उपक्रम - एक यूसलेस संकेतस्थळ

ह्या चर्चा प्रस्तावाचे प्रक्षोभक शीर्षक वाचून आपण हे वाचणार हे नक्कीच.

हे संकेतस्थळ सुरू झाल्यापासून मी ह्या स्थळाचा सदस्य आहे. मनोगतावर माहितीपूर्ण साहित्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही, म्हणून सुरू झालेले हे संकेतस्थळ, अशी माझ्या मनात उपक्रमाची प्रतिमा आहे.

मनोगतावर मीरा फाटक, सर्किट, जीवन जिज्ञासा, वरदा वैद्य हे ईनमीन चार लोक गणित, तंत्रज्ञान, स्थापत्य, पर्यावरणविज्ञान वगैरे "अनयुजुअल" विषयांविषयी लेखन करत असत.

त्यापैकी तीन सदस्य उपक्रमाचे सदस्य झालेत (जीजि येथे इतर कुठल्या नावाने आले असतील तर माहिती नाही.)

त्यापैकी सर्किट, म्हणजे मी, माझे जुने काही लेख येथे प्रकाशित केलेत. पण मीराजींचे गणितविषयक लेख बंद पडले, ते पडलेच. वरदाजींनी मनोगताच्या दिवाळी विशेषांकात लिहिलेला एक (उच्च) लेख वगळता, त्यांनाही ते माध्यम बंदच झालेले आहे, असे मला वाटते.

मनोगतावर आजकाल कुणीही मला आवडणारे, म्हणजे तंत्रज्ञान, गणित, विज्ञान विषयक लेख लिहीत नाहीत.

पण मग त्यासाठी निर्माण झालेले उपक्रम हे माध्यम ह्या लोकांसाठी बंद का झाले आहे ?

माझ्या ह्या संतापाचा उद्रेक होण्याचे कारण सांगतो.

ह्या संकेतस्थळावर भारत-भारत करून उड्या मारणार्‍यांची संख्या खूप आहे.

भारत आणि संगणन ह्याविषयीची सर्वात मोठी बातमी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली. पण त्याविषयी कुणीही काहीही लिहिलेले नाही. मनोगत-उपक्रम-मिसळपाव ह्या तीनही संकेतस्थळांवर माझा रोजचा वावर आहे. त्या तिन्ही संकेतस्थळांवर कुणीही ही बातमी मेन्शन केलेली नाही. ही बातमी उद्धृत केल्याशिवाय तुम्हा कुणालाही भारताविषयी काहीही लिहिण्याचा अधिकार नाही, असे मी मानतो.

(मी स्वतःच लिहिणार होतो, पण म्हटले बघावे कोणाला ह्या बातमीचे महत्व कळते का, ते. हा हंत हंत..)

तुम्हाला ही बातमी शोधावी लागेल आता.

चला, हिंट देतो: टाटा, पुणे, उच्च ५००

आता तरी ही बातमी येथे येईल का ?

- (सखेद) सर्किट

मजकूरातील व्यक्तिगत रोखाचा काही भाग संपादित. - संपादन मंडळ.

मला

जागतीक स्तरावर
भारतीय संगणकाचे संगणन दर यात रँकींग चौथे आहे अशीच बातमी...
पहिला अमेरिकन... शस्त्रास्त्रे राखतो म्हणे तो त्यांचा संगणक!!!
त्याविषयी म्हणताय का?

मग बोंब काय मारता द्या ना बातमी... आम्ही असेही ढ च आहोत्! ;))))
आपला
गुंडोपंत

तेच

पण ह्या चौथ्या पोझिशनबद्दल काय महत्वाचे ?
(हिंटः प्रायवेट सेक्टर;-)

बोंब मारत नाही. पण दर वेळी अशा महत्वाच्या बातम्या आम्हीच द्याव्या का ?
आणखी सदस्य आहेत ना उपक्रमाचे ?
नुसता काहीही न करता मलिदा खायचा काय त्यांनी ?

