आयपी पत्ते हुडकणे : थोडे शास्त्र, थोडी कला

सुमारे एक वर्ष झालं ह्या गोष्टीला. तेव्हा माझा एका ख्यातनाम वगैरे मराठी संकेतस्थळावर वावर होता. हे संकेतस्थळ ड्रुपॅल वापरूनच बनवले होते. बऱ्याच संकेतस्थळांसारखे तेथेही सदस्य टोपणनावांनी प्रवेश करत. टोपणनावाच्या बुरख्याआड लपल्याने सदस्यांना सुरक्षिततेचा आभास (फॉल्स सेन्स ऑफ सेक्युरिटी) होणे साहजीकच आहे. आणि एकदा निनावी राहता आलं की मग, ज्या गोष्टी उघडपणे करता येत नाहीत, त्या करण्याचा मोह होणेही साहजीकच आहे. सदर संस्थवर अनेक लोकांनी एकापेक्षा अधिक टोपणनावे धारण केलेली आहेत, ह्याचा खूप जणांना संशय होताच. पण ते सिद्ध कसे करावे, हे कळत नव्हते. आणि हो, अशा वापरातला साचा (पॅटर्न) असा, की एका सदस्याचे एक उघड नाव आणि ओळख असायची. ह्या नावाने तो/ती सामान्य लेखन करायचे. परंतु कुणाची थट्टा करायची असेल, आडून कमरेखाली वार करायचे असतील, तर दुसरे टोपणनाव वापरायचे. आणि असे सदस्य स्वत:ची हुशारी दाखवायचे, वेगवेगळ्या टोपणनावांनी लिहिताना वेगवेगळी शैली वापरण्याची काळजी घ्यायचे. भाषाप्रभूच ते, वेगवेगळी शैली वापरणे हा त्यांचा हातखंडाच !

अर्थात, कधीकधी स्वनियंत्रण सुटून आपण कुठल्या नावाने लिहितोय, ह्याचा विसर पडून प्रतिसाद प्रकाशित व्हायचा, आणि असे सदस्य बेनकाब व्हायचे (अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?). पण हाय ! अशा घटना तुरळक घडायच्या.

वेबतंत्रज्ञानाची माहिती असणारा, म्हणून माझी तिथे ख्याती होती (अजूनही आहे, बहुतेक:-). अशातच एकदा तेथील एका सदस्येचा मला खाजगी निरोप आला. कुणी एक सदस्य दोन-तीन वेगवेगळी टोपणनावे घेऊन तिच्याविरुद्ध गरळ ओकतोय, फक्त जाहीर प्रतिसादांतूनच नव्हे, तर इतरांना पाठवलेल्या खाजगी निरोपांतून देखील. मी काही करू शकतो का, अशी त्या सदस्येची विचारणा होती.

मला त्या संकेतस्थळाच्या सर्वरचे "लॉग्ज" मिळालेत, तर ते हुडकून काढणे, अगदी सोपे होते. पण मी लॉग्ज मागून तेथील प्रशासक मला लॉग द्यायला मी काही एफ बी आय थोडाच होतो ? त्यामुळे तो प्रयत्न देखील केला नाही. आणि प्रयत्न केला जरी असता, तरी त्या "तीन" सदस्यांमधला एकतरी तेथील प्रशासकांच्या अगदी जवळचा समजला जात होता (म्हणजे प्रशासक आणि "तो" एकाच कॉलेजातले. इतरांच्या लेखनात काटछाट करणारे अति-कार्यक्षम प्रशासक "त्याला" सूट देत, वगैरे). त्यामुळे इतर सदस्यांबाबतीत कदाचित ही माहिती प्रशासकांकडून काढणे जमले असते, पण ह्या सदस्याबद्दल अशक्य ! मी स्वत: सदर सदस्यांवर पाळत ठेवून, पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला थोडेफार यश मिळालेही, म्हणजे त्या सदस्येचही शंका खरी असावी, असे वाटले. पण हातात "प्रूफ" काहीही नव्हते.

हातात ठोस पुरावा नसताना कुणावर आरोप करणे मला तेव्हा गैर वाटले (अजूनही वाटते). म्हणून माझ्या हतबलतेची जाणीव करून देणारा निरोप मी सदर सदस्येला लिहीत होतो, एवढ्यात मला एक अनाहूत विरोप आला. माझ्या विरोपांवर लावलेल्या सगळ्या गाळण्या (फिल्टर्स) पार करून हा विरोप कसा काय आला, ह्याचा शोध घेत असताना मला लक्षात आले, की सदर विरोपात एका चित्राचा दुवा आहे. युरेका! एवढेच म्हणणे मी बाकी ठेवले होते. त्या सदस्येला निरोप पाठवला, की येत्या थॅंक्सगिव्हिंगच्या सुटीत मी तुला नक्की सांगतो, हे तीन त्रासदायक सदस्य एकच आहेत, का वेगवेगळे, ते.

ह्या कामासाठी आवश्यक असणारी साधने हाताशी होतीच. मला माझा स्वत:चा वेबसर्वर हवा होता. तो माझ्याकडे होताच. त्याच्या "लॉग्ज"ला मला वाचण्याची परवानगी हवी होती. माझाच वेबसर्वर असल्याने ती परवानगीही होतीच. आता मला हवी होती ती फक्त १ पिक्सेलची पारदर्शक "जिफ" फॉर्मॅट मधली इमेज. single pixel transparent gif असा शोध शोधयंत्रावरून घेतल्यावर तीही दोन मिनिटात मिळाली. ती जिफ फाईल मी माझ्या वेबसर्वर वर चढवली.

आता उरले होते, की मी त्या "तिघांना" ती जिफ फाईल माझ्या सर्वर वरून त्यांच्या लक्षात न येता त्यांच्या न्याहाळकावर (ब्राउझर वर) उतरवून घ्यायला लावायची. पण त्या संकेतस्थळावर असलेली एचटीएमएल मधून व्यक्तिगत निरोप पाठवण्याची सोय माझ्या पथ्यावर पडली. त्या "तिघांचे" सदस्य क्रमांक मला माहिती होतेच. समजा ते क्ष, य, आणि ज्ञ असे समजू. तर एकाच १ पिक्सेल जिफ च्या तीन प्रती केल्यात. त्यांची नावे क्ष.gif, य.gif, आणि ज्ञ.gif अशी माझ्या वेबसर्वर वर ठेवली. (त्यापेक्षाही सोपे काम म्हणजे माझ्या वेबसर्वरवरचे रीराईट रूल्स बदलणे. पण ते मला तेव्हा चमकले नव्हते. नंतर त्या तंत्राचाही मी उपयोग केलेला आहे.)

आता महत्वाचे म्हणजे, क्ष ने क्ष.gif, य ने य.gif इ. माझ्या वेबसर्वरवरून उतरवून घेणे. त्यासाठी क्ष, य, आणि ज्ञ ला व्यक्तिगत निरोप पाठवले. प्रत्येक निरोपाचे शीर्षक वेगळे ठेवले, जरा इंटरेस्टिंग. म्हणजे क्ष ला, "नमस्कार", य ला "हे बघितलांत का?" इ. आणि निरोप लिहिले तेही अजीबात संशय न येण्यासारखे.

