बालसाहित्य

स्वागत! माझे लहानपण उत्तमोत्तम बालसाहित्यामुळे बहरले असे मी समजतो. परंतू माझ्यामते कालपरत्वे हल्लीच्या मुलांना आवडेल अश्या धाटणीचे साहित्य फारसे (काही अपवाद सोडल्यास) मराठी भाषेत निर्माण झालेले नाही. हल्लीच्या मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी त्यांना समजेल, आवडेल अश्या पद्धतीचे अधिकाधिक लेखन होणे गरजेचे आहे. हीच मुले उद्याचा वाचकवर्ग आहेत, त्यामुळे मराठीच्या भविष्यासाठीही बालवयातच वाचनाची आवड निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. असे लेखन लगेच निर्माण होईल असे नाही पण आपणच त्याची सुरवात करायला काय हरकत आहे? असे लेखन निर्माण व्हावे या इच्छेने हा समुदाय चालू करत आहे. हा समुदाय मुख्यत्वे करून वयवर्षे ७ ते १५ पर्यंयतच्या मुलामुलींसाठी मराठी भाषेत लिहिल्या जाणार्‍या माहितीपर लेखनासाठी आहे. आपणही ह्यात सहभागी होऊन आपल्या मुलांना रूचेल अश्या पद्धतीने माहितीयुक्त लेखांनी आपले योगदान तर देऊ शकताच; त्याच बरोबर इथे प्रसिद्ध होणारे लेख मुलांना वाचायला देऊन त्यांच्यात वाचायची आवड निर्माण करू शकता. उपक्रमाच्या बालसभादांची मते, टिका हे बाल साहित्य अधिकाधिक समृद्ध करायला हातभारच लावेल.
मुलांना रुचावे यासाठी ललित अंगाने जाणार्‍या माहितीप्रद लेखनाचेही स्वागत आहे.

बालसाहित्य वाचणार्‍या, लिहिणार्‍या आणि आवडणार्‍या अश्या सार्‍यांचे मनापासून स्वागत आहे!

आजी - आजोबांची विशेष माणसे

आज तर माझी खूप म्हणजे खूपच मजा होती. माझे दुसरे आजोबा पण घरी आले होते. ते पुण्याला राहतात वाड्यात. काय मजा येते तिथे. गेल्यावेळी मी गेलो असताना आजोबांनी मला भोवरा फिरवायला शिकवले होते. तो पण दोरीवाला भोवरा.

आजी - आजोबांच्या वस्तु - ९ (बोरू)

आमच्याकडे या रविवारी बरेच पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात बरीच धांदल होती. दुपारी जेवणं होईपर्यंत सगळे कामात होते. दुपारची जेवणं झाली आणि आई-आजी दमल्याने जरा विसावल्या. आजोबा उरलेल्या कामांची यादी करायला बसले.

आजी - आजोबांच्या वस्तु - ८ (तार)

आज रविवार असल्याने घरात सगळेजण होते. दादा काँप्युटरवर बसला होता. शेजारी आबा काही न बोलता शांतपणे तो काय करतोय ते बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे मेलबॉक्स उघडला, तसंच याहूवरही तो ऑनलाईन गेला. त्याच्या मित्रांशी चॅट सुरू केलं.

आजी - आजोबांच्या वस्तु - ७ (पतंग आणि मांजा)

काल आई "तिळगुळाचे लाडू बनवायला हवेत" असं आजीशी बोलताना म्हणाली. तसा मी हुशार आहेच, लगेच ओळखलं की संक्रांत जवळ येते आहे. मी कालच शाळेत ओमशी बोललो. आमच्यापुढे एक मोठा प्रश्न होता. गेल्यावर्षी आम्ही ओमकडे पतंग उडवायला गेलो होतो.

आजी - आजोबांच्या वस्तु - ६ (चरखा)

सुप्परमॅन सुप्परमॅऽन .. सुप्परमॅऽऽन.. सुप्परमॅन!

आजी - आजोबांच्या वस्तु - ५ (शिवणयंत्र)

काल मी आजी बरोबर फुलं वेचायला गेलो होतो. नंतर देवळातही गेलो. आजीने त्या वेलीवरच्या गुंजादेखील दाखवल्या. मस्त लाल चुटुक गुंजा!

आजी - आजोबांच्या वस्तु - ४ (टाईपरायटर)

काल मी दादाच्या  खोलीत बसून कॉम्प्युटरवर मस्तपैकी गेम्स खेळत बसलो होतो. आबा कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही. माझ्या ३ लेवल्स पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं तर आबा अगदी चष्मा लावून स्क्रीनकडे कौतुकाने पाहत होते.

आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)

आजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं.

पन्नूमावशीचे बाळ (मुलांसाठी सिगारेटविषयी वैद्यकीय माहीती)

आज घरी दुपारी अगदी गडबड गडबड होती. म्हणून मिनलचे बाबा दारात आल्या आल्या मिनल त्यांना म्हणाली, "बाबा आज किती गंमत! अंकिता दुपारी आपल्याकडेच होती खेळायला."
बाबा म्हणाले, "हो का?"

आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)

मी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्‍याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो.

आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)

काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय?

Syndicate content