उत्तम चर्चा आणि पुरस्कार.

उपक्रमावर सध्या 'संस्कृतचे मारेकरी" अशी चर्चा चालु आहे. या चर्चेमध्ये अनेक लोकांनी भाग घेतला आणि अनेक महत्वाचे मुद्दे या अनुषंगाने उपक्रमीच्या लक्षात आले. अनेक गैरसमज काळाच्या ओघात निर्माण होतात आणि एक सामान्य प्रश्न ( तर्क) अश्या गैरसमजांना उघडे पाडत असतो असे मला वाचताना आवर्जुन वाटले.

वरील चर्चेचा धागा वानगीदाखल घेतला आहे आणि अश्याच अनेक ज्ञानवर्धक, विचारांचे खर्‍या अर्थाने आदानप्रदान करणार्‍या चर्चा आपल्याला अश्या संकेतस्थळावर खेचून आणत असतात हे मात्र नक्की.

अर्थातच माझ्या लिहिण्याचा हा उद्द्येश नाही. माझ्या मते अश्या चर्चांना उपक्रमच्या संपादकिय मंडळाने विशेष गौरव करावा ( नेमका कसा याचे स्वरुप मात्र मला सांगता येणार नाही).

यातील ( संस्कृतचे मारेकरी) प्रतिसादातील मुद्द्यांचे संकलन केलेतर वर्तमानपत्रात एखादा लेखही प्रकाशित होऊ शकेल ( असा दर्जा या लेख आणि प्रतिसादात आहे.).

लेखनविषय: दुवे:
 
^ वर