संकेतस्थळ: त्रुटी

मंडळी मी ह्या साइटवर नविन आहे. इंटरनेटवर भटकता भटकता इथंवर येउन पोहोचलो. इथल्या बर्‍याच चर्चा आणि लेख मला इंटरेस्टींग वाटल्याने मी इथले सभासदत्व घेतले. इथल्या चालकांचा हे स्थळ निर्माण करण्यातला हेतू उदात्त असणारच ह्याची खात्री असल्याने हे लेखन करण्यास धजावत आहे. इथल्या संपादक मंडळापैकी कुणी एक माझे प्रतिसाद विनाकारण उडवुन वर माझ्यावर व्यक्तिगत आरोप केल्याचा आळ आणतो आहे. सदर घटना येथिल सर्व सभासदांच्या आणि चालकांच्या लक्षात यावी म्हणून इथं मांडत आहे.

मी कुणावरही वैयक्तिक पातळिवर आरोप केले हे सिद्ध करून दाखवावे असे माझे त्या संपादन मंडळातील सदस्याला उघड आवाहन आहे. अन्यथा माझ्यावर ठेवलेला ठपका सदर सदस्यानेच त्वरीत मागे घ्यावा. त्या निमित्त ह्या विषयी इथल्या सदस्यांची मते जाणुन घ्यायलाही आवडेल. माझेच काही चुकत असल्यास तसे देखिल स्पष्ट सांगावे प्रत्येकाच्या मताचा मी तरी आदरच करतो.

धन्यवाद!

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म!

कुठे? काय? कधी ?

काही तर सांगा...
गुंडोपंतांना भलतीच रुची (होती) अशा गोष्टींत.

हम्म!
परत पान एक वरून सुरु...?

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

प्रतिसादा बद्दल धन्यवाद गुंडोपंत. विकास ह्यांनी सुरू केलेल्या गांधीजींच्या चर्चे विषयी मी बोलत आहे.

मी

अच्छा गांधीजी!

(असेही तो विषय अतिच चघळू आहे. तुम्ही टाका एक चर्चा. "गांधीवादाची मुळ बीजे सावरकरांनी रुजवली" वगैरे सनसनाटी शीर्षक द्या. ती पण ओसंडून वाहील यात शंका नाही!)

आपले मी काही वाचले नाही बॉ! असेल तर कल्पना नाही... मी तरी माझे "वादग्रस्त प्रतिसाद" आधी माझ्याकडे वाचवतो मगच प्रकाशित करतो.
मग संबंधितांना व्य नि ने कळवतो. मग चर्चेचा तो फाटा व्यनि मध्ये सुरु राहतोच.
असो,
आपला
(फुकटचा सल्ले देवू)
गुंडोपंत

अच्छा...

..आणि प्रतिसाद वादग्रस्त नसेलच तर काय करता?

सोडून देतो

सोडून देतो हॅ हॅ हॅ!!!

बाकी तुम्हाला संपादक माहित आहे म्हणजे लैच पावरबाज आसामी दिसताय तुमी!

आपला
गुंडोपंत

नाही हो!

नाही हो मला संपादक कोण आणि किती काहीही माहित नाही. पण माझा कयास मात्र पक्का आहे, त्यावर तुमच्याशी पैज लावायला देखिल तयार आहे. त्याचं काय आहे इथं जरी मी नविन असलो तरी अनेक इंग्रजी साईटांवर हे प्रकार भरपूर बघीतले आहेत. बोला लावताय पैज?

आणि बाय द वे, मी सोडून देणार्‍यातला नाही हो! जमेल तितके लावुन धरतो!! गांधीजींचीच शिकवण म्हणा!! :)

क्या बात है!

क्या बात है!
बिंधास सांगा की मग... यांनीच केला हा 'चावटपना' म्हणून!

आपला बाकी इंग्रजी साईटवर काही नाही बॉ! आपलं इंग्रजीच इतकं डेंजर आहे की... जाऊ द्या नकोच तो विषय! आमचे इंग्रजीचे मास्तर बोलले आहेत ते पुरे आहे. ;))

आपला
गुंडोपंत

चावटपना

अहो नाव लिहून झाले होते!! तो प्रतिसाद सुद्धा कापला ना त्यानी!! आता काय उपयोग?

