साहाय्य

सदस्यांना साहाय्यक होऊ शकेल अशी माहिती एकत्र करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

टंकलेखन साहाय्य

टंकलेखन करण्याची पद्धत

अं अ: ऋं
a aa/A i ee/I u oo/U e ai o au aM a: E O Ru RU/Roo Rlu RlU AUM

ka kha ga gha Ga
ca/cha chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma


ya ra
la
va
sha
Shaक्ष
ज्ञ
sa ha
La
kSha/x
jYa

gaq gaqq
gaJ
a~
C H
HH
ग॑ ग॒
ग़
ऋणनिर्देश - 'गमभन टंकलेखन सुविधा' वापरून या संकेतस्थळावर मराठी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

संपादन सुविधा

बऱ्याचदा लिखाण करताना सुशोभीकरण (फॉरमॅटिंग) जसे की ठळक अक्षरे, तिरकी अक्षरे, अधोरेखन, रंगीत अक्षरे, आकडेवार यादी इ. करणे आवश्यक असते. त्यासाठी साहाय्यक अशी संपादन सुविधा इथे लिहिण्याच्या प्रत्येक खिडकीसोबत जोडलेली आहे.

इतर संकेतस्थळांपेक्षा इथे असणारी सुविधा थोडीशी वेगळी आहे. इतर ठिकाणच्या संपादन सुविधा "wysiwyg" म्हणजे "what you see is what you get" या प्रकाराच्या असतात. इथे असणारी संपादन सुविधा तश्या प्रकारची नाही. इथे वेगवेगळ्या बटनांवर टिचकी मारली असता एचटीएमएल भाषेतील मजकूर संपादन खिडकीत उमटतो.

संपादन सुविधा वापरून सुशोभीकरण करण्याची साधारण पद्धत अशी,

 1. सुशोभीकरण करायचे लेखन निवडा (सिलेक्ट करा)
 2. संपादन खिडकीच्या वर असणाऱ्या वेगवेगळ्या बटनांतून योग्य त्या बटनावर टिचकी मारा.
 3. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या लिखाणाच्या सुरुवातीला आणि शेवटी एचटीएमएल भाषेतील मजकूर उमटेल.
 4. खिडकीच्या वर असणाऱ्या भिंगाच्या चित्रावर टिचकी मारली असता हे लिखाण प्रत्यक्षात कसे दिसेल ते पाहता येईल.
 5. पुन्हा भिंगाच्या चित्रावर टिचकी मारून संपादन खिडकीत परतता येईल.

अश्याच प्रकारे पुढे दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्रिया करता येतील

चित्र/बटन क्रिया
लिखाण ठळक करणे
लिखाण तिरके करणे
अधोरेखन करणे
लिखाण डाव्या बाजूला चिकटवणे
लिखाण मध्यात आणणे
लिखाण उजव्या बाजूला चिकटवणे
लिखाण उजवीकडे (समासाबाहेर) सरकवणे
आकडेवार यादी बनवणे (ज्या गोष्टींची यादी बनवायची असेल त्या गोष्टी एका ओळीत एक अश्या लिहाव्या आणि सगळ्या ओळी निवडून (सिलेक्ट करून) या चित्रावर टिचकी मारावी)
ठिपक्यांची यादी बनवणे (ज्या गोष्टींची यादी बनवायची असेल त्या गोष्टी एका ओळीत एक अश्या लिहाव्या आणि सगळ्या ओळी निवडून (सिलेक्ट करून) या चित्रावर टिचकी मारावी)
अक्षरांचा रंग (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यातून हवा तो रंग निवडावा)
अक्षरांच्या पार्श्वरंग (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यातून हवा तो रंग निवडावा)
लिखाण उद्धृत करणे
सुशोभीकरण काढून टाकणे (लिखाणातील काही भाग निवडून जर या बटनावर टिचकी मारली तर फक्त त्या भागातील सुशोभीकरणाची माहिती काढून टाकली जाते आणि फक्त मजकूर उरतो. जर काही लिखाण न निवडता या बटनावर टिचकी मारली तर संपूर्ण लिखाणातून सुशोभीकरणाची माहिती काढून टाकली जाते.)
मजकुरात चित्र चिकटवणे. (मजकुरात जिथे चित्र चिकटवायचे असेल तिथे कर्सर ठेऊन या बटनावर टिचकी मारावी. त्यानंतर उघडणाऱ्या छोट्या खिडकीत चित्राचा दुवा (Image URL), चित्राचे शीर्षक (Caption), संलग्नता (Alignment, 'right' किंवा 'left' यापैकी आवश्यकतेनुसार), आणि चित्र उपलब्ध झाले नाही तर दाखवायचा पर्यायी मजकूर (Alternate text) या गोष्टी भराव्या आणि 'Submit' या बटनावर टिचकी मारावी.
दुवा (वेब लिंक) देणे (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यात दुवा आणि दुव्याचे नाव या गोष्टी भराव्या.)
या बटनावर टिचकी मारली की लिखाण प्रत्यक्षात कसे दिसेल ते पाहता येईल. संपादन खिडकीत परतण्यासाठी पुन्हा याच बटनावर टिचकी मारावी.

