उपक्रमावरील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बदलांची नोंद

सदस्यांच्या माहितीसाठी उपक्रमावर होणार्‍या तांत्रिक व व्यवस्थापकीय बदलांची माहिती या पानावर दिली जाईल.

गुरूवार, १२ जुलै २००७

बुधवार, दि. ११ जुलै रोजी उपक्रम तांत्रिक बदलासाठी काही वेळ अनुपलब्ध होते. उपलब्ध झाल्यानंतरही काही काळासाठी लेख, चर्चा आणि प्रतिसाद आपोआप प्रकाशित होत नव्हते, आता ती अडचण नाही. सर्व सदस्यांच्या आणि वाचकांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

उपक्रमावरील वाढत्या लेखनामुळे आणि वाढत्या सदस्यसंख्येमुळे व्यवस्थापकीय आणि संपादकीय जबाबदार्‍यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वारंवार विनंत्या, सूचना करूनही उपक्रमाच्या लेखनविषयक धोरणाशी सुसंगत नसलेले लेखन करत राहणार्‍या सदस्यांच्या लेखनासाठी प्रकाशनपूर्व संपादकीय परवानगी आवश्यक करणे आणि/किंवा इतर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे. हे शक्य होण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल आता केले आहेत. हा निर्णय संकेतस्थळाच्या आणि सर्व सदस्यांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने घेण्यात आलेला आहे. या निर्णयामागची अपरिहार्यता लक्षात घेऊन सर्व सदस्य व्यवस्थापनाला आणि संपादन मंडळाला संपूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे. उपक्रमवरील लेखनविषयक धोरण आणि सर्वमान्य शिष्टाचार यात न बसणारे लेखन आढळल्यास सदस्यांनी कृपया निदर्शनास आणून द्यावे.

लेखनविषयक धोरणांचे स्वयंस्फूर्तीने पालन करणार्‍या बहुसंख्य सदस्यांचे उपक्रम व्यवस्थापन आभारी आहे, त्यांनी नि:शंकपणे लेखन करत राहावे.

अधिक माहितीसाठी - लेखनविषयक मार्गदर्शक तत्त्वे

प्रश्न, शंका, सूचना, अडचणी निरोपातून कळवाव्यात.

 
^ वर