कम्यूनिझम - मार्क्सवाद्यांसाठीची अफूची गोळी

कम्यूनिझम अर्थात साम्यवाद, हा कोणे एके काळी किमान अर्ध्याजगावर राज्य करत होता. पण ऑर्वेलच्या कादंबरी प्रमाणे १९८४ नंतर साम्यवाद हळूहळू खालावत गेला. अमेरिकन्सना वाटते की रशिया पडायचे कारण रेगन आणि जॉर्ज एच बुश हे (आणि काँडोलिजा राइस) हे आहेत. ते आपले उगाच आपली पाठ थोपटतात. (म्हणजे रेगन एमड् ऍट रशिया अँड बूश पूल द ट्रिगर वगैरे ऐकल्याचे आठवते). पण काहींचे असेही म्हणणे आहे की रशिया आणि पर्यायाने साम्यवाद हा स्वतःच्या वजनानेच कोसळला.

वास्तवीक कम्यूनिझम म्हणजे शिस्तबद्ध दयावान-माफिया जे राज्य चालवत होते. थोडक्यात एकाधिकारशाही. त्याचे पितळ उघडे पडले. भारतात साम्यवाद आणायचे कम्युनिस्टांचे स्वप्न सुदैवाने लांबच राहीले (खरे म्हणाल तर स्टॅलीनने सरळ सांगीतले होते, ते कधी शक्य होणार नाही म्हणून - डांग्यांच्या आठवणीत वाचल्याचे आठवते). पण तरी देखील आजही भारतात स्वतःला कम्युनिस्ट समजणारे - समुहासाठी (समाजासाठी नाही) व्यक्तिचे हक्क लांब करणे आणि राष्ट्रापे़क्षा कम्युनिझम मोठा मानणारे अनेकजण आहेत. यातील बंगाली आणि केरळचे (तसेच नॉर्थ इस्ट भागात) कम्युनिस्ट आहेत. नक्षलवादी चळवळी चालतात आणि त्यात अनेकांना मारले जाते, अर्थात कायदा हातात घेऊन. मजा म्हणजे ह्याच कम्युन्सिट बंगालला मध्यंतरी एस इ झेड प्रकल्पासाठी शेतकर्‍यांना लुबाडताना (तेही अनेक अल्पसंख्य मुसलमान शेतकरी) काही वाटले नव्हते. नक्षलवाद्यांची स्मारके बांधण्यात पण ह्या विचारांच्या लोकांनी धन्यता मानली आहे.

आजही भारतातील काही बुद्धीवादी वर्गाला कम्युनिस्ट विचारसरणी जवळची वाटते - म्हणून रशियाचे गूड ओल्ड डेज् आणि कालचा-आजचा चीन...पण हे बुद्धीवादी कम्यूनिस्ट स्वतःला कम्यूनिस्ट जाहीरपणे म्हणायला तयार नसतात. अपवाद एखाद्या कॉ. विकीसाहेबांचा, जे मला प्रामाणिकपणाचे वाटते. अमेरिकेतपण अनेकजण आहेत जे कम्यूनिस्ट असतात पण भूमिगत असल्यासारखे!

तर माझे आता प्रश्नः

तुम्हाला कम्यूनिझम कुठे जाणवतो का? - सरकारात, प्रसिद्धीमाध्यमात, शिक्षणात, कामगार क्षेत्रात वगैरे?
जाणवत असल्यास तसा असणे अथवा त्याचे असणे योग्य वाटते का? वाटल्यास कारणे काय असू शकतात?
भारतात काही गोष्टीत ६० वर्षे स्वातंत्र्य मिळूनही मागे पडण्याचे कारण हे कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव वाटते का?
तुम्ही स्वतःला कम्यूनिस्ट समजता का? का कम्यूनिझम पण एक अफूची गोळीच वाटते?

त्या व्यतिरीक्त कम्यूनिस्ट, कम्यूनिझम, आणि आपले जर काही अनुभव असतील तर (जसे नारायण मुर्तींना कम्यूनिस्ट असताना रशियात वाईट अनुभव आला आणि परीणामी भारताला एक चांगला उद्योगपती मिळाला!) येथे अवश्य लिहा. ही चर्चा कृपया व्यक्तिगत दोषारोपांसाठी करू नये आणि इतर विषयांमधे भरकटून देऊ नये ही विनंती!