इतर सुविधा आणि पर्याय

लेख, चर्चा, प्रतिसाद आणि समुदाय याशिवाय इतरही सुविधा इथे आहेत.

व्यक्तिरेखा -उपलब्ध पर्याय आणि माहिती

व्यक्तिगत निरोप

खरडवही

उपक्रम समुदाय

बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप किंवा कम्युनिटी सारखी सुविधा इथे समुदायाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. समुदाय कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना एक मंच मिळवून देतो. येथे सदस्य त्यांच्या सामायिक आवडीनिवडी किंवा ध्येय धोरणांवर लेख, चर्चा आणि प्रतिसादांच्या माध्यमातून माहितीचे आणि विचारांचे आदानप्रदान करू शकतात.

समुदाय बनवण्याविषयी मार्गदर्शन

कोणत्याही विशिष्ट विषयांशी, उपक्रमांशी संबंधित नसलेले आणि/किंवा वैयक्तिक स्वरुपाचे समुदाय संमत होणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

समुदाय कसा बनवायचा?

नवीन समुदाय बनवण्यासाठी:

 • वर उल्लेखलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असलेले आणि उपक्रमवरील लेखनविषयक मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असलेले समुदायच संमत करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.
 • समुदायाच्या प्रस्तावाला वेळेच्या उपलब्धतेनुसार शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तरीही कधीकधी उत्तर मिळण्यात उशीर होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
 • वरील-उजव्या कोपऱ्यातील "समुदाय" या दुव्यावर टिचकी मारून समुदायांची यादी पाहता येईल.

  समुदायासाठी लेख/चर्चेचा प्रस्ताव कसा लिहायचा?

  नेहमी पडणारे प्रश्न

  मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?

  1. शक्यता-१ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर आहे. उदा. चिंटू लोकसत्तेच्या (आता सकाळच्या) संकेतस्थळावर आहे.

   1. चित्रावर आपल्या मूषकाच्या उजव्या बटनाने टिचकी मारा. त्यानंतर प्रॉपर्टीज वर टिचकी मारा

   2. नवीन उघडलेल्या (प्रॉपर्टीजच्या) खिडकीतून चित्राच्या जागेची(Address/URL) प्रत बनवा (कॉपी करा).

  2. शक्यता-२ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर नाही (कदाचित तुमच्या संगणकावर आहे)

   1. असे चित्र उपलब्ध करून देण्यासाठी ते आधी जालावर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी flickr किंवा तत्सम सेवादात्यांचा वापर करावा

   2. चित्रे जालावर उपलब्ध झाली की 1.1 आणि 1.2 मध्ये सांगितल्याप्रमाणे चित्राची जागा कॉपी करून घ्या

   3. फ्लिकरवर चढवलेल्या चित्राचा दुवा मिळवण्यासाठी,
    1. त्या चित्रावर टिचकी मारा, म्हणजे थोड्या मोठ्या आकारात तेच चित्र असलेले दुसरे पान दिसेल.

    2. त्या चित्रावर असणाऱ्या यादीतील (मेन्यूतील) "ALL SIZES" वर टिचकी मारा.

    3. आता तेच चित्र वेगवेगळ्या आकारात दाखवणारे पान दिसेल.

    4. त्यातील चित्राखाली असलेल्या "Grab the photo's URL"मधील दुव्याची प्रत बनवा (कॉपी करा)

  3. मजकुरात जिथे चित्र चिकटवायचे असेल तिथे कर्सर ठेऊन संपादन खिडकीच्या वर असणार्‍या या बटनावर टिचकी मारावी. त्यानंतर उघडणाऱ्या छोट्या खिडकीत चित्राचा दुवा (Image URL), चित्राचे शीर्षक (Caption), संलग्नता (Alignment, 'right' किंवा 'left' यापैकी आवश्यकतेनुसार), आणि चित्र उपलब्ध झाले नाही तर दाखवायचा पर्यायी मजकूर (Alternate text) या गोष्टी भराव्यात

  4. चित्राचा आकार फार मोठा असेल तर चित्र देताना आकारात बदल करावा. समजा जालावर चढवलेल्या चित्राचा आकार "१२८० x ९६०" इतका आहे. या चित्राची रुंदी ६४८ होण्यासाठी उंची ४८६ इतकी करावी लागेल. त्यासाठी
   <img src="चित्राचा दुवा" width="648" height="486">
   असे लिहा.

  विशेष चिन्हे उदा. गणितातील, विज्ञानातील चिन्हे कशी दाखवायची?

  जालावर एचटीएमल मधील विशेष चिन्हांची माहिती देणारी बरीच पाने आहेत. उदा. या आणि या पानांवर अश्या चिन्हांची यादी आणि ती दाखवण्यासाठी आवश्यक 'कोड' उपलब्ध आहे. उपक्रमवर अशी विशेष अक्षरे दाखवण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी

  काही उदाहरणे पाहा.

  <font face=arial>&#946;</font> β
  <font face=arial>&#169;</font> ©
  <font face=arial>&#8747;</font>
  <font face=arial>&#950;</font> ζ