पण त्या 'क्ष'ला पाठवलेल्या निरोपात <img src="http://myserver.com/क्ष.gif"> तसेच य, आणि ज्ञ ला त्यांच्या त्यांच्या "व्यक्तिगत" १ पिक्सेल जिफ टाकायला विसरलो नाही. त्या "तिघांनाही" अजीबात शंका सुद्धा आली नाही. विश्वास बसत नाही ? ह्या लेखात सर्वात वर असाच एक कीडा आहे. तुम्हाला आला लक्षात ?

त्या रात्री दहा मिनिटाच्या कालावधीत हे "तिघेही" त्या संकेतस्थळावर आले. स्वत:ला कुणाचातरी व्यक्तिगत निरोप आलाय, हे पाहून काय निरोप आहे, हे "तिघांनीही" तपासणे साहजीकच आहे. मी तेव्हा मुद्दाम पाहुणा म्हणून (म्हणजे येण्याची नोंद न करता) तेथे वावरत होतो "कोण कोण आलंय" ह्यावर नजर ठेवून.

"त्यांच्या" लक्षात आलं तर ? ही धाकधूक मनात होतीच. पण तसं काहीही झालं नाही. दहा मिनिटांनी, मी शांतपणे माझ्या वेबसर्वरचे लॉग्ज उघडले. त्यात कुठल्या आयपी पत्त्यावरून माझ्या सर्वरमधल्या कुठल्या फाईल्स उघडल्या हे नमूद होते. आणि "ह्या तिघांचे" आय पी पत्ते सारखेच होते !!!

आता हे वेबसर्वरचे लॉग्ज कसे दिसतात, ते दाखवतो, एक उदाहरण देऊन:

198.140.63.** - - [19/Nov/2007:13:19:38 -0500] "GET /dot.gif HTTP/1.1" 200 50 "http://mr.upakram.org/****" "Mozilla/4.0 (compatible; MSIE 6.0; Windows NT 5.0)"

(ह्यातील ** मी मुद्दाम केलेले आहेत. उगाच कुणा निरागस सदस्यांची माहिती कशाला जाहीर करायची?)

ह्यातला पहिला भाग म्हणजे कुठल्या आयपी पत्त्यावरून न्याहाळक माझ्या सर्वरशी संवाद साधतोय, तो. दुसरी ठळक गोष्ट म्हणजे कुठल्या वेळेला (माझ्या सर्वरच्या वेळेत), तिसरी, म्हणजे माझ्या वेबसर्वर वरून कुठली फाईल उतरवतोय तो न्याहाळक, त्यानंतरचा दुवा दिसतोय, तो महत्वाचा. कुठल्या पृष्ठावरून सदर व्यक्तीने माझ्या जिफला त्याच्या/तिच्या न्याहाळकावर बोलावलेले आहे? उरलेले भाग म्हणजे न्याहाळकाचे गुणधर्म !

मित्रमैत्रिणींनो, तुमच्या नकळत मी तुमची इतकी माहिती शोषलेली आहे, ह्याची तुम्हाला तरी जाणीव आहे का ?

मी ताबडतोब त्या सदस्येला निरोप पाठवून कळवले, की तुझा संशय खरा आहे. तुला त्रास देणारी ही त्रिमूर्ती म्हणजे एकच व्यक्ती आहे.

मी असे आत्मविश्वासाने म्हटले खरे, पण महाजाळाच्या ह्या गुंतागुंतीत अनेक संगणकांचे उघड दिसणारे आयपीपत्ते एकच असू शकतात, हे मला ठावूक होते (नेटवर्क एड्रेस ट्रान्स्लेशन, नॅट, ह्याविषयी जरूर वाचा). म्हणून मी पुन्हा एक प्रयोग केला. अशाच प्रकारचे व्यनि सलग वीस सदस्यांना पाठवलेत. दोन-तीन दिवसांनंतर पुन्हा लॉग्ज बघितले, तर वीसच्या वीस आय पी पत्ते वेगवेगळे. म्हणजे तिघांचा आयपी पत्ता अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत एकच असणे, आणि हे तीनही सदस्य एकच व्यक्ती असणे, ह्याचा परस्पर संबंध खूपच आहे तर !

ह्या तंत्राचा मी त्यानंतर एक छंद म्हणून बरेचदा वापर केलेला आहे. आणि त्यापैकी माझे संशोधन फक्त एकदाच " मर्यादित स्वरूपात" जाहीर केलेले आहे.

आता मी केले हे नैतिक, का अनैतिक हे तुम्हीच ठरवा ! (पण त्याआधी, एका संकेतस्थळावर अनेक नावांनी वावरून निरागस सदस्यांना त्रास देणे हे नैतिक का अनैतिक, ह्याविषयी विचार करा.)

आता एका वर्षानंतर मी ह्याविषयी का लिहितोय ? माझी "पाककृती" जाहीर केल्याने लोक सावध होतील, अशी शंका आली ना तुम्हाला ?

असो, त्याविषयी नंतर कधीतरी :-)

लेख

वरवर वाचला. माहिती रोचक वाटते. नीट डोक्यात जायला अजून दोनतीनदा वाचावा लागेल.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

लैच की राव भारी!

वा मस्त !
असे किडे सोडता येतात हे आम्हाला माहीतीच नव्हते हो... आता कळले! ;))
आणि मला बोलावून हा किडा इकडेही आणलात तर...
चालेल चालेल गुंडोपंत असेही 'किडेखाऊ आहेत' असे अनेक सदस्य म्हणतातच! ;)

म्हणजे ती .जीआयएफ फाईल न्याहाळक उचलणार त्यातूनच तुम्हाला कळणार की मी कोण आहेत ते. बरोबर?

एवढ्यात मला एक अनाहूत विरोप आला. माझ्या विरोपांवर लावलेल्या सगळ्या गाळण्या (फिल्टर्स) पार करून हा विरोप कसा काय आला, ह्याचा शोध घेत असताना मला लक्षात आले, की सदर विरोपात एका चित्राचा दुवा आहे. युरेका! एवढेच म्हणणे मी बाकी ठेवले होते.

हे कळले नाही??
तो विरोप कसा पोहोचला?

बाकी आयडिया लै भारीये!

तुमच्या सारखी लक्ष (आणि किडे!) ठेवणारी लोकं आहेत म्हणून आमचे बरे आहे...
नाहीतर आम्हाला ही मंडळी काही म्हणता काही लिहू द्यायची नाहीत!

आपला
गुंडोपंत

तुमच्यापैकी

लेखात स्पष्ट उल्लेख झालेला किडा कुणी तपासलाय ?

कळले तर तेवढेच बरे वाटेल. कमीत कमी उपक्रमाचे सदस्य आणि पाहुणे "त्या" स्थळापेक्षा वेगळे आहेत, हे तरी कळेल !

काय् ?