नैऋत्यराव,

आपण आपली तक्रार विस्तृतपणे व्यवस्थापन किंवा संपादन मंडळ यांना व्य नि पाठवून कळवावी..

आपला,
(सूचक) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

धन्यवाद

उपक्रम ह्या आय.डी. वर मी खरड ठेवली आहे. त्यांचे (काहीसे) समाधानकारक उत्तर देखिल आले आहे. परंतु मला स्पष्टीकरण हवे आहे ते सदर संपादक मंडळातील व्यक्तिचे. जी व्यक्ती आता मात्र साळसुद मौन पाळून आहे.

फिरता फिरता

मंडळी मी ह्या साइटवर नविन आहे. इंटरनेटवर भटकता भटकता इथंवर येउन पोहोचलो.

असे असूनही आपल्याला पहिल्याच भेटीत संपादक मंडळातील व्यक्ती कळल्या हे आश्चर्यजनक आहे.

-- आजानुकर्ण

तेच तर!

तेच तर!
म्हणूनच मी पण चाट झालो हो!
इतके दिवस पछाडून, भांडाभांड करूनही त्या संपादकाचा तलास लागला नाही मला...
जाउ द्या... आपण कुठे इतके स्मार्ट?

आपला
ढ गुंडोपंत

अजानुकर्ण

संपादक मंडळातील व्यक्ती (व्यक्त्या ह्या अर्थाने) कोण हे मला माहित नाहीत तसा मी कुठेही दावा केलेला नाही. एका नावा बाबतीत निव्वळ कयास केला आहे. एज्युकेटेड् गेस् !! तेव्हा कृपया भलतीच वाक्ये माझ्या तोंडात भरू नयेत.

कयास

मी देखील संपादक मंडळातील व्यक्ती (व्यक्त्या या अर्थाने) आपल्याला कळल्या आहेत असा एज्युकेटेड गेस केला होता. भलती वाक्ये तोंडात घालणे हा हेतू नव्हता.

गैरसमज झाला असल्यास क्षमस्व!

(क्षमाभिलाषी) आजानुकर्ण

कयास

नाही हो मला संपादक कोण आणि किती काहीही माहित नाही. पण माझा कयास मात्र पक्का आहे, त्यावर तुमच्याशी पैज लावायला देखिल तयार आहे.

आम्हाला हे वाक्य या वाक्यासारखे वाटते.
"माझा देवावर अजिबात विश्वास नाही, आपण पक्के नास्तिक. पण सोळा सोमवारांचे व्रत मात्र नाही चुकवत, मग काही होवो."

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अनुभव

माझ्या आतापर्यंतच्या उपक्रमवरील अनुभवावरून (21 आठवडे 3 दिवस! :)) असे सांगू शकतो की उपक्रमच्या संपादन मंडळाने निरपेक्षपणे काम केले आहे आणि सदस्यांनीही स्वतःहून इथल्या धोरण, नियम जे काय असतील ते त्यांचे पालन करून संपादन मंडळाला काही काम करावे लागू नये याची काळजी घेतली आहे.

तेव्हा झाले गेले सोडून देऊन कोणत्या तरी चांगल्या विषयावर चर्चा करूया, कसें? :)

संपूर्णपणे सहमत

नवीन यांनी मांडलेल्या मताशी संपूर्णपणे सहमत आहे. कृपया एखाद्या घटनेवरुन निष्कर्षावर उडी मारू नका.
जयेश

प्रगती

हल्लीची लहान मुले फारच चुणचुणीत असतात. मोबू, संगणक झटकन आत्मसात करतात. ही प्रतिभा आता नवीन सदस्यांमध्येही दिसू लागली आहे ही समाधानाची बाब आहे. त्यामानाने आम्ही फारच ढ. आम्हाला अशा गोष्टींबद्दल फारच थोडी माहिती असते.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आदर

माझेच काही चुकत असल्यास तसे देखिल स्पष्ट सांगावे प्रत्येकाच्या मताचा मी तरी आदरच करतो.

