कचऱ्याची करामत

महाराष्ट्र टाईम्स मधला लेख :

तात्कालिक फायद्यासाठी किंवा ठार अज्ञानातून पर्यावरणीय प्रदूषणाकडे काणाडोळा
करणे किती महागात पडू शकते,याचा अनुभव मालाडच्या चिंचोलीबंदर भागात
उभारलेल्या 'माईंडस्पेस संकुला' तील व्यावसायिक आणि रहिवासी घेत आहेत.
मालाडच्या डंपिग ग्राउंडवरील कचऱ्याची भर दलदलिच्या जमनिवर घालून
त्यावर हे संकुल उभे राहिले आहे.या संकुलात नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच
बिपीओ त्यांच्याबरोबर निवासी वसाहती हि आहेत.
मात्र गेल्या पाच वर्षात या संकुलात संगणक, वातानुकूलन
यंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.
हे प्रमाण एवढे आहे की अनेक कपन्यांनी या संकुलातील संगणक वा अन्य
यंत्रणांच्या नियमित देखभालीची कंत्राटे घेणे बंद केले आहे.
महागड्या यंत्रणा अकाली निकालात निघत असल्यामुळे प्रचंड नुकसान येथील
कंपन्यांना सोसावे लागत आहे. बिगरसरकारी तज्ज्ञ संस्थेने केलेल्या अभ्यासातून
असे आढळले की कोणती ही रासायनिक प्रक्रिया न करता दलदलिच्या जमिनीवर
टाकलेला कचऱ्याचा भराव हे या समस्येचे मूळ कारण आहे. हा कचरा जमिनीखाली
सडत असून त्या प्रक्रियेत सल्फर डायॉक्साईड , नायट्रोजन ऑक्साइड , हायड्रोजन
सल्फ़ाईड , मिथेन , कार्बन मोनॉक्साईड यासारखे रासायनिक वायू तयार होतात.
जमिनीला असलेल्या भेगांतून ते हवेत मिसळतात.त्यांच्या संपर्कात येणाऱ्या धातूवर
रासायनिक प्रक्रिया होते. याचाच परिणाम संगणक , वातानुकूल यंत्रणा तसेच अन्य
उपकरणे यांतील धातूचे भाग निकामी होण्यात होतो.
कोट्यवधी रुपयांची गुंतुवणुक या संकुलात आहे.
बांधकाम चालू असताना , कचऱ्याच्या भरावर रासायनिक प्रक्रिया करायला हवी होती.
याची जाणीव कोणालाही होऊ नये , हे अज्ञान की गुन्हेगारी स्वरूपाची बेपर्वाई ?
ज्यांनी ही संकुले बांधली ते पैसे घेऊन नामानिराळी झाले आहेत
आणि कोट्यवधी ज्यांनी गुंतवले, त्यांची प्रदूषणामुळे कोंडी झाली आहे.
या जागीचे प्रदूषण रोखण्याचा मार्ग आहे की नाही ते अजून स्पष्ट झाले नाही
आणि असला तरी प्रचंड खर्चीक असणार हे उघड आहे. धातूवर जे रासायनिक प्रक्रिया
करतात ते मानवी शरीरासाठी सुरक्षित असणे शक्यच नाही. मानवी आरोग्याचे रूपाने
येथील कर्मचारी आणि रहिवासी किती किंमत मोजत आहेत , याचेही हिशोब मांडले
गेले पाहिजेत.
मला वाटत या आणि अश्या कितीतरी बाबतीत सामान्य
माणूसच किंमत मोजतो.
अशा बेपर्वा आणि स्वार्थी माणसांमुळे सध्या कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत.
मग ते अनअधीकृत झोपड्या, बिल्डिंग, रस्ता असे अनेक प्रश्न असोत या सगळ्याला
जवाबदार असणारी माणसं आणि ते अनधिकृतरीत्या चालू देणारी लाच खाणारी
भ्रष्टाचारी माणस यांच्या स्वार्थासाठी सामान्य माणूस आणि निसर्ग किती
वर्ष किंमत मोजणार आहे.
आणि अशा माणसांविरुध काही केलं नाही म्हणून निसर्ग ह्यांच्यासाठी आपल्यालाही
किंमत मोजायला लावणार याची तयारी ठेवा.
(२६ जुलैच्या पावसामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंग मुळे अस लिहावास वाटलं.)

या बाबतीत आणि अशा कितीतरी बाबतीत तुम्हाला काय वाटते. यावर उपाय काय ?