- सर्किट

मला खरं यातलं काही कळत नाही

मला खरं यातलं काही कळत नाही पण आता तु समजावल्यावर बहुदा हाच किडा असणार असं वाटतंय!

img src="http://www.thebhandarkars.com/dot_clear.gif"
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आपला
गुंडोपंत किडेकाढू

रहेमानी किडा

समाजात असे किडे अनेक असतात. हा किडा म्हणजे एक प्रवृत्ती आहे. आता रहमानी किडा म्हणून जो शब्दप्रयोग वापरतात. त्याचे संकेत स्थल हे आपल्या शरिराच्या विशिष्ट भागात असते असे ही म्हटले जाते. हा विशिष्ट भाग चारचौघात सांगणे शिष्टसंमत नाही. असा किडा वळवळणे हा गुन्हेगारी प्रवृत्तीत असल्यास पोलिस लोक थर्ड डिग्रीचा वापर करतात. या रेहमानी किड्याची व्युत्पति कोणी सांगू शकेल का?
प्रकाश घाटपांडे

पेजसोर्स

हातखंडाच !(/p>
(p>(img src="http://www.thebhandarkars.com/dot_clear.gif">(/p>

इथे < ऐवजी ( असे करून तुमच्या गिफ् चे नाव आहे.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चूक नाही

बरोबरच आहे. विशेषता उपद्रव देणारी लोकं पकडली गेलीच पाहीजेत.

हिंदी सिनेमा बघताना कीडनॅपींगचा सीन आला की वाटायचे प्रत्येक फोनला जरी पब्लीक असला तरी कनेक्ट होतानाच कुठून फोन येतो आहे हे खुले आम कळायला पाहीजे. (जसा इंटरनेट - युनीक आय पी ) हे स्पॅम इ. म्हणजे निनावी खोटी बदनामी करणे वाईटच त्याचा पर्दाफाश झालाच पाहीजे.

भारतात काही जंतू पब्लीक फोनवरून फोन करून नुस्ते श्वासोच्छास सोडत रहातात. किळसवाण्या आठवणी. त्यांचेच हे वरचे लोक भाउबंद.

आता विषय निघालाच आहे तर कुठलेही अँटी-वायरस/स्पॅम वापरले तरी काही ना काही स्पॅम येतातच. त्यासाठी काय केले पाहीजे व कुठले अँटी-वायरस/स्पॅम सॉफ्टवेयर चांगले ह्याबद्दल सर्केश्वरांनी लिहावे ही विनंती.

तसेच त्या ख्यातनाम वगैरे मराठी संकेतस्थळाच्या नावावर (चालकांवर, नियमांवर बहुदा) अजुनही खार खाऊन असलेल्या सदस्यांना लवकर जळजळी पासुन आराम मिळो ही प्रार्थना! :-) बहूतेक ते दोनच सदस्य आता उरले आहेत असे वाटते ;-)

दुसरे कोण ?

बहूतेक ते दोनच सदस्य आता उरले आहेत असे वाटते ;-)

दुसरे कोण रे ? आपले मिसळवाले काय ?

:-)

- सर्किट

पुढे

आता ही माहीती जसे आयपी इ. घेऊन स्पॅम पाठवणार्‍या कंपन्या (किंवा सर्कीट) काय करतात?

किंवा असे किडे करणारे जे असतात, त्यांच्या बाबतीत गुगल, याहू काय करतात? (स्वतःदेखील तेच करतात पण "आय अग्री" असे बटन दाबून घेऊन.)

एन्क्रिपटेड इमेल्स्च पाठवले पाहीजेत का? इंटरनेट बँकींग करावे की नाही? जरा नक्की सद्य परिस्थीती काय आहे?

म्हणाले तर काहीही होऊ शकते किंवा नाही होऊ शकतं (म्हणजे तुमच्या पत्रीकेतल्या ग्रहांवर देखील ते अवलंबून ;-))

काहीही करत नाहीत !

आता ही माहीती जसे आयपी इ. घेऊन स्पॅम पाठवणार्‍या कंपन्या (किंवा सर्कीट) काय करतात?

काहीही करत नाहीत !

कृतीशून्य ना ते ?

:-) :-)

स्पॅम कंपन्या लाखांनी इमेल पत्त्ते विकत घेतात, आणि त्यातील किती "व्हॅलिड" आहे ते यावरून बघतात, आणि फक्त त्या पत्त्यांवरच स्पॅम पाठवतात.

याहू, गूगल सारख्या जाहिरातींतून पैसा मिळवणार्‍या कंपन्या बिहेवियरल टार्गेटिंग नावाचे गोंडस रिसर्च करतात्.

एन्क्रिप्टेड पाठवणे चांगलेच, पण मी जेव्हा माझ्या काकांना इमेल पाठवतो, तेव्हा त्यांना कुठले तरी सॉफ्टवेयर डाऊनलोड करून ग्यावे लागते. त्यांना मी उगाच का त्रास देऊ ?

- सर्किट

ह्म्म.

आपयी बदलवणारी/लपवणारी काही छोटी सॉफ्टवेअर्स् आहेत ना? त्यांचा उपयोग कितपत होतो?

त्याच्या न्याहाळकावर जीआयएफ दिसत नाहीत, त्याचा आयपी (आपण उल्लेखलेल्या कारणापैकी एकामुळेच) दरवेळी भलताच दिसतो. :ड्

(आजचा सल्ला: आयडी बदलायचाच असला तर किमान सेवादाते बदलून (किंवा घर/ऑफिस) नोंदण्या कराव्यात :))

आयपी बदलणारी सॉफ्टवेयर्स

ह्यांचा अर्थातच खूप उपयोग होतो. (अशाच एका सॉफ्टवेयर विषयी लिहिल्यावर कुणीएकाने आम्च्यावर चोरीचा आरोप केला होता, हे विसरलात काय? असो. पण हे भाषाप्रभू असे सॉफ्टवेयर वापरत नाहीत ;-) पण तरी आम्ही हल्ली वर वर्णिलेली पद्धती बदलेली आहे.

(गेल्या वर्षभर एकाच ट्रिक चा उपयोग करून कंटाळा आला बॉ :-)

- सर्किट

हेर

वा...
हेरगिरीवरचा लेख फारच चांगला जमला आहे. तसेच हेरगिरी सुद्धा. आपण या शोधाचे श्रेय त्या सदस्येला द्यायला हवे. शास्त्र आणि कला जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा चांगले परिणाम दिसतात. असो, आता काही प्रश्न.

  1. आपण जी माहिती गोळा केली तो हेतु आपण येथे सांगितला हे ठिक. पण उद्या या तंत्राचा आणि कलेचा गैरवापर होणार नाही कशा वरुन? थोडक्यात तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक आणि नकारात्मक होउ शकतो. या पासुन सावध राहण्याचे काही उपाय आहेत का?
  2. आपण या लेखात चित्र वापरले आहे. ते कसे शोधायचे याचे सामान्यज्ञान असलेल्यांना ते शोधणे काहीच अवघड नाही. पण चित्रा शिवाय इतर काही पर्याय वापरता आले असते का?
  3. हेरगिरी न करता हि माहिती मिळवण्याचे काही राजमार्ग आहेत का?
  4. तसेच अनेकदा नेट जोडण्या ह्या डि एच सी पी वर आधारित असतात. त्यामुळे जर नेहमी वेगळा आय पी मिळत असेल तर मिळणारा विदा कितपत उपयोगी पडेल?