धन्यवाद

लेखनविषय: दुवे:

Comments

अमेरिकेचा बिछाना

अमेरिकन्सना वाटते की रशिया पडायचे कारण रेगन आणि जॉर्ज एच बुश हे (आणि काँडोलिजा राइस) हे आहेत.
जग आपणच वाचवले असे ढोल वाजवण्यात हातखंडा आहे या लोकांचा! विनोद म्हणून सोडून द्या!
रशिया आणि पर्यायाने साम्यवाद हा स्वतःच्या वजनानेच कोसळला.

यात काही तरी अर्थ आहे. मी म्हणीन की त्यातल्या 'सरकारी बाबुगीरी' मुळेही हातभार लागला.
भारतात साम्यवाद आणायचे कम्युनिस्टांचे स्वप्न सुदैवाने लांबच राहीले हे आपले नशीब!!!
नाहीतर बिकट वस्था झाली असती आपली. भारताने रशियाशी घरोबा करण्यापेक्षा अमेरिकेचा बिछाना सजवला असता तर फार काही वेगळे घडले असते. (पुढील वाक्ये स्वातंत्र्य, नेहरू, धोरणे, देश इत्यादी प्रत्येकाने आपापल्या मतानुसार वकुबाने म्हणून/वाचून घ्या! ;))) )
नक्षलवाद्यांची स्मारके बांधण्यात पण ह्या विचारांच्या लोकांनी धन्यता मानली आहे. बिचारा मार्क्स!

तुम्हाला कम्यूनिझम कुठे जाणवतो का?

साहेब, हे प्रकार संपले हो!
आता फक्त एकाच प्रकारचा कम्युनिझम आहे शिल्लक, जो इन् प्रॅक्टीस आहे- मी खातो तुम्ही पण खा... अर्थात आपण सगळे कम्युनली खाऊ!! अर्थात यातही काही विषेश समान असतातच.

आणि आता पुर्वीसारखे लपवावे लागत नाही मार्क्स वगैलंच्या नावाखाली. ओपन... खुल्लमखुल्ला!

भारतात काही गोष्टीत ६० वर्षे स्वातंत्र्य मिळूनही मागे पडण्याचे कारण हे कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव वाटते का?

अर्थात माझा वरील प्रतिसाद स्वातंत्र्य, नेहरू, धोरणे, देश परत वेगळ्या स्टाईलने इतकेच!
बाकी मागे म्हणजे कशात मागे?
आर्थिक? की अध्यात्मीक?
मला वाटत नाही की अध्यात्मीक प्रभाव काही पडला असेल.... शकझी नाही. त्याबाबतीत भारतच जगाचा गुरु आहे. आणि रशिया मध्ये अध्यात्मिक भाग निपटून टाकला जऊ शकला. जो भारतात कदापीही शक्य नाही.

आर्थीक म्हणाल तर नक्कीच पडला आहे. आमच्या सारखी सामान्य जनता दरिद्रीच राहून गेली. काही खास समान लोक मात्र खुप श्रीमंत होऊन बसलेत. आणि अजूनही होत आहेत.

मात्र अमेरिकेची कास धरली असती तर काय घडले असते याचे स्वप्नरंजन करणे, हा या लेखाचा भाग नसावा म्हणून उत्तर देत नाही.

अमेरिकेत राजकिय भांडवल झाल्याने कम्युनिझम म्हणजे आजार असेच मानले गेले. ही देखील एक चूकच आहे. कोणतीच विचार सरणी ही कायम व सर्वच ठिकाणी बरोबर अथवा चूक नसते. विचारसरणींचे योग्य ते मिश्रण वापरणे हाच उपाय योग्य वाटतो.
अमेरिकेसारख्या स्वांतंत्र्याचा टाहो फोडणार्‍या देशात कोणताही तसा बेस नसणार्‍या नगण्य कम्युनीस्ट लोकांना भुमीगत होण्याची वेळ यावी या पेक्षा अजून मोठा डबल स्टँडर्ड्स् चा वेगळा प्रकार कोणता?

तेंव्हा कुठे जाते ही पोस्ट-मॉडर्न विचार सरणी?

त्याच न्यायाने अनेक विचारवंत जसे की नॉम चॉम्स्की वगैरे यांना दाबण्याचेच जास्त प्रयत्न झाले.

