सामाजिक उद्यमशीलता

सामाजिक उद्यमशिलता अर्थात Social Entrepreneurship हा हळू हळू परवलीचा शब्द होऊ लागला आहे. बचतगट, लोकशिक्षण, लोकाआरोग्य, उर्जाबचत, अपारंपारीक उर्जा, पर्यावरण, शेती इत्यादी अनेक क्षेत्रात सामाजिक उद्यमशिलता वाढीस लागली आहे. अशा व्यक्तिंना आपण "समाजोद्यजक" असे नाव देऊ शकू. हे समाजोद्यजक, समाजातील एखाद्या प्रश्नाचा वेगळ्या पद्धतीने विचार करून त्यावर मार्ग शोधतात आणि त्यातून केवळ कुणा कडून दान म्हणून पैसे घेऊन थांबत नाहीत तर कायमस्वरूपी चालू राहील असे कार्य चालू करतात. त्याचा उपयोग एखादा प्रश्न सुटायला होतोच पण त्याच बरोबर त्यातून कधी रोजगार चालू होतो तर कधी तोच प्रकल्प इतरत्र राबवत मोठ्याप्रमाणावर बदल घडून येतात. आज जगभर उद्योजकांकडील पैसा वाढला आहे. त्यांना आता काही तरी वेगळे करायचे असते, समाजाच ऋण फेडायचे असते म्हणून दान ही करायचे असते. पण तसे करत असताना यातील हुशार उद्योजक खाजगी उद्योगातील उद्यमशीलता ही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी वापरता येईल का या विचाराला दान देताना चालना देतात. आता अमेरीकेतील अनेक एमबीए स्कूल्स सामाजिक उद्यमशीलता शिकवायला लागली आहेत. तसेच भारतात टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ने यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू केला आहे.

ह्या समुदायात अशा ज्ञात-अज्ञात व्यक्तिं/संस्थांविषयी लिहले जावे, चर्चा व्हावी अशी विनंती.

 
^ वर