आता इतर काही मुद्दे:
असे म्हणतात कि चोरापेक्षा चोर पकडणार्‍यांकडे १ वाट नेहमीच जास्त असते आणि किती ही प्रयत्न केला तरी चोर नेहमीच पुरावे सोडुन जातो. शेवटी चोर आणि हेर यात फक्त वृत्तीचा फरक आहे. अर्थात एखादा हेर चोर झाल्यास तो हेर-चोर शोधणे थोडे अवघड होइल, पण अशक्य मात्र नक्किच नाही.




मराठीत लिहा. वापरा.

उत्तरे

आपण जी माहिती गोळा केली तो हेतु आपण येथे सांगितला हे ठिक. पण उद्या या तंत्राचा आणि कलेचा गैरवापर होणार नाही कशा वरुन? थोडक्यात तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक आणि नकारात्मक होउ शकतो. या पासुन सावध राहण्याचे काही उपाय आहेत का?

होय. आपल्या न्याहाळकाची "प्रायव्हसी आणि सेक्युरिटी ऑप्शन्स बघा, अनेक उपाय सापडतील.

आपण या लेखात चित्र वापरले आहे. ते कसे शोधायचे याचे सामान्यज्ञान असलेल्यांना ते शोधणे काहीच अवघड नाही. पण चित्रा शिवाय इतर काही पर्याय वापरता आले असते का?

होय. जावास्क्रिप्ट !

हेरगिरी न करता हि माहिती मिळवण्याचे काही राजमार्ग आहेत का?

अर्थातच. आपण ज्या स्थळांवर जाता, त्याच्या चालकाला सर्वर लॉग, कुकी ट्रॅकिंग, असे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. हे मार्ग मला उपलब्ध असते, तर मी ह्या भानगडीत कशाला पडलो असतो ?

तसेच अनेकदा नेट जोडण्या ह्या डि एच सी पी वर आधारित असतात. त्यामुळे जर नेहमी वेगळा आय पी मिळत असेल तर मिळणारा विदा कितपत उपयोगी पडेल?

डीएचसीपीचा स्टिकिनेस, म्हणजे सेवादात्याने काल आपल्याला जो आयपी दिला होता, तो बहुतेकवेळा पुन्हा आपल्यालाच मिळतो, ही खरी गोम आहे ;-) पण कुकीजला त्याचे काहीही नाही ;-)

- सर्किट

वेबसर्वर

ह्या कामासाठी आवश्यक असणारी साधने हाताशी होतीच. मला माझा स्वत:चा वेबसर्वर हवा होता.

वेबसर्वर म्हणजे तुमचे thebhandarkars हे डोमेनच ना ? म्हणजे उद्या एखाद्याने २ हजार खर्च् करुन एक डोमेन घेतले अन ही युक्ति वापरली तर त्या लॉग्स् मधुन तो ही माहिती काढु शकतो, बरोबर ? का स्वतःचा पब्लिक आय पी वैगेरे लागेल त्याला ?

डोमेन

डोमेन हे तुम्हा आम्हाला लक्षात ठेवण्यासाठी घेतलेले नाव. परंतु ज्या संगणकावर हा डोमेन "होस्ट" केलेला असतो, तो त्याचा आय पी ऍड्रेस. डोमेननाव घेऊन एखाद्या संगणकावर होस्ट करून, वेबसर्वरच नसला तिथे, तर अशा प्रकारची चित्रे कधी देता येतील बरे ? (निनावी एफटीपी असले तरी चालेल, म्हणा, पण कुठला तरी फाईल देऊ शकणारा सर्वर हवा.)

- सर्किट

ह्म्म्

पडला प्रकाश डोक्यात. :).मग सध्या वापरता ती टेकनिक कधी शिकवणार ? पुढच्या वर्षी का ?

रोचक

लेख रोचक आहे. जुन्या काळात लिनक्स वापरत असताना आपल्या संकेतस्थळावर कोण कोण येउन गेले याचा लॉग बघायला गंमत वाटत असे. बाकी संकेतस्थळांविषयी, (तेही विशेषतः मराठी), बोलायचे तर लेखमालाही अपुरी पडेल. टोपणनावाचे आणखीही उपयोग आहेत. जसे की आपल्याच किंवा आपल्या कंपूतील लेखांना वा!वा ! असा प्रतिसाद देउन आपला स्कोअर वाढवणे, गरमागरम चर्चेत आपली बाजू पडत असेल तर तिला हातभार लावणे इ. ;)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हेरगिरी

भाषाप्रभूच ते, वेगवेगळी शैली वापरणे हा त्यांचा हातखंडाच !

अर्थात, कधीकधी स्वनियंत्रण सुटून आपण कुठल्या नावाने

लेखांतील या दोन ओळींमध्ये तो जीफ किडा सापडला.

आता कोणतेही आधुनिक शास्त्र/ शस्त्र ;-) किंवा किडे न वापरता केवळ (गेस अँड चेक मेथड) अनुमानांनी माझी विश्लेषणे बरोबर का ते ही सांगा - या केवळ शक्यता आहेत. आरोपपत्र नव्हे.

१. प्रशासकांच्या कॉलेजातील म्हणजे वयवर्षे ५० च्या आसपास, पूर्वपत्ता: पुणे
२. येण्याची वेळ रात्र - म्हणजे ऑफिसातून जाऊन आल्यावर खाऊन पिऊन निवांत अमेरिकन वेळ का भारतातील दिवसाची ऑफिसची वेळ? (मला वाटणारी शक्यता १ली)
३. एकाच संगणकावरून त्या जुन्या संस्थळावर नव्या सदस्यांच्या २-४ आयडी चालत नाहीत म्हणजे व्यक्ती संस्थळावर जुनी असावी. सदस्य क्रमांक १००० च्या आत.

एका संकेतस्थळावर अनेक नावांनी वावरून निरागस सदस्यांना त्रास देणे हे नैतिक का अनैतिक

नैतिक अनैतिक नाही. अंगात काडीचा दम नसलेल्या षंढांचे काम असते हे. अशांचा पर्दाफाश करायला हरकत नसावी कारण हे लोक केवळ संकेतस्थळांवर चाललेल्या विषयांवर नाही तर इतरांच्या घरात घुसून काड्या करायचे प्रयत्न करतात. मी अनुभव घेतला आहे. अर्थातच, माझा पूर्ण पाठींबा परंतु या माहितीचा उपयोग मात्र कोणत्याही गैरवापरासाठी होता कामा नये, नाहीतर जिसकी लाठी उसकी भैंस असे नको व्हायला.

माझी "पाककृती" जाहीर केल्याने लोक सावध होतील, अशी शंका आली ना तुम्हाला ?

आणखी एक शक्यता दिसली पण लिहून काढायची गरज वाटत नाही.

अवांतर : अरे हो! ती सदस्या मी नव्हे. माझे नाव कुठेही जोडायचा काही लोकांचा छंद असल्याने हे आवर्जून सांगावेसे वाटते.

(काल मला सर्दी झाली कारण ४०० मैलांवर प्रियालीने गालिचा झाडला होता, सारख्या टुकार हेरगिरीला वैतागलेली ;-) )

(उ.डि.ए. संचालक) प्रियाली.