लेखनविषय: दुवे:

Comments

बरोबर आहे!!!!!!!!!!

अगदी बरोबर आहे तुमच. बिल्डरान्ना काय काळजी असणार सामान्य माणसाची???
आणि ज्यान्ना पैशाशी मतलब आहे ते कशाला बघतील इतरान्कडे?

नॉट इन माय बॅक यार्ड

प्रदूषणाबद्दल काहीही करायची वेळ आली की लोकांची 'निंबी'ही पॉलिसी ठरलेली असते. वहानांचा धूर, काजळी नको, पण मी काही आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वहानाने प्रवास करणार नाही. प्लॅस्टिकचे प्रदूषण नको, पण मी काही घरातून निघताना आठवणीने कापडी पिशवी नेणार नाही. ही अनास्था जोपर्यंत संपत नाही तोवर प्रदूषणावर बोलण्यात काही हशील वाटत नाही.
सन्जोप राव

आपल्या घरापासूनच

आपल्या घरापासूनच सुरूवात करायची. शक्य तो कचरा एका कागदी पिशवीत जमा करून मगच कचराकुंडीत टाकावा. ओला कचरा व कोरडा कचरा वेगळा टाकावा. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण ही पर्यावरणाचं रक्षण करू शकतो.

कागदासरख्या गोष्टींचा पुनर्वापर होतो. तत्सम गोष्टी पुन्हा वेगळ्या स्वरूपात वापरू शकतो. कागदाचा पुनर्वापर करून नवीन कागद तयार होतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुनः पुन्हा वापरात आणता येतात जसं काच, वृत्तपत्रं, मासिकं, कार्डबोर्ड, लाकूड, लिखितं, पेप्सी किंवा तत्सम पेयांच्या कॆन्स, इतकच नाही तर आपल्या घरगुती वापरातील वाया जाणार्या अनेक गोष्टी जसं स्वयंपाक घरातील कचरा, फळ भाजीपाल्याची सालं, देठं, उरलेला चोथा.... एक ना अनेक... अशा गोष्टी उघड्यावर पडल्यास त्या कुजून जाउन सभोवतालचे वातावरण खराब होते. त्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास पर्यावरणाची हानी होत नाही परंतू होणारी हानी कमी होते. जसं प्लास्टिकच्या पिशव्या पुन्हा वापरात आणता येत नाहीत. त्यामुळे एक तर त्यांचा वापर टाळावा अथवा त्या पुन्हा पुन्हा वापरात आणव्या. अन्यथा कागदी पिशव्यांचा वापर करावा. प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकत नाही. त्यामूळे त्याचा वापर शक्यतो टाळावा.
प्लॆस्टीकच्या पिशव्या फेकून न देता पुन्हा वापराव्या अन्यथा जर पुन्हा वापरात आणता येत नसतील तर शक्यतो त्यांचा वापर टाळावा. त्या ऐवजी कागदी पिशव्या अथवा घरच्या कापडी पिशव्या वापराव्या.

स्वयंपाक घरात भाज्यांचे देठ, शेंगादाण्याची सालं, कणकेचा कोंडा (काढत असल्यास), कचरा जास्त होतो. हा फेकून न देता जर घरा मागच्या बागेत पुरला तर त्याच्या पासून कंपोस्ट खत तयार करू शकतो. तसंच चहाचा चोथाही खत म्हणून घालता येतो.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा वापरात आणू शकतो. उरलेलं अन्न फेकून द्यायच्या अथवा मोलकरणीला देण्या ऐवजी गच्चीवर टाकल्यास पक्षी खातात. अथवा रस्त्यावरून जाणार्या प्राण्यास जसं गाय, कुत्रा मांजर यांना देऊ शकतो.

घराबाहेर कचरा करताना पर्यावरणाचा विचार जरूर करावा. ज्याच्या पुनर्वापराने पर्यावरणाला होणारी हानी टळते अशा गोष्टींचा वापर जस्त करावा व ज्या गोष्टीचा वापर पुन्हा पुन्हा होत नाही अशा गोष्टीचा वापर टाळावा.

तुम्ही काय म्हणता?

पल्लवी

हे हे हे

कोणीच काही म्हटलं नाही....
हा हा हा

पल्लवी

पल्लवी

आपण एवढी मेहनत घेउन हा कचरा टाकणार कूठे तर कचऱ्याच्या डब्यात मग

शेवटी तो जाणार कुठे डंपिंग ग्राऊडवरच ना. असो आपण आपल काम करत

राहिच. पण तुम्ही छान माहिती दिलीत.

 
^ वर