आपल्या या मताचा मी आदर करतो. तरी देखील आपल्या सदस्यात्वाचा कालावधी हा उपक्रमावरचे या अगोदरचे साद प्रतिसाद फक्त चाळायचे झाले तरी खुपच कमी आहे. कधी कधी उपक्रमाच्या ध्येयधोरणाशी विसंगत असे लिखाण उत्साहाच्या भरात होते. ते काटले गेले तर दु:ख करु नये. माझे देखील असे काही वेळा काटले गेले आहे. आपण लिखाण करत रहा. या प्रवासात आपले लेखन आवडलेले /न आवडलेले सर्व भेटतील. लेखनाच्या अगोदर उपक्रमावरचे वाचन तसेच ध्येयधोरणे जरुर पहावीत . हे इतर संकेतस्थळांनाही लागु आहे.
प्रकाश घाटपांडे

आता असं म्हणताय तर.........

माझेच काही चुकत असल्यास तसे देखिल स्पष्ट सांगावे प्रत्येकाच्या मताचा मी तरी आदरच करतो.

आता असं म्हणताय तर बोलून घेतो.

असं समजा, तुम्हाला नोकरी आणि पगार पसंत पडला म्हणून नवी नोकरी धरलीत आणि तासाभरात ऑफिसात हे बरं न्हाई, खुर्ची टोचते, समोरच्या टेबलावरचा ढापण्या माझ्याकडे रोखून पाहतो, पगार ३० तारखेला संध्याकाळी हातात पडला पाहिजे - १ तारखेला नाही अशा तक्रारी म्यानेजमेंटकडे केल्यात तर पहिल्या दिवशी तुमचं काय होईल?

त्यातून, तुम्ही आणखी भर घातली की ती सायबांची छमकछल्लो शेक्रेटरी आहे ना, तिचं आणि सायबांच काहीतरी लफडं आहे असा माझा कयास आहे अशी वावडी तुम्ही संपूर्ण ऑफिसात उठवलीत तर काय होईल?

नोकरी नवी असते तेव्हा नव्यासारखं राहायचं, कुरापती काढायला आहे चिक्कार वेळ असं मला वाटतं आणि हे नोकरीचे कायदेकानू उपक्रमावरही थोडेफार बदलून चालून जातील असं वाटलं.

वरंच सगळं हलकेच घ्या हो! आता जरा गंभीरपणे सांगतो,

आम्ही रोज येऊन वाचणारी मंडळी आहोत. आमचेही प्रतिसाद उडवले गेले पण मग आमच्याच लिखाणात काही त्रुटी आहेत का याचा विचार इथल्या बर्‍याचजणांनी केला. उपक्रम त्यामुळे व्यवस्थित सुरू आहे. तेव्हा मुबलक अनुभवाशिवाय त्रुटी दाखवण्यापेक्षा काहीतरी माहितीपूर्ण वाचायला द्या लवकर.

- राजीव.

अरे वा

23 तास 23 मिनिटे इतक्या मोठ्या उपक्रमावरच्या अनुभवाच्या जोरावर बरीच मजा केलेली दिसतेय तुम्ही राव :)

माझेच काही चुकत असल्यास तसे देखिल स्पष्ट सांगावे प्रत्येकाच्या मताचा मी तरी आदरच करतो.

चूक हि (आपल्या सगळ्यांचीच आणि आता त्यात मीही आलो) की माहितीपर लिखाण, चर्चा वगैरे ऐवजी हा काहितरी वाद चघळत बसतोय आपण.. तवा लवकर छान वाचणेबल लिवा. :) दिवसभरात एखादं लिखाण येतंय आणि बराच वेळ मात्र ह्या चर्चेसारख्या फाल्तु विषयवर खर्च होतोय :(

-(दु:खी)ऋषिकेश्

२३ तास आणि २३ मिनिटे

फक्त २३ तास आणि २३ मिनिटात २३ प्रतिसाद? जागतिक विक्रमात या उपक्रमाची नोंद व्हावी. आम्हाला इथे लिहिणार्‍या सदस्यांची खरी नावेपण माहीत नाहीत. माहीत आहेत ते त्यांच्या पसंतीचे विषय, त्यांच्या लिहिण्याच्या लकबी, त्यांचा प्रांजळपणा, त्यांची विविध विषयांतली गती आणि ते देत असलेली माहिती. आमच्याच्याने संपादकमंडळातली बित्तंबातमी मिळवणे तर दूरच.--वाचक्‍नवी

शेवटी

जाउ द्या!!
आता 'नाव घ्या' असा आग्रह तरी किती करणार... ;)))

आपला
ङूम्दॉप्आम्टा

 
^ वर