वास्तवीक कम्यूनिझम म्हणजे शिस्तबद्ध दयावान-माफिया जे राज्य चालवत होते. थोडक्यात एकाधिकारशाही. त्याचे पितळ उघडे पडले.

यावर मी इतकेच म्हणेन की कम्युनीस्टांचे उघडे पडले भांडवल वादी वेगळे काय करत आहेत?
आणि हे वेगवेगळ्या प्रकारे अधून मधून समोर येतच असते.
मागे मी रँपेज नावाच्या चित्रपटा विषयी कुठे तरी वाचले होते. त्यातल्या इराक मधे लढणार्‍या(?) एका सैनीकाला त्याच्या गावातला ड्रग्ज विकणारा व ती रिंग चालवणारा काळा माणूस म्हणतो की, 'तू बुश च्या पेट्रोल वाल्या गँगसाठी का लढतो? माझ्या गँगसाठी लढ मी तुला जास्त कॅश देईन'
यातले (इतर भाग सोडून) त्या ड्रग डिलरचे म्हणणे मला तरी रास्तच वाटले!

थोडक्यात, भांडवल वाद्यांचेही पितळ उघडे पडेलच!
पण ते जरा जास्त काळजी घेत असल्याने तेव्हढे उघडे पडले नाहीये असे वाटते.

आपला
गुंडोपंत

आहेरे - नाहीरे

आपला प्रतिसाद आवडला. सर्व प्रथम एक खुलासा: कम्युनिझमला नावे ठेवताना मी भांडवलशाहीचे कौतूक करतोय असा अर्थ कृपया घेउ नका. भारतप्रेमी गालब्रेथचे एक छान वाक्य आहे (होते): under capitalism, man exploits man. Under communism, it’s just the opposite. मी हेच बरोबर समजतो.

माझी तुलना कम्युनिझम आणि कॅपिटॅलीझम (भांडवलशाही) अशी नव्हती तर ती लोकशाहीशी होती. दुसरा भाग म्हणजे कम्युनिझम हा स्थानीक मुळे मग ती राजकीय, सामाजीक, सांस्कृतिक, आणि अर्थातच आर्थिक कुठलीही असोत ती मुळापासून उखडतो. परीणामी देश संकल्पना विकलांग होऊ लागते. आज अशा पद्धतीचे स्वतःस बुद्धिवादी समजणारे कम्यूनिस्ट भारतात बरेच आहेत आणि भारतात नसलेले भारतीयही बरेच आहेत ज्यांच्यामुळे समानता अर्थातच येत नाही पण बुद्धीभेद नक्कीच होतो आणि ते काळजीचे कारण आहे.

आज काळजी जास्त वाटायचे कारण म्हणजे, वाटेल तशी बेशिस्तीने फोफावत चाललेली भांडवलशाही. त्यातून समाजात प्रचंड विषमता निर्माण होत आहे. त्याचा ताबडतोब होणारा परीणाम म्हणजे आहेरे विरुद्ध नाहीरे चा संघर्ष ज्यामुळे लंबक परत दुसरे टोक गाठून कुठल्यातरी रुपात साम्यवादी विचार आणून देशाची प्रगती खुंटवायला कारण होऊ शकेल असे वाटते. अमेरिकेत त्यांच्या संस्कृतीस (?) योग्य अशा पद्धतीने त्यांनी या कम्युनिझमला थांबवले, पण आज आपल्याकडे कुठलाच विचार या बाबतीत झालेला दिसत नाही .

असले विचार कुणाशी तरी बोलताना येत गेले म्हणून येथे हा चर्चा प्रस्ताव टाकावासा वाटला...

साम्यवाद येणे अवघड

भांडवलशाही बेशिस्तीने फोफावत बेभान असली तरी साम्यवाद येणे फार अवघड वाटते.
साम्यवाद सोडा!! समाजवादही आता खूप दूरवर सोडून आलो आहोत आता.
कोणतेच नेते आता बुद्धीभेद करू शकत नाहीत. पॅट्रीयटीझम वगिरे पण सोडा, प्रत्येकाला पैशाचे महत्व कळलेय. आणि तो कसा मिळेल याच्याच विवंचनेत सगळे आहेत. बुद्धी भेद केला तर तो फक्त अध्यात्मिक गुरु लोकच करू शकतील. आज एकटा रामदेवजीबाबा कसा येता जाता कोकाकोलाला लाथाडू शकतो हे त्याचे ताजे उदाहरण. त्यांच्या सेल्स फिगर्स बोंबलण्याचे एक महत्वाचे कारण आहे हा रामदेवजीबाबा आहे. (विषारी द्रव्ये वगैरे वेगळेच.)
अध्यात्मिकतेने भेद केला तरच काही होईल असे वाटते.

