पर्यावरण

पर्यावरण हा सध्यस्थितीत महत्वाचा होत असलेला, जाणवणारा आणि तरीही आचरणात आणण्याची वेळ झाल्यावर दुर्लक्षित होणारा विषय आहे. अमेरिकेतील मूळ जमातीत (नेटीव्ह अमेरिकन्समधे) अशी म्हण आहे की, " हे जग तुम्हाला आंदण म्हणून मिळालेले नाही, तर तुमच्या पुढल्या पिढ्यांसाठी राखून ठेवण्याची एक जबाबदारी म्हणून मिळालेले आहे..." भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून "पृथ्वीला" माता अशा योग्य नावाने संबोधण्यात आले आहे. जाणीवपूर्वक जगण्यासाठी निसर्गाची पूजा आणि निसर्गातील देवता हा तर हिंदू तत्वज्ञानातील एक भाग आहे ज्याचा अर्थ काळाच्या ओघात आपण विसरून गेलो...

आज एकीकडे भरमसाट प्रदूषण, वातावरण बदलामुळे घडत असलेले निसर्गातील प्रकोप आणि बिघडत असलेले सार्वजनिक आरोग्य या खरे म्हणजे प्रत्येकाच्याच काळजीच्या गोष्टी असतात. या समुदायात आपण याचिषयीचे आपले अनुभव कथन करू शकता तसेच पर्यावरणातील अनेक विषयांपैकी कुठल्याही विषयावर लिहू शकता अथवा चर्चा घडवायला मदत करू शकता. अंतिम ध्येय असे ठेवूया की या विषयाची जाणीव करून घेऊन स्वतःमध्ये आणि आपल्या सभोवताली चांगले बदल करायला हातभार लावू. उदाहरणादाखल काही विषयः

* मला जाणवणारे प्रदूषण - हवा, पाणी, जमीन, कचरा इत्यादी
* लक्षात येण्याजोगे काही वातावरणीय बदल
* आपण व्यक्तिगत आयुष्यात काय बदलले पाहिजे? काय माहिती असली पाहिजे?
* पर्यावरणीय सामा़जिक चळवळी - अनुभव अथवा जवळून पाहीलेल्या

लेखनविषय:
 
^ वर