वक्रावलेली माहिती

मला वाटलेच होते, की तुम्ही ह्या लेखातील हिंट्स घेऊन होम्सगिरी कराल म्हणून. त्यामुळेच मी ह्या लेखात मुद्दाम वक्रावलेली (ट्विस्टेड) माहिती दिलेली आहे.

कसं फशिवलं !!

- (ट्विस्टेड) सर्किट

का बरं फसवायचं?

का बरं असं फसवलंत? मी स्वागताचा व्य. नि. पाठवला नाही म्हणून का काय? :)

पण चित्रासारखा प्रश्न मलाही आहे. वर्षभरानंतर ही माहिती द्यावीशी वाटण्याचे कारण? ह्यॅपी बर्थडे वगैरे आहे का? ;-)

खि खि खि

का बरं असं फसवलंत? मी स्वागताचा व्य. नि. पाठवला नाही म्हणून का काय? :)

खि खि खि !! (हे असे दुसर्‍या दिशेनेही स्वागताचे व्यनि पाठवले जातात काय ? ;-)

पण चित्रासारखा प्रश्न मलाही आहे. वर्षभरानंतर ही माहिती द्यावीशी वाटण्याचे कारण? ह्यॅपी बर्थडे वगैरे आहे का? ;-)

नाही हो! प्लेस्टेशन ३ आल्यावर सोनीने प्लेस्टेशन २ च्या किंमती कमी केल्यात ना ? तसेच काहीसे समजा ;-)

- सर्किट

सहमत आहे

अरे हो! ती सदस्या मी नव्हे. माझे नाव कुठेही जोडायचा काही लोकांचा छंद असल्याने हे आवर्जून सांगावेसे वाटते.

खरंय! असल्या प्रकारांना उधाण येऊ नये म्हणूनच ह्या प्रकारचे संशोधन प्रसिद्ध करताना 'पोष्टमन एक संशोधन' अश्या क्यियर कट्ट शिर्षकाने करावा अन्यथा सदर माहिती पुर्ण काल्पनीक असून सत्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असला डिस्क्लेमर तरी द्यावा. 'ट्विस्टेड फॅक्ट्स' वगैरे धुम्रवलये निष्कारण का सोडली जात आहेत ह्याची कल्पना नाही.
-कोलबेर

सत्या

येथे सत्याचा संबध कसा बुवा ?

"सपने मे मिलती है.. ओ कुडी मेरी सपने मे मिलती है !!!"

"सत्या" म्हटले की एवढेच आठवते. शेफाली छाया, आणि मनोज बाजपेयी ह्यांनी सुंदर नाच केला आहे हो !!

पण तुम्हाला मी काही केले, की हे "सत्या" का आठवते, हे कळले नाही !

- सर्किट

किडे..

लेख आवडला.
पण मुख्य मुद्द्यावर बोलत नाही आहात :-)"आता एका वर्षानंतर मी ह्याविषयी का लिहितोय ?"

मला

मला वाटते यात एक महत्वाचा मुद्दा असाही अहे की,
सर्वसाधारण पणे संकेत स्थळांवर आपली खाजगी माहिती 'न सांगणेच' हितावह असते.
या विषयी सर्किटनेच एक लेख लिहुन प्रबोधन केले होते.

या कारणानेही नावापेक्षा वेगळा आयडी घेतला जातो.
पण त्या आयडीवरून त्रास देणे (व स्वागताचे व्यनि पाठवणे ;)) ) वगैरे अजिबातच योग्य नाही.

(मागेही सहजरावांनी सायबर बुलींग चा मुद्दा आणला होता पण तो मागे पडला.)

आपला
गुंडोपंत

'न सांगणेच' हितावह

सर्वसाधारण पणे संकेत स्थळांवर आपली खाजगी माहिती 'न सांगणेच' हितावह असते.

खरं आहे.. पण आपला आय पी पत्ता हा संकेतस्थळाकडून आपल्याला विचारला जात नाही. तो आपोआप दीला जातो. त्यामूळे तुम्ही आपणहून माहिती देत नसलात तरी तुम्ही संकेतस्थळाला कोठून भेट देत आहात ह्यासारखी माहिती संकेतस्थळाकडे पोहोचलेली असते.
-कोलबेर

खाजगी माहिती आणि आम्ही !

सर्वसाधारण पणे संकेत स्थळांवर आपली खाजगी माहिती 'न सांगणेच' हितावह असते.
आम्ही तर आमचे खरे नाव लिहिलेच आहे. ब-याच नव्हे सर्वांनाच आमचा व्यवसाय कळलेला आहे. आणि ब-याच ठि़काणी खरडी लिहून-लिहून आम्ही आमची सर्वच माहिती वेगवेगळ्या ठिकाणी पुरवली आहे. यात आणखी काय काय धोके आहेत हे आज तरी आम्हाला ज्ञात नाही. खरे तर संस्थळावरील सहजराव नेहमी म्हणत असतात , की तुम्ही खरे नाव घेऊन वावरता याचे त्यांना सतत आश्चर्य वाटते. खरे तर सर्किटरावांच्या या माहितीमुळे आम्ही जरा अस्वस्थ झालोय. एकीकडे सदस्याची माहिती उघड करणे तांत्रिकदृष्ट्या शोधता येते आणि दुसरीकडे आमच्यासारखे येरेगबाळे स्वतःहून सर्व माहिती पुरवित असतात !!! बरे, दुसरा आयडी वापरावा तर सर्किटराव तेही शोधून काढतील आणि त्यांच्याशी गुद्दागुद्दी झाली की, प्रा.डॉ.चिरुटे एक आत्मचिंतन नावाचा लेख खरडून आम्हाला गाशा गुंडाळायला लावतील !!! :)

अवांतर :- आम्ही या पुढे खरे नाव वापरावे किंवा नाही. युद्धात द्बिधा अवस्था झालेल्या अर्जूनासारखी आमची अवस्था झालेली आहे. नेटावर उत्साहाच्या भरात आम्ही जिथे-जिथे नोंदणी करायची असते तिथे-तिथे प्रा.डॉ. केले आहे. यात आम्ही प्रा.आहोत आणि डॉ. आहोत हे समोरच्याला कळावे हा (फुशारकीचा )उद्देश होताच. पण, त्यात आता धोके वाटताहेत त्यामुळे प्रा.डॉ.चा उत्साह आजतरी मावळला आहे.

रोचक पण...

हा लेख अजूनही रोचक वाटतो पण...
ह्या पणच्या पुढे काय आहे ते कळायला थोडा विचार करावा लागला. विचारांती यात बरेच मुद्दे आहेत असे लक्षात आले. ते मांडण्याचा हा एक प्रयत्न.