- सर्किट

आता आम्ही पडलो

आता आम्ही पडलो जुनी गाव वाली माणसं!
त्यात आमचे कार्यक्षेत्र व्यायाम...
त्यात मिळाले आलिंपिकचे मेडल तर लिहु बॉ!
काही घडलेच नाही त्यात तर काय लिवनार?
या शिवाय फार तर मकरेच्या शनीचे व्ययातले परिणाम यावर लिहु शकु...
तेंव्हा तुमीच सांगा काय झाले ते... तुमचे क्षेत्र आहे ते.

आपला
गुंडोपंत

मकरेतील शनी

या शिवाय फार तर मकरेच्या शनीचे व्ययातले परिणाम यावर लिहु शकु...

म्हणजे आमच्या बद्द्ल म्हणायचे आहे काय? गुडोपंत पण आमच्या लग्नी गुरु आहे बर का?
(अल्पसंतुष्टी)
प्रकाश घाटपांडे

नुसते

नुसते आपले आवडते विषय
आले नाही तर हे स्थळ काही युस्लेस होते असे नाही!

मला तर घाटपांडे साहेबांचे (एकांगी) लेखनही माहितीपूर्णच वाटते.
केव्हढेतरी लेखन आहे केलेले त्यांनी.

वाचून पहा ना!
शिवाय लोक जमेल तसे लिहितच असतात...
नाही तर आम्हाला लास व्हेगास कसे कळले असते?
पण शीर्षक देवून प्रसिद्धीचा स्टंट भारी घेतला... मानलं बॉ!

आपला
गुंडोपंत

माझ्यासाठी

नुसते आपले आवडते विषय
आले नाही तर हे स्थळ काही युस्लेस होते असे नाही!

अर्थातच युसलेस होते ! माझ्यासाठी तरी !

माझे आवडते विषय हाताळण्यासाठी शशांकरावांनी हे संकेतस्थळ सुरू केले अशी माझी भावना होती.
पण हे स्थळ तर फक्त वालावलकरशेठ ह्यांचे तर्कक्रीडास्थळ झालेले दिसते, (किंवा बोस्टन-बाल्टिमोर ह्यांचे फुटबॉल फिल्ड) !

तंत्रज्ञान, गणित, पर्यावरणविज्ञान, स्थापत्य कुठे आहे ?

विकीपीडियावरच्या दुव्यांचा मराठीत साठा, असे ह्या स्थळाचे स्वरूप झालेले आहे !

- सर्किट

तो ही

विकीपीडियावरच्या दुव्यांचा मराठीत साठा, असे ह्या स्थळाचे स्वरूप झालेले आहे !

तो ही न सापडणारा साठा! शोधा... काहीच सापडत नाही गुगल नि याहू वर येथे लिहिलेले!

उपक्रम म्हणजे:
शब्द बापुडे डिजिटल वारा
शोधा गुगल, दिसेल कोरा

आपला
वैतागलेला
गुंडोपंत

क्या बात है !!!!!

शब्द बापुडे डिजिटल वारा
शोधा गुगल, दिसेल कोरा

वा गुंडोपंत !

व्यायामशाळेत लठ्ठालठ्ठी करत असताना सुचलेली कविता भन्नाट !

- सर्किट

बास का?

फक्त "आपल्या" सेवेला, "आपल्या" आवडतीच्या बातम्या देणारे आपल्या आश्रयावर अवलंबून असलेले हे स्थळ वाटले का?

ती बातमी आशियातला पहीला, जगात चौथा सगळ्यांनी वाचली असेल असे वाटते.

बाकी स्वातंत्र्य आहे लोकांना मिळालेले ते ते उपभोगतात.

थोडफार यनावालासर विज्ञान, गणीत लिहतात त्यात सहभाग तितका जाणवला नाही. इतर चर्चेत प्रतिसाद देता तसे तुम्ही ही तिकडे का नाही घालत कोडे, हे मला कोडे पडले आहे.

