उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उघड्या डोळयांनी पाहीलेली स्वप्ने खरी होतात का ?
वेमीत्८५
February 11, 2008 - 5:39 pm
कधी कधी एखादा प्रसंग आपल्या बरोबर झालेला नसतांना सुद्धा तो प्रसंग
असा वाटतो की मी ह्या प्रसंगात पहीला सुद्धा होतो, तेच स्थळ, तीच माणसे,
तोच विषय, त्यापुढे काय होणार हे सुद्धा समजते त्यावेळी असे वाटते की हे
उघड्या डोळयांनी पाहीलेली स्वप्न तर नाही.
नेमके हे काय असते ??????????
आणि असे आपल्या बरोबर रोज होवू लागले तर ?????????
याला काय बोलतात ??????????
उघड्या डोळयांनी पाहीलेली स्वप्ने खरी होतात का ?
दुवे:
Comments
देजा वू
मला हा अनुभव आलेला आहे. एखाद्या संपूर्णपणे नवीन प्रसंगामध्ये असताना हे आधी कधी तरी झाले आहे असे वाटणे. यामागचे कारण अजूनपर्यंत कळालेले नाही.
शेवटच्या प्रश्नाबाबत एक रोचक थिअरी आहे. लॉ ऑफ ऍट्रॅक्शन. इथे म्हणणे असे की तुम्ही ज्या गोष्टींचा सतत विचार करता त्या तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. याचा अनुभव अजूनपर्यंत आलेला नाही, पण हे वाचल्यापासून आम्ही शकिरादेवींचा सतत विचार करत असतो. :-)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
आकर्षणाचा नियम - अधिक माहिती
Law of Attraction विषयी Rhonda Byrne यांच्या The Secret या पुस्तकांत चांगली माहिती दिली आहे व त्या नियमाच्या खरेपणाचा अनुभव घेण्यासाठी काही व्यवहार्य प्रयोग व सूचनाही त्यांत दिल्या आहेत. मला स्वतःला त्या नियमाचे (हे पुस्तक वाचण्यापूर्वीही) बरेच लहान-मोठे अनुभव आले आहेत. तसे ते सर्वांनाच येत असावेत. पण बहुतेक लोक त्यांचे संकलन करून त्यामागचा कार्यकारणभाव न शोधता प्रत्येक अनुभव अलगपणे योगायोग म्हणून सोडून देत असावेत.
सध्या आमच्या वृंदावन, ठाणे येथील अत्रे कट्ट्यावर The Secret या पुस्तकाचे सामुदायिक वाचन चालू आहे. त्यांत सर्व कट्टेकरी रस घेत आहेत.
धन्यवाद
शरदराव,
पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद. संधी मिळेल तेव्हा वाचावे असे वाटते आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
देजा वू
http://www.spiritualresearchfoundation.org/spiritualresearch/spiritualsc...
विजय तुला एकदा वेबसाइटचा लिंक दिली आहे तर त्या वेबसाइटचा पूर्ण अभ्यास करायचा : |||||||||))))((( या वेबसाइट वर सिक्स सेंस / मनवाची भाषा बोलनारा पोपट / मानुस मेल्यावर कुठे जातो / आपण जन्म का घेतो यांसारखी विविध प्रश्नांची उत्तर आहेत.
चित्रगुप्त
नक्की!
कधी कधी एखादा प्रसंग आपल्या बरोबर झालेला नसतांना सुद्धा तो प्रसंग असा वाटतो की मी ह्या प्रसंगात पहीला सुद्धा होतो, तेच स्थळ, तीच माणसे, तोच विषय,... याला काय बोलतात ?
याला आधी वर उपक्रमींनी सांगीतल्याप्रमाणे "डेजा वू" असे म्हणतात. माझे आत्तापण झाले आहे तर! अशीच चर्चा, तीच माणसे, कोणाचे काय प्रतिसाद असतील सर्व मी आधी अनुभवल्यासारखे वाटत आहे - माझ्या सकट! :-)
मेट्रिक्स
"..There is some change in Matrix..." - इति ट्रिनीटी.
आठवा.. मेट्रिक्स मधे निओ ला झालेला देजावू..
तसच काहीसं होत असावं..आपणपण एका मेट्रिक्समधेच रहात आहोत्. या प्रोग्रामच्या भारतीय आवृत्तीचं नाव "माया" असं आहे :-)
मस्त
मलाही हेच आठवत होते. (इथे शेवट थोडा वेगळा आहे. :) )
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
मला पण
मला पण असे कधी तरी होते.
असे घडलेले मला अनुभवायला खूप आवडते. पण क्वचित घडते!
-निनाद