१. यापुढे उपक्रमावर येताना ही भावना सतत राहील की आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवून आहे. ही भावना नैसर्गिक आहे. यात कायद्यानुसार प्रायव्हसीचा भंग होतो असेही नाही. समजा, मी घरातून बाहेर पडल्यावर एखादा मित्र माझ्या सर्व हालचाली (मला सांगून) बघतो आहे, तर मला कसे वाटेल? मी नैसर्गिक वागू शकेन का? आता तुम्ही म्हणाल की आंतरजालावर ही किरकोळ बाब आहे. प्रत्येक वेळी मी आंतरजाल वापरतो तेव्हा यापेक्षा कितीतरी माहिती अनेक कंपन्या माझ्याकडून घेतात. मान्य. पण म्हणूनच मी कुकीज काढून टाकतो, अँटीस्पायवेअर वापरतो. शिवाय इथे विदा एका अनोळखी दात्याला जात नसून एका ओळखीच्या माणसाकडे जातो आहे आणि हा जास्त काळजीचा मुद्दा होउ शकतो. इथे १९८४ मधल्या बिग ब्रदरची आठवण होते.

२. या माहितीचा उपयोग नैतिक की अनैतिक हे ठरवणे अशक्य आहे कारण नैतिक किंवा अनैतिक या कल्पना पूर्णपणे सापेक्ष आहेत. प्रत्येक माणसासाठी त्या वेगळ्या असतात. या माहितीचा उपयोग करून एखाद्याला फ्लिपंट म्हणणे सर्किटरावांना नैतिक वाटू शकते, मला वाटेलच असे नाही. दुसरे सर्किटरावांनी ही माहिती इथे दिली म्हणजे आत्ता त्यांच्याकडे बरीच अधिक माहिती आहे हे उघड आहे. समजा सर्किटरावांच्या एखाद्या मित्राशी माझे वाजले, (माझ्या बाबतीत हे सहजच शक्य आहे), त्याने सर्किटरावांकडून हा विदा घेतला, तर तो याचा उपयोग कसा करेल ह्याची ग्यारंटी कुणी घ्यायची?

३. हा सर्व विचार केल्यावर मला काही वैयक्तिक प्रश्न पडतात. मी इथे कशासाठी येतो? इथे जितका वेळ मी देतो तो योग्य आहे का? इथे येण्याला नक्कीच १०-१५ तरी पर्याय आहेत. (एक चटकन आठवणारा सुंदर पर्याय म्हणजे विकीसाठी लेखन करणे) या सर्व गोष्टींचा पुनर्विचार करायला हवा आणि तो मी करायला सुरूवात केली आहे.

४. याचा संबंध थेट उपक्रमाच्या नॉन डिसक्लोझर पॉलिसीशी येतो त्यामुळे या सर्व प्रकाराबद्दल उपक्रमरावांची काय भूमिका आहे हे जाणून घ्यायला आवडेल. यावर प्रतिक्रिया व्यक्त न करणे म्हणजे या सर्व प्रकाराला त्यांची मूक संमती आहे असे समजायचे का?

इथे सर्किटराव किंवा इतर कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही हे मुद्दाम स्पष्ट करावेसे वाटते. सर्किटरावांच्या तंत्रज्ञानातील कौशल्याबद्दल मला नितांत आदरच आहे. गॉदफादरमध्ये मायकेल म्हणतो त्याप्रमाणे, "इट्स नॉट पर्सनल, इट्स बिझनेस."
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सहमत पण...

सॉरी.. शीर्षक आवडले म्हणून ढापले.

तुमचे ४ही मुद्दे पटण्यासारखे आहेत पण पहिल्या मुद्द्यावर विचार केला असता हे जाणवले -

या संकेतस्थळांवर आपण सर्वच (कळत-नकळत) विदा शोषण्याचे काम करत असतो. सर्किटांनी ते जाहीर लिहिले, आपण ते जाहीर कबूल करू का हा प्रश्न आहे. खरडवह्या आणि व्य. नि. यांतून आपणच एकमेकांना स्वतःविषयी नको तेवढी माहिती पुरवत असतो. आपल्या आवडीनिवडी, राहण्याचा जागा, शिक्षण, व्यवसाय, अमुक दिवशी आपण अमुक ठीकाणी जात आहोत वगैरे वगैरे. विचार केल्यास कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे ही भावना नवी नाही, खूप जुनी आहे हे जाणवून येईल, किंवा आपणच कोणाचा तरी विदा गोळा केला आहे ही तरी. मनोगत या संकेतस्थळावर प्रवेश केल्याकेल्या माझी संपूर्ण माहिती एकांना हवी होती आणि त्यासाठी त्यांनी काय काय क्लृप्त्या केल्या यावर वेगळा लेख लिहिता येईल, त्याप्रकाराने अचंबित झाल्याने आताही कोणी सद्हेतूने खाजगी चौकशी करायला लागले तरी त्यांना विन्मुख करावे लागते. तेव्हा पाळतीची ही भावना या लेखाने बळावली असणे शक्य आहे पण आपल्यावर पाळत आहे ही सत्य परिस्थिती खूपच जुनी आहे.

असो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्या सर्वांच्या काही लाडक्या संकेतस्थळांवर (मनोगतापासून ऑर्कुटपर्यंत) ;-) अशाच माहितीचा उपयोग करून आपल्यापैकीच काहीजणांनी एकमेकांविषयी येथेच्छ लिखाण केले आहे. सुदैव/ दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यातील एकालाही सर्केश्वरांच्या विदाची गरज भासलेली नाही. 'अतिपरिचयात अवज्ञा' करण्याच्या या गोष्टीमुळेच सदर संस्थळावर पायबंद घालण्यात आले होते. गुन्हेगारी प्रवृत्ती ही प्रत्येक माणसात असते आणि बरेचदा सत्प्रवृत्त भासणारी माणसेच मोठमोठे गुन्हे करून मोकळे होतात.

ऑर्कुटवरील माझ्या अकांऊंटवर अशाच एक गृहिणी ज्यांच्याशी माझे कोणतेही संबंध नाहीत, त्या सतत पाळत ठेवून असतात. त्यांना कोणता विदा हवा असतो त्याच जाणोत परंतु माझ्या विजिटर्सच्या यादीत त्यांचे नाव अनेकदा झळकते.

त्यामुळे उपक्रमाचे चालक संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर 'एंटर ऑन युवर ओन रिस्क' असा डिस्क्लेमर घालण्याशिवाय काही इतर करू शकतील का याबाबत साशंक आहे.

ऑल मेन आर इक्वल बट...

तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपण सर्वच एकमेकांवर पाळत ठेउन असतो. अगदी साधे कोण आलयची यादी बघणे हे ही त्यातच येते. पण एखाद्या माणसाने असे करणे आणि माणसाने यंत्राकरवी असे करणे यात फरक आहे. यंत्र चोवीस तास माझी प्रत्येक हालचाल न चुकता नोंद करते. मी कधी आलो, एखादा लेख मी किती वेळ बघितला, त्याला किती वेळात प्रतिसाद दिला ही माझी वर्षभराची (किंवा जितक्या वेळ हा प्रयोग चालू राहील तितक्या वेळ) माहिती सर्किटरावांनी बटण दाबले की त्यांना मिळेल. एखाद्या शेजार्‍याने जाताना खिडकीत डोकावणे आणि आपल्या घरात चोवीस तास व्हिडिओ कॅमेरा लावणे यात जो फरक आहे तोच इथे आहे.

