातली) ऍब्स्ट्रॅक्ट चित्रे फारशी समजत नसली तरी त्यात काहीतरी गंमत आहे हे मात्र नक्की जाणवते..आपल्या शास्त्रीय संगीता सारखे..फारसे कळत नसले तरी हा काही तरी भारी ऐकतोइ आहोत असे जाणवते
पण इथे मात्र दोर हातातुन सुटतो आणि पिकासोच्या चित्रांशी असणारा धागा पूर्णपणे निसटतो. ही चित्रे अतिशय गाजलेली असून पिकासोने काढलेल्या शेवटच्या चित्रांपैकी आहेत. (त्यातील डाव्या बाजूचे चित्र त्याचे सेल्फ पोर्ट्रेट आहे) खरंच काय असावं बरं असं ह्या चित्रांमध्ये? उपक्रमावरच्या अनेक चोखंदळ/रसिक वाचकांची ह्यावर मते जाणुन घ्यायला आवडतील.
Comments
क्युबिझम
त्याने क्युबिझम या नावाची काही शैली विकसित केली. (http://en.wikipedia.org/wiki/Cubism). ते नक्की काय ते जाणकारच सांगतील. आणि असेही ऐकले आहे की सरते शेवटी त्यालाच त्या क्युबिझम मधला वैयर्थ जाणवला असेही ऐकले आहे. (खरे खोटे माहित नाही ).
पण त्याची त्या खास शैलीतली चित्रे पाहताना बावचळायला होते. मला तर नंतर नंतर माझे डोळे आणि गाल याम्चीच आदलाबदल झाली आहे की काय असे वाटून आरशात पाहून खात्री करावी वाटते :)
पं वसंतराव देशपांडे यांच्या गाअयकीबद्दल बोलताना पुल म्हणाले होते की ' मी काढतो ती चित्रकला असा पिकासोला जसा विश्वास होता तसा मी गातो त्याला लोक गाणे म्हणतील असा वसंतरावांना विश्वास होता. ' यावरुन पिकासो महाशयांनी कलेच्या क्षेत्रात काही मोठी क्रांती केली होती असे वाटते. जाणून घ्यायला मालाही आवडेल.
-- लिखाळ.
क्युबिझम
चित्र नं.२ आणि ३ हे क्युबिझमचेच नमुने आहेत.
यावरुन पिकासो महाशयांनी कलेच्या क्षेत्रात काही मोठी क्रांती केली होती असे वाटते
असेच मलाही वाटते. इतकी मोठी क्रांती झाली ती आपल्याला थोडी देखिल समजू नये ह्याचे वैषम्य देखिल वाटते!..म्हणूनच हा खटाटोप..
धन्यवाद लिखाळराव!
हा हा हा..मस्त!!
जी एंच्या लेखनात वाचलेले हे वाक्य आठवले,
'पिकासो, तुला जर खरंच सगळं जग असं दिसतं तर ते कागदावर चितारतण्यापेक्षा स्वतःला एखाद्या डॉक्टरला का नाही दाखवुन घेत? '
मूळ वाक्य वेगळे आहे..पण साधारण अर्थ असाच आहे.
सुंदर
सुंदर विषय आहे. मीही या कलाप्रकारात ढ वर्गात असल्याने जाणकारांची मते जाणून घ्यायला आवडतील. मध्ये बीबीसीवर लाइफटाइम ऑफ अ मास्टरपीस नावाच्या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्याला एका प्रसिद्ध चित्राची ओळख करून दिली जात असे. दुर्दैवाने यातला पिकासोवरचा कार्यक्रम बहुधा चुकला. पण एक मात्र खरे. जाणकारांनी बोटाला धरून चित्रांमधील वैशिष्ट्ये सांगितली तर त्यात गोडी वाटायला लागते.
क्युबिझम आणि ऍबस्ट्रॅक्ट आर्टबद्दलही उत्सुकता आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
वाटले
(खरं सांगायचं तर मला
प्रतिक्रिया द्यायला भीती वाटते आहे. एकुणच बुद्धीनिष्ठांमधे या विचारांची खिल्ली उडवली जाईल की काय अशी.
तरीही...,)
डाव्या बाजूचे चित्र त्याचे सेल्फ पोर्ट्रेट
हा पिकासोच्या भावनांचा अविष्कार आहे का??
बंद ओठ हे शब्दांत मांडायच्या दाबून ठेवलेल्या भावना? एक डोळा मोठा व एक छोटा एकुणच मनातल्या भावनांमधल्या विचारांचे विस्कळीत पणाचे द्योतक? की एकाच भावनेचे दोन् वेगळे अविष्कार असु शकतात हे जाणवणे?
