साहिरची आवडलेली गाणी - १ जिंदगी जुल्म सही
आवडाबाई यांनी माझ्या प्रतिसादवर नुसती यादी असल्याची टिप्पणी केली. म्हणून माझ्या आवडीची काही गाणी इथे देत आहे.
हे गाणे "शगुन" चित्रपटातले आहे, संगीतकार - खय्याम, गायिका सुमन,
साहिरने लिहिलेली या चित्रपटातली सर्व गाणी उच्च दर्जाची आहेत. शगुन व फिर सुबह होगी या दोन चित्रपटातील गाणी माझ्या मते साहिरची सर्वोत्कृष्ट ठरावीत. जमेल तसा यातील गीतांचा परिचय करून देईन. कसे वाटले ते जरूर कळवा.
या गाण्याचे वैशिष्ट्य असे की सुरुवात जरी दर्दभरी वाटली तरी 'कुठल्याही परिस्थितीत आम्ही आशावादी राहू "हा संदेश साहिरने अत्यंत कलात्मकतेने आणि तर्कशुद्ध युक्तिवादाने दिला आहे.
ज़िंदगी ज़ुल्म सही ज़ब्र सही ग़म ही सही ।
दिल की फरियाद सही रूह का मातम ही सही ।
ज़िंदगी ज़ुल्म सही ...
रूह - आत्मा, मातम - शोक
हम ने हर हाल में जीने की कसम खाई है ।
(अ)गर यही हाल मुकद्दर है तो शिकवा क्यूँ हो?
हम सलीकेसे निभादेंगे जो दिन बाकी हो ।
चाह रूसवा न हुई दर्द रूसवा क्यूँ हो?
ज़िंदगी ज़ुल्म सही ...
मुकद्दर - नशीब, शिकवा - तक्रार, सलीकेसे - सलोख्याने, समजुतीने, चाह - आनंद, रूसवा - बदनाम
हमको तकदीरसे बेवजह शिकायत क्यूँ हो?
इसी तकदीर ने चाहत की खुशी भी दी थी ।
आज अगर काँपती पलकों को दिये है आँसू ।
कल थिरकते होठों को हँसी भी दी है ।
ज़िंदगी ज़ुल्म सही ...
बेवजह - विनाकारण,
हम है मायूस मगर इतने मायूस नहीं ।
एक ना एक दिन तो अश्कोंकी लडी टूटेगी ।
एक ना एक दिन तो छटेंगे गमोंके बादल ।
एक ना एक दिन तो उजाले की किरन फूटेगी ।
ज़िंदगी ज़ुल्म सही ...
मायूस - उदास, लडी - माळ
विनायक