असो आपल्या रागाचा आम्हाला राग नाही. आळवा!! :-)

होय

फक्त "आपल्याच" सेवेला, "आपल्या"च आवडतीच्या बातम्या देणारे आपल्या आश्रयावर अवलंबून असलेले हे स्थळ वाटले का?

होय. एक्सेप्ट फॉर द आश्रय पार्ट. नोबडी नीड्स आश्रय नाउ अ डेज, इट सीम्स.

बट आफ्टर ऑल. "सेल्फ" इज ऑल दॅट काऊंट्स !

- (सेल्फिश) सर्किट

माझे मत..

मनोगतावर माहितीपूर्ण साहित्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही, म्हणून सुरू झालेले हे संकेतस्थळ, अशी माझ्या मनात उपक्रमाची प्रतिमा आहे.

माझ्या मते वरील कारणामुळे 'उपक्रम'चा जन्म झाला आहे असे नाही. 'उपक्रम'चे मालक हे एकंदरीतच 'माहिती देवाणघेवाण' या विषयाचे फ्यॅन आहेत असा माझा तर्क आहे. त्यांचा विकिवरील वावरही खूप आहे. सबब, विकिसारखेच केवळ 'माहिती-देवाणघेवाण' या विषयाला वाहिलेले एखादे Exclusive संकेतस्थळ असावे या हेतूने 'उपक्रम'चा जन्म झाला असावा असे माझे मत आहे.

पण मग त्यासाठी निर्माण झालेले उपक्रम हे माध्यम ह्या लोकांसाठी बंद का झाले आहे ?

ह्या मंडळींसाठी हे माध्यम बंद वगैरे झाले आहे असे मला वाटत नाही. त्यांनी अवश्य इथे लिहावे की! बंद व्हायचं काहीच कारण दिसत नाही. किंबहुना ह्या मंडळींकडून केल्या गेलेल्या माहितीपूर्ण लेखनाचे उपक्रमवर केव्हाही स्वागतच होईल याची मला खात्री आहे.

असो,

आपला,
(माहितगार) तात्या.

--
आम्हाला येथे भेटा!

अहो पण मग..

अहो पण मग त्यांणि असल्या माहितीदायक विषयांविषयी इथे लिहिणे बंद का केले ?

- (माहितीच्या शोधात) सर्किट

काय करता...

काय करता...
इथे पडले सगळेच हुषार शहाणे...
कुणीच कुणाचे ज्ञान म्हणेना चांगले
मग काय आपपली टाळी वाजवून पाहिली...
फार आवाजही येत नाही...
कुणी हुषार म्हणून भावही देत नाही...

मग चालू पडले आपापल्या रस्त्याने...

आपला
इथे सगळे भामटे हुषार असले तरी ढ म्हणवून घेण्यात कसलीही लाज न मानणारा
गुंडोपंत

एक हजार एक

टक्के खरे बोललात.

(जुना वाचक) प्रसाद

आता न्युज तर द्या

बरं ! झाले इतके नमन पुरे!
आता काय न्युज द्यायला आला होता
ती न्युज तर द्या...
नमनाला १२ प्रतिसाद चिक्कार झाले!

आपला
गुंडोपंत

टाटा कंपनी

उच्च ५०० सुपरकॉम्प्यूटर यादीत.
हे उत्तम. ही अभिनंदनास पात्र गोष्ट आहे.

