उपक्रम!
हे संकेतस्थळ अधिक चांगले बनवण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे.
कोणत्याही संकेतस्थळावर वावरताना,
- "ही सुविधा खरेच उपयोगी आहे!"
- "या सुविधेत असा बदल झाला तर बरे होईल."
- "अमुक नवीन सुविधा देता येणे शक्य आहे. मी त्यासाठी मदत करू शकेन."
- "हे करताना कधीकधी अशी अडचण येते."
- "या अडचणीवर हा घ्या इलाज ."
असे अनेक अनुभव आपल्याला नेहमी येत असतात. अश्या अनुभवांतून बोध घेऊन खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा समुदाय सुरू केला आहे.
- नवीन सदस्यांना उपयुक्त माहिती एकत्र करणे.
- इथे वावरताना येणाऱ्या अडचणी शोधून एकत्र करणे.
- अडचणींचे निराकरण, उपाय शोधणे आणि एकत्र करणे.
- बदल, नवीन सुविधा सुचवणे आणि बदल/सुविधा अंमलात आणण्याची योजना बनवणे.
- तांत्रिक किंवा शक्य त्या इतर मर्गाने त्या योजनांमध्ये सहभागी होणे.
ही यादी केवळ प्रातिनिधिक आहे. वेळोवेळी या यादीत आवश्यक ते बदल होतीलच.
सर्वांनी या समुदायात सहभागी व्हावे ही विनंती!
उपक्रम सदस्य सर्वेक्षण
प्रेषक वसंत सुधाकर लिमये (शनि, 02/20/2010 - 00:13)फल ज्योतिष्य/ होमिओपॅथी ह्यांच्या उपयुक्तते विषयी ही चर्चा नाही, उपक्रमींचा कल ह्या दोन गोष्टींमधे कुठे आहे जाणून घ्यायचे कुतुहल ह्या हेतूने विरंगुळा म्हणून हा धागा सुरू करत आहे.
मराठी शुद्धलेखनावर उपाय
प्रेषक सूर्यकांत डोळसे (रवि, 01/04/2009 - 19:07)१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही. हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?
उपक्रम दिवाळी अंक २००८
प्रेषक दिवाळी अंक (सोम, 10/27/2008 - 05:08)'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
संयामक हवा
प्रेषक ऋजु (शुक्र, 10/17/2008 - 03:52)जरा लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणा ना. पण संस्कृत विभागासाठी अतिशय कठोर संयामक हवा / हवी ह्या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे.
उपक्रम दिवाळी अंक २००८
प्रेषक दिवाळी अंक (बुध, 09/03/2008 - 18:12)यावर्षी उपक्रमाचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे. विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे.
उपक्रमाची वर्षपूर्ती
प्रेषक प्रियाली (शुक्र, 03/14/2008 - 14:49)सदस्यांसाठी उपक्रम खुले झाल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. उद्या १५ मार्चला मी आणि काही अधिक सदस्य उपक्रमावरील आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करू. थोड्याफार फरकाने येथे दाखल झालेले इतर सदस्यही लवकरच वर्षपूर्ती करतील.
सल्ला धा
प्रेषक विकि (शुक्र, 11/09/2007 - 08:30)प्रेम ही कोमल भावना आहे हे तर आपण जाणतोच.
प्रेमात माणुस् केव्हा व कसा पडतो. प्रेम नकळत होते का ? प्रेमाचे मानसशास्र ,ज्योतिषशास्र आपल्यालापैकी किती जणांना माहीत आहे.
एखाद्या सुंदर तरुणीसमोर आपले प्रेम कसे व्यक्त करावे ?
ओंकार जोशीचे कौतुक..
प्रेषक विसोबा खेचर (रवि, 07/01/2007 - 03:48)राम राम मंडळी,
आजच्या मटाच्या 'संवाद' या रविवारीय पुरवणीमध्ये माधव शिरवळकर यांच्या 'कंप्युटरसॅव्ही मराठी' या मुखपृष्ठीय लेखात आपला एक उपक्रमीय सदस्य ओंकार जोशी, याच्या 'गमभन' या प्रणालीचा कौतुकपूर्ण उल्लेख आला आहे.
नवी सुविधा - गूगल शोध
प्रेषक उपक्रम (सोम, 06/11/2007 - 12:54)उपक्रमवर आता ड्रुपलच्या अंगभूत शोध सुविधेच्या बरोबरीने गूगल शोधाची सुविधा उपलब्ध आहे!
नव्या सुविधेचे फायदे
उपक्रमरावांना धन्यवाद
प्रेषक धोंडोपंत (मंगळ, 04/17/2007 - 06:05)- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
उपक्रमरावांना सप्रेम भेट! ;)
प्रेषक विसोबा खेचर (सोम, 04/16/2007 - 09:39)आदरणीय उपक्रमराव,
राम राम!
निश्चयाचा महामेरू..
प्रेषक विसोबा खेचर (रवि, 04/15/2007 - 18:48)राम राम मंडळी,
निश्चयाचा महमेरू, बहुत जनासी आधारू..
ह्या समर्थांच्या ओळी मला इथे द्याव्याश्या वाटतात. परंतु या ओळी माहिती आणि विचारांची कितपत देवाणघेवाण करतात हे मला माहिती नाही!
ड्रुपल आणि मराठीकरण
प्रेषक ॐकार (मंगळ, 04/10/2007 - 12:10)ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ.
प्रकल्प : मराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा
प्रेषक ॐकार (शुक्र, 04/06/2007 - 11:51)
दुवा : सद्ध्या अस्तित्वात नाही
१) मागणी
जाळ्यावर मराठीकरता मुक्त शुद्धलेखन चिकित्सेची सोय उपलब्ध करून देणे.
२) विचारसरणी
मराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज
प्रेषक ॐकार (गुरू, 04/05/2007 - 09:59)लेखाच्या शीर्षकावरून लेखाचा हेतू स्पष्ट होत आहे असे समजून फारशी प्रस्तावना न लिहिता मी खाली मुद्देसूद माहिती मांडत आहे.
च्यामारी नक्की कोण कोण? ;)
प्रेषक विसोबा खेचर (बुध, 04/04/2007 - 15:02)बरं का मंडळी,
आता मी तुम्हा सर्वांना एक कोडं घालतो. या कोड्याचं उत्तर मध्येच सुटल्यासारखं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की 'अरेच्च्या! आपलं काही चुकलं तर नाही ना?' ;)
आपण तर साला हैराण झालो विचार करकरून! तुम्हाला बघा सुटतंय का?
उपक्रमः भविष्यकालीन योजना
प्रेषक योगेश (शुक्र, 03/30/2007 - 06:10)नमस्कार,
१. उपक्रमचे मुखपृष्ठ अधिक आकर्षक करता येईल का?
अडचणी आणि त्यांचे निराकरण
प्रेषक उपक्रम (शुक्र, 03/16/2007 - 08:07)या संकेतस्थळावर वावरताना बऱ्याच गोष्टी आपल्या ध्यानात येत असतात. कधी काही अडचणी येतात, कधी टंकलेखनाच्या चुका दिसतात, कधी अजूनही इंग्रजीत असणारी वाक्ये दिसतात, कधी अडचणींवर उपाय सापडतो. या व अश्या इतर गोष्टींची नोंद करण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे.