अति-आवांतर उदाहरण
मागच्या आठवड्यात नरेंद्र महाराजांनी आमच्या चांदवड जवळ सुमारे अडीच हजार दिशाभूल करून बाटवलेल्या ख्रिश्चन लोकांना परत हिंदु करून घेतले. (मला वैयक्तिक रित्या आनंद झाला. असेच जमतील तितके मुसलमानांपण शुद्ध करून घ्या!).

म्हणजे सामाजिक ताकद विचारात घ्या... उद्या महाराजांनी एखादा एकॉनॉमिक पॉलिसी डिसिजन फिरवा असे म्हंटले तर?

मात्र आता आहेरे आणि नाहीरे यातली दरी काही प्रमाणातका होईना पण भरते आहे हे निश्चित. पैसा लोकांच्या हातात खेळू लागला आहे. आहेरे वाले लोक वाढत आहेत.
अगदी खेड्यापाड्यांवरही आज 'पल्सर' दिसताहेत.
मात्र अजूनही गरिबी पुर्णपणे गेली असे मानणे म्हणजे स्वप्न रंजन आहे. पण आज मागणाराला काम मिळण्याची शक्यता नक्कीच आहे.
झोपडपट्ट्या वाढत आहेत पण ही लोकं बेकार आहेत असे मात्र नाही. ते काम करत आहेत आणि हेच महत्वाचे आहे.

आवांतर पण अनुषंगीक:
या अनुषंगाने मी म्हणेन की भारताला स्कील ट्रेनींगची खुप म्हणजे खुपच आवश्यकता आहे. नुसतेच सोफ्टवेअर स्कील्स म्हणत नाही, पण एयर कंडीशनींग ते मोटर मॅकॅनीक, मिग/टिग वेल्डींग असे व्य्वसाय संबंधीत स्कील्स.

पुढे जाऊन असे "स्कील्ड लोक निर्यात करणे" हाच भारताचा एक प्रमुख व्यवसाय होऊ शकतो/होईल!
यातून भारत एक दिवस खरोखर जगावर राज्य गाजवेल हे निश्चित.

आपला
गुंडोपंत

प्रश्नांची उत्तरे

फार मोठा विषय. माझ्या वकूबाप्रमाणे उत्तरे देण्याचा एक प्रयत्न.

>>तुम्हाला कम्यूनिझम कुठे जाणवतो का? - सरकारात, प्रसिद्धीमाध्यमात, शिक्षणात, कामगार क्षेत्रात वगैरे?
भारतात असताना जाणवलेला कम्युनिझम :
१. रेशनच्या रांगेत उभे रहाणे, रेशनवर मिळेल इतपत शिधा, इंधन मिळणे. "केंद्रावरचे" दूध आणणे. (साधनसंपत्तीचे समान वाटप या कम्युनिस्ट तत्त्वाचा स्पर्श)
२. संपामुळे मामा काका , मित्रांचे बाबा यांच्या कंपन्या बंद कायमच्या पडल्या. हे लोक बेरोजगार झाले , त्याना इतर व्यवसाय करावे/शोधावे लागले. (शोषणाविरुद्ध आवाज या कम्युनिस्ट तत्त्वाचा स्पर्श)
३. असंख्य मित्रांप्रमाणे माझे शिक्षण सबसिडाइझ्ड् संस्थांमधे झाले (सरकारी संस्थांच्या अधिपत्याखाली चालणार्‍या व्यवस्था या कम्युनिस्ट तत्त्वाचा स्पर्श)

>>>जाणवत असल्यास तसा असणे अथवा त्याचे असणे योग्य वाटते का? वाटल्यास कारणे काय असू शकतात?
कम्युनिस्ट तत्वांचा घी आणि बडगा वरील उदाहरणांवरून स्पष्ट व्हावा.

