उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गणित
शैलेश
March 17, 2007 - 5:36 pm
गणित हा सगळ्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा गाभा आहे. गणित ही प्रगतीची भाषा आहे. मराठीत गणित या विषयाचे अत्याधुनिक ज्ञान यावे यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'गणित' हा समुदाय येथे सुरू करीत आहे.
येथे आपण पुढील रितीने सहभागी होऊ शकता -
१. गणित या विषयावर मराठीत लेखन करून,
२. गणिताचा मराठीत प्रचार कसा करता येईल त्याबाबत चर्चा करून,
३. गणित जगतात नविन काय चालले आहे याच्या बातम्यांचे दुवे देवून,
४. या यादित भर घालून, :)
चला, मायमराठीत गणितावर उत्तमोत्तम उपक्रम चालवू या!