दुसरा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पण इथे मला थोडा वैयक्तिक उल्लेख करावा लागेल. हे जर विषयाला धरून होत नसेल तर प्रतिसाद संपादित करावा अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो. मराठी संकेतस्थळांवर बर्‍याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो हे मान्य आहे. तुम्हाला जो त्रास झाला तो ही समर्थनीय नाही. बरेचदा माहिती नसतानाही वाट्टेल तसे ताशेरे झाडले जातात आणि याचा अनुभव मलाही आहे. अडचण ही आहे एकच गोष्ट दोन लोकांनी केली तर एकाकडे दुर्लक्ष आणि दुसर्‍याला शिक्षा असा प्रकार बरेचदा बघायला मिळतो. कारण ही गोष्ट जर आपल्या कंपूतील लोकांनी केली तर तिच्याकडे साफ दुर्लक्ष होते. माझा विरोध या गोष्टीला आहे. जर एखादी गोष्ट चूक असेल तर ती कुणीही केली तर चूकच ठरायला हवी. All men are equal but some are more equal than others ही लोकशाहीची व्याख्या मला पटत नाही.

असो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्या सर्वांच्या काही लाडक्या संकेतस्थळांवर (मनोगतापासून ऑर्कुटपर्यंत) ;-) अशाच माहितीचा उपयोग करून आपल्यापैकीच काहीजणांनी एकमेकांविषयी येथेच्छ लिखाण केले आहे.
मराठी संकेतस्थळावरच्या माझ्या दीड वर्षांच्या वास्तव्यात मी कधीही कोणत्याही कंपूचा आश्रय घेतलेला नाही. मला एखादा लेख आवडला तर तो कुणाचा हे न बघता मी प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आवडली नाही तर तसेही स्पष्ट लिहीले आहे. त्याचबरोबर, कधी माझ्या हातून चूक झाली तर लगेच क्षमाही मागितली आहे. पण माझ्या आता असे लक्षात येते आहे की हा ऍप्रोच बहुसंख्य लोकांना पटत नाही.

तुमच्या ऑर्कुट खात्यावर पाळत ठेवणार्‍या गृहिणींबद्दल तुमची जी भावना झाली तीच भावना माझी या प्रयोगाबद्दल होते आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

खरे आहे, आणि म्हणून...

जर एखादी गोष्ट चूक असेल तर ती कुणीही केली तर चूकच ठरायला हवी. All men are equal but some are more equal than others ही लोकशाहीची व्याख्या मला पटत नाही.

खरे आहे आणि यासाठी सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. उदा.

१. मला एखाद्याची खाजगी गोष्ट कळली तरी मी तिचा उपयोग त्याची कळ काढण्यासाठी करणार नाही.
२. व्यक्तिगत व्यंग, खाजगी जीवनातले प्रश्न किंवा कौटुंबिक अडचणी यांवर एखाद्या विषयी लिहिले तर मी त्याला प्रतिसाद देणार नाही.
३. एखाद्याचा मला आलेला राग हा त्याच्या विषयी खोटी-नाटी गरळ ओकून मी काढणार नाही किंवा तसे करणार्‍याला मी प्रोत्साहन देणार नाही.
४. माझी टिका, टिप्पणी किंवा विडंबने ही लेखनावर राहिल व्यक्तींवर नाही.

आणि यासारखे मुद्दे.

प्रत्येक वेळेस असे करणे थोडे कठिण असले (शेवटी मनुष्यस्वभाव!) तरी सवयीने ते अंगवळणी पडायला हरकत नाही. अर्थात, असे लक्षात आले आहे की काही व्यक्तिंना त्याशिवाय करमत नाही, त्यांचा नाद सोडून देणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे सर्वात चांगले. तो करतो म्हणून मी करतो, किंवा त्याने लेख लिहिला मीही लिहितो, यांत फारसा शहाणपणा असेलच असे नाही.

अवांतरः आपण कोणाच्या कंपूत नाही किंवा आहोत हे सांगणे आपल्यावर अवलंबून नसते. ते न सांगताच इतर ठरवत असतात. तुमची मर्जी असो किंवा नसो!

खुलासा: अरेच्चा! आताच हे प्रतिसाद वाचून मी राजेंद्रला उपदेशाचे डोस पाजते आहे असे मला वाटले. ते तसे काही नाही, त्याचे आणि माझे म्हणणे सर्वांसाठी आहे. इतरांना हे आपापसातील वाटल्यास तो डोस आपल्यासाठीही आहे आणि प्रियालीताईही अध्येमध्ये तो स्वतः गिळत असतात याची कृपया नोंद घ्यावी. ;-) (सर्वांनी ह. घ्या)

असेलही

अवांतरः आपण कोणाच्या कंपूत नाही किंवा आहोत हे सांगणे आपल्यावर अवलंबून नसते. ते न सांगताच इतर ठरवत असतात. तुमची मर्जी असो किंवा नसो
असेलही कदाचित. पण मी हा मित्र म्हणून याला प्रतिसाद द्यायचा आणि हा नाही म्हणून याचा लेख पाडायचा असे प्रकार केलेले नाहीत, हेच स्पष्ट करायचे होते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

क्रेडिट कार्ड

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का ?

मोबाईल फोन ?

उपक्रमाव्यतिरीक्त इतर संकेतस्थळे ? याहू ? गूगल मधून विरोप पाठवता का ?

ह्या सर्व सुविधा तुमच्यावर पाळत ठेवून असतातच्.

यू हॅव नो प्रायवसी ! गेट ओव्हर इट !

- सर्किट

हं.. पण...

गंमत ही आहे की ते येऊन सांगत नाहीत की पाळत आहे. :) त्यामुळे पाळत असणे आणि पाळत आहे याची जाणीव असणे यात फरक आहे. त्यातही दुसरं असं की संस्थेची, संकेतस्थळाची पाळत असणे आणि ओळखीच्या / माहितीतल्या व्यक्तीची पाळत असणे वेगळे नाही का?

ऋषिकेश

सोनी एस आर ६२

कसा आहे कॅमेरा ? कॅश देऊन घेतला, की क्रेडिट कार्ड ने ?

:-) :-)

- सर्किट

क्रेडिट कार्डावर

क्रेडिट कार्डावर.. पण दुकानात जाऊन घेतला :) (यातही काहि छुपे मार्ग असतील हो .. पण अज्ञानात सुख आहे ;) )

दुकानाचा संगणक

त्या दुकानाचा संगणक तुमचा क्रेडिट कार्ड नंबर कसा साठवून ठेवतो, सुरक्षिततेचे काय उपाय करतो, ह्यावर विचार करून बघा एकदा.

बेस्ट बाय / सर्किट सिटी मध्ये घेतला का ?

तिथे काउंटर पासून ते दुकानाच्या मेनफ्रेम पर्यंत वायर नाही. वायरलेस (बिनतारी) नेटवर्क ने सगळी माहिती जाते. त्या दुकानांच्या पार्किंग लॉट मध्ये एक लॅपटॉप घेउन माणूस बसला, तर अर्ध्या तासाच्या आत त्या बिनतारी यंत्रणेत (वेप की शोधून) प्रवेश मिळवू शकतो. आणि मग ही सर्व माहिती कुणाला लक्षात न येता शोषून घेऊ शकतो.