>>> भारतात काही गोष्टीत ६० वर्षे स्वातंत्र्य मिळूनही मागे पडण्याचे कारण हे कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव वाटते का?
नेहरूंपुढे रशियन आर्थिक मॉडेलशिवाय इतर कुठले पर्याय उपलब्ध होते हे मला माहित नाही. पंचवार्षिक योजना , हेवी इंडस्ट्रीज्, मोठेमोठे बंधारे .सहकार तत्वावरील शेती आणि शेतीआधारित प्रकल्प , मोठीमोठी पब्लिक सेक्टर युनिट्स् .... या सर्वांच्या अपयशावर बोट ठेवणे सहज शक्य आहे. प्रश्न आहे तो असा की, उजाड , खंक देशाच्या पुनर्बांधणीला सुरवात करताना उपरोक्त तत्व आणि धोरणांखेरीज नक्की काय जास्त योग्य ठरले असते ?

>>>तुम्ही स्वतःला कम्यूनिस्ट समजता का? का कम्यूनिझम पण एक अफूची गोळीच वाटते?
स्वतःला कम्युनिस्ट समजण्याकरता थोडेसे स्वत:ला विद्वान , नि:स्वार्थी , "स्कॉलर्" , बर्‍यापैकी वाचन असणारे , अशा काही "नोशन्स् ऑफ् ग्रॅंड्यर्" असणे जरूरीचे आहे. यापैकी कुठलेच लक्षण लागू नसल्याने स्वतःला कम्युनिस्ट् समजणे शक्य नाही. (वरील उत्तरात अर्थातच विनोद आहे ; पण बर्‍यापैकी सत्य आहेच ! :-) )

मजेदार निरीक्षण

> मला मराठी संकेतस्थळांवर कम्युनिझम जाणवतो.

मराठी संकेतस्थळावर संयमित हुकुमशाही, पॉलिटब्युरोछाप पद्धत आणि अनिर्बंध/आततायी हुकुमशाही असे तीन प्रकार पाहायला मिळतात (जोड्या प्रत्येकाने मनातल्या मनात लावाव्यात ;) ) एकमेव आणि पहिल्यावहिल्या लोकशाहीवादी संकेतस्थळाचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात अनिर्बंध हुकुमशाही मराठी जालकर्‍यांनी भोगली आहे हो! :प्

व्याख्या/परिभाषा?

पण हे बुद्धीवादी कम्यूनिस्ट स्वतःला कम्यूनिस्ट जाहीरपणे म्हणायला तयार नसतात.

ज्याअर्थी ते स्वतःला जाहीर न करताही ते कम्यूनिस्ट आहेत असे कळते, त्यावरून असे वाटते की कम्यूनिझमची काही वस्तुनिष्ठ व्याख्या/परिभाषा तुम्हाला अभिप्रेत असली पाहिजे. ती कुठली? ते कळल्यास या चर्चेत उत्तर देता येईल. म्हणजे त्या व्याख्या/परिभाषेत बसणारे माझे जे काय अनुभव आहेत ते सांगता येतील. ती परिभाषा फारच एकदेशी असेल (म्हणजे आणखी कुठेच ऐकली नसेल) तर बहुधा उत्तरच देता येणार नाही. उदाहरणार्थ १९५० काळात सिनेटर मॅक्कार्थी या अमेरिकन खासदाराने कम्यूनिझमची मोठी समावेशक व्याख्या मानली होती. "सिनेटर मॅक्कार्थीचा उदोउदो न करणारे=कम्यूनिस्ट" अशी ती ढोबळ व्याख्या होती. पण ती व्याख्या कोणी स्पष्टपणे त्यांना विचारली नाही. त्यामुळे त्यांच्या उपसमितीपुढे जे लोक ओढले गेले त्यांना लोकांनी कम्यूनिस्ट मानले. पुढे लोकांच्या लक्षात आले की सेनेटर मॅक्कार्थीची व्याख्या सामान्य व्याख्येपेक्षा पुष्कळ वेगळी होती.

पुढे कधी सेनेटर मॅक्कार्थी यांनी अमेरिकन सेनेच्या वकिलाला कम्यूनिस्ट गोटात असल्याचे म्हटले. त्या वकिलाने सेनेटरला उत्तर दिले, की "तुम्हाला आता काहीच सौजन्य उरले नाही का, सर?" असे विचारले, आणि पहिल्यांदा अशा सार्वजनिक ठिकाणी असे उघड झाले की केवळ सेनेटर मॅक्कार्थी म्हणतात म्हणून कोणी कम्यूनिस्ट होत नाही. त्याहून वस्तुनिष्ठ व्याख्या लागेल.

