माहिती द्या.

नमस्कार मित्र हो

काही दिवसापासून शेअर बाजारात फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे.
काही महिन्यापूर्वी उपक्रमावर शॉर्ट सर्किट , तात्या यांचे नियमीत शेअरबाजारावर लेख येत. पण हल्ली बंद झाले आहेत. तरी पुन्हा या विषयावरील लिखाण सुरु करावे व आपल्या सारख्या सर्व मान्यवरचे विचार लाभवेत. हि विनंती.

कळावे
आपला नम्र
शेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

मार्केट

शेअर बाजाराच्या गेटासमोर तो बैल बसवल्यानंतर बाजारात जी घसरण सुरु झाली आहे की ज्याचं नाव ते. आता मी काही या विषयातला जाणकार नाही पण स्वबुद्धीने चिऊ-काऊच्या घासाएवढा पैसा आम्हीही मार्केटमध्ये टाकू लागलो आणि थोडंफार कळू लागलं. खाली जे लिहीलंय त्यात फार काही नवीन आहे असं नाही. पण मार्केटवर नजर न ठेवू शकणार्‍या सामान्य गुंतवणूकदारांनी झटपट पैसा मिळवण्याच्या नादात लाखाचे बारा हजार करुन घेऊ नये यासाठी हे महत्त्वाचे आहे.

मला वाटलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी:
१. कंपन्यांची निवड: फंडामेंटली चांगल्या कंपन्या निवडून त्यात निवेश करणे. हा अभ्यास् करणे मला अजूनही जमत नाही पण सोमवारी सकाळ, लोकसत्ता मध्ये वसंतराव पटवर्धन, विलास महाजन, किरण जाधव, गोपाळ गलगली यांचे लेख् येत असतात ते वाचनीय असतात.उदा: http://www.loksatta.com/daily/20080128/nav02.htm किरण जाधव यांच्या टीपा शक्यतो टेक्निकल ऍनालिसीस करून् दिलेल्या असतात. शेअरची किंमत जास्त आहे म्हणून तो टाळू नये. महाग म्हणण्यापेक्षा तेवढ्या किंमतीचा तो आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे. (वर्थ म्हणायचं होतं मला :-) )
२. वेळ देणे: आता तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही काही काळासाठी त्या कंपनीचे मालक असता. मग आपल्या कंपनीची वाटचाल कशी होते हे पाहण्यासाठी तिला थोडा वेळ तरी द्यायला नको का? सुरुवातीला मी शेअर लगेच विकायचो. अरविंद मिल, पीटीसी मी घेतल्यापासून १ महिन्यात विकले आणि ६ महिन्यात दुप्पट झाले. पीटीसी तर मागच्या क्रॅशमध्येही १०० खाली आला नाही. नुकत्याच गडगडलेल्या बाजारात डुबणार्‍यांमध्ये डे ट्रेडर्स, फ्युचर ऑप्शन वाले आणि मागच्या वर्षात आयपीओ आणि एकंदरीत शेअर् बाजारात झालेल्या वाढीमुळे नुकतेच आकर्षीत झालेले जास्त होते. लाँग टर्म इन्वेस्टर लोकांना तोटा झाला असला तरी त्यांनी पुढची काही वर्षे न विकण्यासाठी ही खरेदीची संधी याच दृष्टीने पाहीले असावे.
३. वेळ साधणे: अशा फंडामेंटली स्ट्राँग असणार्‍या कंपन्या चढा भाव दाखवत असल्या तरी बाजारात या ना त्या कारणामुळे घसरण होतच असते. तेव्हा काही ठराविक कंपन्या आधीच शोधून ठेवून पडत्या भावाने खरेदी करावी. १५-२०% परताव्याची अपेक्षा रास्त आहे. या उप्पर मिळतो तो बोनस.
४. तोटा आणि फायदा बुक करणे: मी एखादा शेअर घेतला की तो हमखास पडतोच असे म्हणणारे कित्येक लोक् आजूबाजूला दिसतील. पण तो खूप पडण्याआधी थोड्याफार तोट्यात बाहेर पडणे इष्ट असते. तसेच एखादा शेअर खूप वाढला की त्यातही झालेला नफा काही शेअर विकून खिशात टाकणे उत्तम. साधारणपणे एकूण संख्येपैकी २५% शेअर लोक विकून टाकतात. मग पुन्हा तो खाली आला की विकत घेतात. पण अर्थात यासाठी अधून मधून मार्केटवर आणि अशा शेअरवर नजर असली पाहिजे आणि अभ्यास असला पाहिजे.
५. उद्दीष्ट ठरवणे: ही एक अवघड गोष्ट आहे. आपल्याला कधी किती पैसा लागेल त्यानुसार ते शेअर खरेदी करून ठेवायचे आणि तोपर्यंत् हात नाही लावायचा वगैरे वगैरे. पण आत्तापुरतं तरी एवढं समजलंय की दीर्घ मुदतीसाठी खरेदी करायची. कंपनीकडून् मिळणार्‍या बोनस्, स्प्लिट, डिव्हिडंडने मिळणारा फायदा कालपरवाच्या आपटीला पुरुन उरतो.
६. म्युचुअल फंडः काही पैसे यसायपी आणि काही पैसे मार्केट पडेल तेव्हा ठोकमध्ये टाकावे. ३-५ वर्षे मुदतीसाठी ठेवून द्यावे. यासाठी चांगले फंड निवडावे. valueresearchonline.com सारख्या साईटस उपयोगी पडतीलंच.

असो. आजानुकर्ण, तात्या वगैरे मंडळी अजून टीपा देतीलच. आपल्या टीपा म्हणजे ह्या अशाच असणार चांगले निवडून घ्या आणि उशाखाली ठेवून द्या. स्वतःच लगीन, मग पोरीचं लगीन, घर वगैरे सारख्या एकदम खूप हार्ड कॅश लागणार्‍या गोष्टींसाठी खर्च करण्यासाठी.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

छान

छान माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद!

 
^ वर