की प्रत्येक डोळ्यातले जग वेगळे?
माझ्या मते प्रत्येक चित्र हे काव्य असते. कविता जशी प्रत्येकाला वेगळ्या रीतीने जाणवते, भावते; तसेच चित्रांचेही आहे.
समिक्षण वाचून चित्र पाहिले, तर मुळ कवितेपेक्षा संदर्भासहीत प्रश्नोत्तरे मधे 'कवी ला असे का वाटले' चे उत्तर वाचल्या सारखे वाटते.
अर्थातच, त्यात कवितेची अनुभूती नसते.
तसेच चित्र - कुणाचे आहे? किती गाजले आहे? कोणी समिक्षण केले या सगळ्यापेक्षाही पेक्षा तुमच्या मनाला ते कुठे स्पर्श करते हे महत्वाचे मगच चित्रकाराचे नाव पहावे.
आपला
गुंडोपंत
चित्रकलेतले
फारसे समजत नाही. पण चित्रे विचार करायला लावणारी वाटली. हा विषय नवा वाटला आणि आवडला.
सेल्फ पोर्ट्रेट पिकासोने बरीच काढलेली आहेत असे समजले. सेल्फ पोर्ट्रेट काढणार्या माणसाला त्या क्षणी स्वत:त खूप रस, किंवा कुतुहल निर्माण झाले असावे असे गृहित धरायला हरकत नसावी. कदाचित स्वत:कडे बाहेरून त्रयस्थाच्या नजरेतून बघण्याची कुवत असेल.. ते चित्र पाहिल्यानंतर डोळ्यांच्या विशिष्ट रचनेमागचा हेतू काय असेल याचा विचार येत होता. चित्र फक्त चेहर्यावर केंद्रित केल्याने मनातील भावना थेट दिसाव्यात (स्टार्क) अशी रचना केली असावी असे वाटले. एक डोळा दुसर्याहून बारीक का याचा विचार करत होते. कदाचित एका डोळ्याने बारीक बघत चित्र काढले असेल का असे मनात आले, पण तसे बरोबर वाटले नाही. त्या डोळ्यांच्या ठेवणीमुळे एक प्रकारची भिती (कदाचित मृत्युबद्दलची), किंवा "आता पुढे काय असेल" असे काही भाव दाखवायचे आहेत की काय असे वाटले. पिकासोने अंगातही शर्ट वगैरे घातलेलाही दिसत नाही, म्हणजे हे अगदी खासगी स्वरूपाचे चित्रण आहे. एका डोळ्यात भितीमिश्रित कुतुहल, दुसर्या डोळ्यात परिस्थितीचा स्विकार असे दाखवायचे आहे असेही वाटले.
वरच्या दोन चित्रांमध्ये जे मोजके रंग वापरून आकारातून (फॉर्ममधून) व्यक्तीचित्रण केले आहे ते पिकासोच्या वेळी नवे असावे.
स्वचित्रण
पिकासोचे हे सेल्फ पोर्ट्रेट पाहून मला तरी असे वाटले:
पिकासो महाशयांना कसल्या तरी अंमली पदार्थाचा (कोकेन, हेरॉइन वगैरे) ओव्हरडोस झाला असावा, आणि त्या अवस्थेत त्यांच्या मनात त्यांचे स्वतःचे जे चित्र उभे राहिले ते त्यांनी कागदावर चितारले असावे.
:))
पिकासो महाशयांना कसल्या तरी अंमली पदार्थाचा (कोकेन, हेरॉइन वगैरे) ओव्हरडोस झाला असावा, आणि त्या अवस्थेत त्यांच्या मनात त्यांचे स्वतःचे जे चित्र उभे राहिले ते त्यांनी कागदावर चितारले असावे.
ही ड्रग्ज कधी घेतली नसल्याने (!) ओव्हरडोस झाल्यावर नक्की काय "होते", वस्तू कशा दिसतात माहिती नाही. पण बहुधा एवढ्या स्पष्ट दिसत नसाव्यात!