चला तुमचे अज्ञानातले सुख हिरावून घेतले ;-)

- सर्किट

अजून अज्ञान आहे :)

बेस्ट बाय / सर्किट सिटी मधुन घेतलेला नाही :)) अजून अज्ञान आहे :)

-(अ़ज्ञानी[म्हणुन सुखी])ऋषिकेश

हाच

त्यातही दुसरं असं की संस्थेची, संकेतस्थळाची पाळत असणे आणि ओळखीच्या / माहितीतल्या व्यक्तीची पाळत असणे वेगळे नाही का?

नेमका हाच मुद्दा आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

उपक्रमकार

उपक्रमकार तुमच्या ओळखीचे आहेत का ? निदान माहितीतले तरी ?

त्यांना वरील सगळा विदा मिळतो, म्हणून तुम्ही उपक्रमावर येणे सोडाल का ?

- सर्किट

नाही

पण उपक्रमकार हा विदा चर्चेमध्ये वापरणार नाहीत अशी आशा आहे. तसे गूगलकारही माझ्या ओळखीचे नाहीत.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आशा

पण उपक्रमकार हा विदा चर्चेमध्ये वापरणार नाहीत अशी आशा आहे.

आशा आहे ! पण खात्री आहे का ?

ह्या आशेच्या बळावरच तर जग सुरू आहे. म्हणूनच, गेट ओव्हर इट !!

- सर्किट

दुरूस्ती

उपक्रमकारांचे नॉन डिसक्लोझर ऍग्रीमेंट विदा खुला न करण्याबाबतच आहे, त्यामुळे हा प्रश्न उद्भवत नाही.
उपक्रमकार माहितीतलेही आहेत. वर मी लिहीले ते उपक्रमाच्या कार्यकारी मंडळात कोण आहे ते माहिती नसल्यामुळे. गैरसमज नसावा.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कायद्याच बोला...

आता मी केले हे नैतिक, का अनैतिक हे तुम्हीच ठरवा !

सर्कीट रावांच्या या "शास्त्रीय कलेची" छाननी आणि नैतीकता/अनैतकतेबद्दल चर्चा वर चालू आहे. त्यावर लिहीता येईलही.

एक "केवळ उत्सुकतेपोटी" प्रश्नः जरी आत्ता ते जे काही करत आहेत ते अमेरिकन काय्द्याच्या कक्षेत "मारेक्टींग डेटा कलेक्षन" वगैरे नावे ठेवत बसत असावे असे वाटते. पण याची (कायद्याची) पुसट रेषा माहीत नसताना याचा कायद्याच्या भाषेत अतिरेक जर होत असेल आणि तशी जर कोणी तक्रार नोंदवली तर या चर्चेसंदर्भात "सर्कीटरावांना" आणि "उपक्रम" ला कायेद्याचा त्रास होऊ शकेल याचा विचार करावा लागेल.

सर्कीट रावांचे ते बघतील कारण त्यांना यातील माहीती असेल. पण "उपक्रम" ची जालावरील नोंदणी ही अमेरिकेत झालेली आहे. ते स्थळ हे विना नफा तत्वावर जरी चालू असेल तरी काही औपचारीकपणे तसे नोंदवलेले (इनकॉर्पोरेटेड) केलेले नाही. थोडक्यात जो काही आर्थीक त्रास असेल तो संस्थे ऐवजी व्यक्तीस भोगावा लागू शकतो.

वरील प्रश्न हा जरा अतिरंजीत आहे याची मला कल्पना आहे, पण तरी देखील याचा विचार सर्कीट रावांनी आणि उपक्रम संपादकांनी करावा असे माझे जे काही सामाजीक कामातील अनुभवावर आधारीत माहीती आहे त्यावर सदिच्छेपोटी सांगावेसे वाटले, इतकेच.

कायदा

उपक्रमाचा ह्या डेटा कलेक्शन मध्ये काय संबंध ?

उपक्रमाची प्रायव्हसी पॉलिसी उपक्रम स्वतः मोडत नाही, तोवर उपक्रमाला कसलीही तोशीस नाही.

खटला भरायचाच असेल, तर तो माझ्यावर भरा !

- सर्किट

(पण आपला एक मुद्दा बरोबर आहे. उपक्रमाची नोंदणी लिमिटेड लायॅबिलिटी कॉर्पोरेशन, अथवा विनालाभ संस्था असे करणे आवश्यक आहे, अन्यथा उपक्रमावरील पॉलिसीचे उल्लंघन झाल्यास, उपक्रमकारांच्या खाजगी मालमत्तेतून नुकसानभरपाई द्यावी लागेल.)

पॉलीसी वगैरे

सर्व प्रथमः उपक्रमाची नोंदणी लिमिटेड लायॅबिलिटी कॉर्पोरेशन, अथवा विनालाभ संस्था असे करणे आवश्यक आहे, अन्यथा उपक्रमावरील पॉलिसीचे उल्लंघन झाल्यास, उपक्रमकारांच्या खाजगी मालमत्तेतून नुकसानभरपाई द्यावी लागेल.

माझा फक्त इतकाच माहीती देण्यासाठी म्हणून मुद्दा होता आणि आपण समजून घेतलात त्या बद्दल धन्यवाद.

आता उपक्रमाची पॉलीसी मी (प्रथमच) वाचली. ती जरी ते काही करणार नाहीत याची ग्वाही देत असले तरी त्यांच्या साईटचा कोणि "वाईटसाईट" :-) उपयोग केला तर त्याला ते बंधनकारक नाहीत असे ठोसपणे म्हणत नाहीत. त्यात पण कोणी फसवून केले तर त्याला ते अर्थातच जबाबदार नाहीत. पण आता आपण उजळ माथ्याने सांगत आहात आणि त्यांनी लिहीलेल्या कारणांव्यतिरीक्त आय पी ऍड्रेसचा "सिक्यूरीटी रीझन्स" हून अवांतर वापर करत आहात आणि त्यावर त्यांनी काही विरोध दर्शवलेला नाही. तेंव्हा "अबसेन्स ऑफ अपोझिशन इज ऍज गूड ऍज ऍप्रूव्हल" या तत्वाप्रमाणे ते त्यांची प्रायव्हसी पॉलीसी मॉदत आहेत असे वाटते.

हे सव्र मी केवळ वाद म्हणून लिहीत नाही आहे तर "त्रिकोण का चौथा कोन" दाखवण्याच्या केवळ प्रयत्न करत आहे !

तुम्ही आजवर

विकासराव,

तुम्ही आजवर येथे केलेल्या लिखाणात कधी चित्रे टाकली आहेत का ? दुसर्‍या कुठल्या संकेतस्थळावरची ?

असावी, असे वाटते. (फ्लिकर किंवा पिकासा ?)

म्हणजेच आम्ही जे केले, तेच तुम्हीही केले आहे. आमचा आयपी पत्ता उपक्रमाव्यतिरीक्त एका दुसर्‍याच स्थळाला पाठवण्याची सोय केली.

त्याला जर उपक्रमकारांनी आक्षेप घेतला नाही, तर त्यांना माझ्या कृत्याविषयी आक्षेप घेण्याची गरजच काय ?

- सर्किट

--
यू हॅव्ह नो प्रायव्हसी ! गेट ओव्हर इट !