मॅक्कार्थी यांच्यासारखीच सर्वसमावेशक व्याख्या असेल तर "बहुसंख्य बुद्धिवादी कम्यूनिस्ट आहेत" हे मान्य करणे भाग आहे. पण मग चर्चा करण्यासारखे फारसे राहाणारच नाही - मॅक्कार्थी यांच्यासाठी "कम्यूनिस्ट" ही एक व्याख्या नसलेली शिवी होती. मॅक्कार्थी यांना सेनेचे वकील वेल्च यांनी दिल्यापेक्षा वेगळे उत्तर देणे दुरापरस्त आहे.

जे स्वतःला कम्यूनिस्ट म्हणत नाहीत ते कम्यूनिस्ट आहेत असे तुम्ही म्हणता ते कसे? असा प्रश्न मनात येतो. तुमची व्याख्या वस्तुनिष्ठ आहे अशी खात्री आहे. तरी ती येथे द्यावी.

व्याख्या

"सिनेटर मॅक्कार्थीचा उदोउदो न करणारे=कम्यूनिस्ट" अशी ती ढोबळ व्याख्या होती.

माझा उदोउदो न करणारे म्हणजे कम्यूनिस्ट अशी काही माझी व्याख्या नाही कारण मग सगळे जगच कम्यूनिस्ट होईल :-)

असा अनेकांचा अप्रत्यक्ष संबंध आला ज्यांच्याबद्दल नंतर समजले की ते भारतात असताना कम्युनिस्टांशी (पक्षाशी अथवा चळ्वळीशी ) संलग्न होते. पण नंतर अमेरिकेत "सम आर मोर इक्वल" या पद्धतीने राहताना प्रवेश करण्यापासून आम्ही कम्युनिस्ट नाहीत म्हणून सांगत (कारण किमान दिड-दशकांपूर्वी व्हिसाच्या फॉर्मवर आपला कम्युनिस्टांशी संबंध आहे का नाही हे जाहीर करावे लागायचे, आताचे माहीत नाही). पण त्यांची विचार करण्याची वृत्ती भांडवलशाहीच्या विरुद्धचे बोलणे, भारतातील राजकारण/समाजकारणासंदर्भात असलेला वैचारीक प्रभाव हे सर्व कम्युनिस्ट असल्याचेच दिसायचे. माझे म्हणणे त्यात काही गैर नाही, तुम्हाला आवडते तर तसे सरळ सांगा (जसे विकी साहेब सांगतात अथवा त्या उलट मी हिंदूत्ववादी आहे म्हणून सांगतो). पण तसे होत नाही. मग भारतातील नक्षलवादी चळवळीस सहाय्य/अथवा त्याचे जाहीर कौतूक करणार, अमेरिकेस नावे ठेवणार (कारण ते व्यक्तिस्वातंत्र्य असलेल्या जगात सोपेच आहे!) आणि मग भारतीय राजकारणाविषयी तेच तेच उगाळत बसणार - जे इतर कोणिही उगाळताना दिसत नाही. तेंव्हा व्याख्या म्हणाल तर त्यांची भाषा आणि विचारांचे प्रदर्शन यावर ठरते. अगदी कधी कधी पेहेराव/आविर्भाव पण पुरेसा ठरतो! जरी त्यावरून मी कोण काय हे ठरवत नसलो तरी!

बाकी मॅकार्थीच्या परीभाषेतील कम्यूनिस्ट नंतर लेफ्टीस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले, नंतर लिबरल्स आणि आता प्रेग्रेसिव्हज् म्हणून. यांचे सामाजीक विचार हे रिपब्लीकन्सपेक्षा वेगळे असले तरी कम्युनिस्टांच्या जवळ जाणारे वाटले नाहीत (या राज्यात अनेकांशी या संदर्भात संबंध आल्याने, तरी ही मर्यादीत अनुभवाधारीत असे म्हणत आहे).

म्हणजे काय?

कम्यूनिझम म्हणजे काय? एकाधिकारशाही का? याची तत्वे काय आहेत?

 
^ वर