पण तुमच्या खालच्या प्रतिसादाला इथेच उत्तर देते. मुक्तसुनितांनी योग्यच विवरण केले आहे. कमीतकमी रंग/ रेषांमधून चित्रकार जेव्हा मनात काय आहे ते दाखवू शकतो, (जसे एखादा उत्तम कवी कमीत कमी शब्दांतून हवे ते सांगू शकतो तसे), तेव्हा त्याला सामर्थ्य प्राप्त झाले असे म्हणता येईल. त्यानुसार बघायचे तर चौथे चित्र आणि मधलीही दोन चित्रे विशेष आहेत. शेवटचे चित्रही असेच - वस्तू आणि चित्र दोन्ही स्पष्ट आणि कमीतकमी प्रावरणांचा वापर केलेली. (पाचवे चित्र तसे नुसत्या रेषा. आपल्या नजरेत असेल तसे दिसेल. लहान मुलांना कसे दिसेल कोण जाणे.. ) असो.
चित्रा
एल् एस् डी किंवा भूछत्रे
यांच्या अमलाखाली भौमितिक दृष्टिभ्रम अनुभवास येतात. (प्रत-अधिकारमुक्त चित्रे मला सापडली नाहीत :-( )
ते दृष्टिभ्रम वेगळे असतात... क्युबिस्ट तर मुळीच नाहीत.
(बोजड शास्त्र ह.च घ्या.)
आणखी एक विचार
ह्याच बरोबर चर्चा प्रस्ताव देताना आणखी एक विचार माझ्या मनात होता.
सगळ्यात शेवटचे चित्र अवघ्या साडे तीन रेषांचे आहे. ते पाहून असे वाटते एखाद्या १-२ वर्षाच्या मुलाने सहज रेघोट्या ओढाव्यात आणि त्यातून काहीतरी आकृती तयार व्हावी. त्याच्या बाजुचे चित्र (सेल्फ पोरट्रेट)पाहून असे वाटते की थोडा मोठा झाल्यावर ह्याच मुलाने प्राथमिक शाळेत हे चित्र काढले असावे. चित्रकलेतील ह्याची गती पाहून पालकांनी त्याला आणखी उत्तेजन दिले असावे आणि शाळा कॉलेजात व्यवस्थीत शिक्षण घेउन ते ठोकळ्यांचे चित्र काढले असावे आणि शेवटी चित्रकारीतले सगळे शिक्षण संपवून एक व्यावसायीक चित्रकार म्हणून सगळ्यात वरचे चित्र काढले असावे.
पण वस्तवात बघीतले तर हाच क्रम नेमका उलटा आहे. आपल्याला जे सर्वात जास्त आवडले ती ह्या चित्रकाराची सुरुवात होती आणि जे सगळ्यात प्राथमिक वाटले तो ह्याच चित्रकाराचा 'पीक्' होता हे पाहून चक्रावुन सोडले आहे.
वास्तववादी कला आणि व्यक्तिसापेक्ष कला
माझ्या जुजबी माहितीनुसार जे ऐकले/वाटले त्याप्रमाणे, पाश्चात्य कलेचा प्रवास हा वास्तववादाकडून कलावंताच्या "आतल्या"जगाला प्राधान्य देण्याकडे झाला आहे. कलावस्तूचे "तंतोतंत" रेखाटन, आकर्षक, प्रतिकृतीसदृष्य रंगलेपन आणि एकंदर कलाकुसरीला एके काळी प्रचंड महत्त्व होते. फोटोग्रफी आली आणि "तंतोतंत"पणाचे चित्रकलेतले महत्त्व हळूहळू कमी होऊन, अमूर्तवादाकडे प्रवास सुरू झाला. यंत्रे आली आणि कलेतल्या "कुसरीचे" महत्त्व लोप पावत चालले.
पिकासो सारख्यांचा प्रवास उपरोक्त प्रवासाशी मिळताजुळता झाला असावा असे मला वाटते..
जे असते ते- जसे भावते ते
माझ्या तुटपुंज्या वाचनानुसार चित्रकला जे जसे आहे तसेच्या तसे रेखाटणे या कडून दृश्य आपल्याला जसे भावले तसे रेखाटणे या मध्ये आंदोलित होते.
पहिल्या प्रकारात प्रत्येक तपशील अगदी बारकाईने रेखाटण्याकडे कल असतो. कालांतराने कलाकार हा कुशल कारागीर होत जातो.
*दुसर्या प्रकारात उत्स्फूर्तता हा जो कलेचा आत्मा आहे त्याच्या हाकेला ओ दिली जाते आणि दृश्य जसे मनाला भिडते तसे कागदावर येते.
पिकासो महाशयांचा प्रवास सुद्धा कारगीर्-कलेकडुन स्वच्छंदी कले कडे झालेला असावा.
