दासबोध : स्वाध्यायाद्वारे अभ्यासाची संधी

श्रीमद दासबोध अभ्यासक्रम

आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,अंतरिक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही.
अशावेळी काही व्यावहारिक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे.
दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात.आत्मविश्वास वाढवतात. साधेच औषध पण अत्यंत गुणकारी असा अनेक लोकांचा अनुभव आहे.
दासबोधाच्या वाचनाचे निश्चित फळ आहे- आता श्रवण केलियाचे फळ / क्रिया पालटे तात्काळ - अशी निः संदेह ग्वाही समर्थ स्वःत देतात. दासबोधाचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून आणि अभ्यासाची गोडी लागावी म्हणून, गेल्या अनेक दशकापासून, श्रीमद दासबोध अभ्यासक्रम चालवला जातो. श्री. समर्थ सेवा मंडळाच्या 'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' या उपक्रमामुळे दासबोधाचा अभ्यास आता सहज शक्य झाला आहे.आजपर्यंत १००,०००++ लोकांनी या ज्ञानपाणपोईचा लाभ घेतला आहे.

  • हा अभ्यासक्रम आहे, पारायण नाही. समर्थांना पारायण नव्हे, आचरण अपेक्षीत आहे.
  • हा स्वा -ध्याय आहे,यासाठी गुरू नाही ( दासबोध ग्रंथ हाच गुरू ), पूजा-अर्चा, भजन-सत्संग अथवा प्रवचनाला जाण्याचे प्रयोजन नाही.तासिका नाही, चाचणी नाही, सराव अथवा पाठांतर नाही. स्वाध्याय अशासाठी की त्यामुळे अभ्यासाला शिस्त लागते.
  • परीक्षा नाही, गुण/ श्रेणी नाही, आचरण आणि प्रचिती हेच गुणपत्रक! प्रवेश फी नाही. प्रवेश परीक्षा नाही.
  • एक स्वाध्याय लिह्ण्यास साधारण ५० मिनिटे लागतात. ६०% प्रश्न हे 'एका वाक्यात उत्तरे ' या स्वरुपात!
  • प्रवेश पात्रता- वयाची अट १८ वर्ष पूर्ण , मराठी लिहीता- वाचता येणे, आणि नवीन शिकण्याची आवड.
  • दर महीन्याला एक याप्रमाणे पहील्या वर्षी 'प्रवेश' चे १२ स्वाध्याय, दुसऱ्यावर्षी 'परीचय' चे १२ स्वाध्याय आणि तिसऱ्या वर्षी 'प्रबोध’चे १२ स्वाध्याय, असे एकूण ३६ स्वाध्याय घरच्या घरी पुस्तकात बघून सोडवायचे आणि नेमून दिलेल्या 'समिक्षकांकडे' पोस्टाने पाठवायचे अथवा इ-मेल द्वारे पाठवायचे ! इतके सोप्पे !
  • पुस्तके अत्यल्प किंमतीत उपलब्ध ( एकूण ३ वर्षांकरीता अंदाजे ७५ रुपये + ट.ख़.).अथवा पुस्तके आंतरजालावरून डाऊन लोड करता येईल.
  • पुस्तकांचा, लेखन साहीत्य, आणि टपाल खर्च अभ्यासार्थीने करणे अपेक्षित. अथवा अभ्यासक्रम आता इ-मेल द्वारे देखील करता येईल.

प्रवेश सुरू - जानेवारी २००९ साठी प्रवेश चालू आहे.
पत्रव्यवहारासाठी आणि अधिक माहितीसाठी, आपल्या पत्त्याच्या पाकीटासह खालील पत्त्यावर संपर्क करावा,
'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' श्रीसमर्थ सोसायटी. धन्वंतरी सभागृहाच्या मागे, पटवर्धन बाग, पुणे -४११००४
अथवा - ई पत्र पाठ्वावे- vitekar@gmail.com / भ्रमण ध्वनी ०९८८१४७६०२०

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखनविषय: दुवे:
 
^ वर