*(कलेच्या या जाणीवांबद्दल उच्चरवाने बोलणार्या आणि कारगीरी कलाकारांवर शब्दांचे आसूड ओढणार्या विस्टलर http://en.wikipedia.org/wiki/Anna_McNeill_Whistler या इंग्रजी चित्रकाराचे विचार उल्लेखनिय आहेत. त्याची स्वतःच्या शैलीतली 'अरेंजमेंट्स इन ग्रे अँड ब्लॅक http://en.wikipedia.org/wiki/Whistler%27s_Mother आणि इतर चित्रे याची साक्ष देतात.)
--लिखाळ.
सहमत
चांगली माहिती लिखाळराव. तुमच्या दुव्यांवर विस्टलर साहेबाचे विचार पण नक्कीच वाचीन. मुक्तसुनित आणि चित्रा ताईंनी पण साधारण असाच मुद्दा मांडला आहे. कारागीरी आणि कला.. फरक आहे खरा!काअणि हा फरक समजायला वाटतो तितका सोपा नाही. बर्याचदा कलाकार म्हणून आपल्याला जे भावतात ते वास्तवात कारागीर देखिल असू शकतात. चर्चेत सहभागी होणार्या सर्वांचे आभार!
-कोलबेर
लेख आवडला
शेवटच्या रेखाचित्रात कुंचल्याच्या (किंवा लेखणीच्या) तीन फटकार्यांनी णिअंबांचे इतके पटण्यासारखे चित्र तयार करण्याची लकब औरच.
शेवटचे (लेखणीने काढलेले) आत्मचित्र कधी माझ्याकडे रोखून बघते आहे, तर कधी माझ्या डाव्या खांद्यावरून माझ्या पाठीमागच्या दृष्याकडे बघते आहे असा भास होतो.
(मोराच्या चित्रात घटकांच्या ठेवणीतले जे कौशल्य होते, तसेच कौशल्य शेवटच्या आत्मचित्रातही स्पष्ट दिसते आहे. भाव अर्थात वेगळे आहेत.)
क्युबिझम : मिती
आमच्या प्रोफेसरांना चित्रकलेची बरीच हौस आहे. प्रत्येक सेमिनारला मागच्या रांगेत बसून ते सर्वांची रेखाचित्रे काढत असतात. मूडात असले तर याबद्दल बोलतातही. आज जेवताना पिकासोबद्दल बोलत होते. त्यातून वेचलेले काही ज्ञानकण इथे.
सर्व चित्रकारांपुढे एक यूनिव्हर्सल अडचण असते ती म्हणजे तीन मितींमधले जग कागदावर दोन मितींमध्ये कसे दाखवायचे? यावर काही चित्रकार पर्स्पेक्टीव्हचा आधार घेतात, काही शेडींगच्या आधारे तिसर्या मितीचा भास निर्माण करतात. पिकासोने क्यूबिझमच्या आधारे एक नवीन तंत्र विकसित केले. समजा एखाद्याचे पोर्ट्रेट काढायचे आहे. तर त्याचा उजवा डोळा समोरून जसा दिसतो तसा काढला. मग त्याच्या बाजूला जाऊन डावा डोळा प्रोफाइलमध्ये जसा दिसेल तसा काढला. अजून तिसर्याच कोनातून त्याचे नाक जसे दिसेल तसे काढले. आणि हे सर्व करताना दोन्ही डोळे, नाक इत्यादींच्या सापेक्ष जागा तशाच ठेवल्या. असे करत गेले तर होणारे चित्र म्हणजे एखाद्या दृश्याचे विविध तुकडे करून प्रत्येक तुकडा वेगळ्या परस्पेक्टीव्हमध्ये कसा दिसेल यांचे कोलाज असते. या प्रकाराला क्युबिझम म्हणतात. अर्थात दिलेल्या चित्रावरून कुठला तुकडा कुठल्या पर्स्पेक्टीव्हमध्ये आहे हे कसे ओळखायचे ही शंका अनुत्तरितच आहे.
क्युबिझमचे आणखी एक विशेष म्हणजे अशा प्रकारच्या चित्रांमध्ये भडक रंग विशेष न वापरता (उदा. लाल, निळा, हिरवा इ.) शक्यतो सौम्य रंग वापरले जातात.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
देअर इज नो ऍबस्ट्रॅक्ट आर्ट
There is no abstract art. You must always start with something. Afterward you can remove all traces of reality.
असे Pablo Picasso विधान नुकतेच वाचनात आले.
स्रोत - http://www.quotationspage.com/qotd/2008-04-23.html
१०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त. १०% हून अधिक रोमन अक्षरांसाठी प्रायश्चित्त.