मला वाटते, लोकांचे आवडीचे विषय, आणि ज्यावर त्यांना बोलायचे आहे, ते विषय वेगवेगळे असू शकतात. १०० विद्यालयांची क्रमवारी वगैरे वैचारीक दृष्ट्या मला उथळ वाटते, पण अन्य लोकांना वैचारीक दृष्ट्या गहन वाटू शकते. तशीच गोष्ट अन्य याद्यांबद्दल.
"जागतिक क्रमवारीच्या याद्यांमध्ये कमालीचा रस असणे हे भारताविषयी वैचारिक आत्मीयता असण्यास जरुरीचे आहे" हे तुमचे तत्त्व/चाचणी पटत नाही. अगदी पहिली कंपनी त्या यादीत पोचली तेव्हाही काही आमूलाग्र बदलले नाही. माझे क्षेत्र सांख्यिकीचे आहे. भारताचा सरासरी संगणक वापर (कुल संगणक क्षेत्रातले उत्पन्न) बदलत आहे तर ते मला महत्त्वाचे वाटते. The central tendency (mean, median, mode) is a more stable and representative descriptor than the extremes or outliers. १००, किंवा ५०० या आकड्यांत मुळात विशेष काय आहे? गणिती दृष्टीने किंवा वैज्ञानिक दृष्टीने विचार करावा.

मी उपक्रम या ठिकाणी त्या मानाने उशीरा आलो. येथील स्थापण्याचे तत्त्व "about us", किंवा मिशन स्टेटमेंट मी सुरुवातीला शोधायचा प्रयत्न केला, पण सापडली नाही. येथील काही समुदायांची नावे बघून अनुमानधपक्याने लेखन करू लागलो. तुमचे आवडीचे विषय त्यात नाहीत, दिलगीर आहे. तुम्ही ते करत राहाल अशी आशा करतो.

आपले बरेचसे पटते

धनंजयराव,

आपले तुपले बरेचसे पटते..

पण ह्या "भारत भारत" म्हणत उड्या मारणार्‍या बोस्टननिवासि लोकांनीही भारताविषयी इतकी महत्वाची बातमी दुर्लक्षिली ह्याला काय म्हणावे ?

असो.

पुण्यातली सी आर एल (सो कॉल्ड कॉम्प्युटेशनल रिसर्च लॅब, नरेन्द्र कर्मरकर इत्यादि..) ह्याबद्दल माझे विचार आहेत ते नंतर कधीतरी....

- सर्किट

असो

ह्या निमित्ताने उपक्रमरावांनी. जरा हितगुज केले तर आवडेल. ह्या वर्षाचा गोषवारा, पुढल्या वर्षीचे संकल्प, योजना...

जरा वार्षिक आढावा!!

ऑनलाइन वार्षीक स्नेहसंमेलन करता येइल का? म्हणजे एखादि वेळ ठरवून काहीतरी कार्यक्रम जमु शकेल का गोंगाट होईल?

आयला खरंच की

(मी स्वतःच लिहिणार होतो, पण म्हटले बघावे कोणाला ह्या बातमीचे महत्व कळते का, ते. हा हंत हंत..)

अगदी अगदी..

मला आणि माझ्या उपक्रमी मित्रांनाही असंच वाटलं..म्हटलं बघूया कोणाला महत्त्व पटते का. मग मी आणि माझे अनेक मित्र काहीही न लिहीता गप्प बसले. आणि शेवटी ती बातमी चर्चेत आलीच नाही.

बातमी का आली नाही म्हणून लिहीणार तेवढ्यात ही चर्चा दिसली.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

ह्मम्म्..

हम्म्..

अवांतर- हल्लीच ऍडोब चा सीईओ हैदराबादी भारतीय बनला असे ऐकिवात आले. हे ही त्याने उपक्रमावर ऐकवले नाही.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

शंतनू नारायण

शंतनू नारायण हा तसाही गेले अनेक वर्षे "ऍक्टिंग सी ई ओ" होताच. ब्रुस शिझेन ने सेमी-रिटायरमेंट घेतली होती, ती फक्त फॉर्मली अनाउन्स केली, एवढेच.

चला, हे देखील उपक्रमावर ऐकवले.

- (ऍडोबीचा समभागधारक) सर्किट

व्यक्तिगत रोख - उपक्रम आणि इतर

मनोगतावर माहितीपूर्ण साहित्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही, म्हणून सुरू झालेले हे संकेतस्थळ, अशी माझ्या मनात उपक्रमाची प्रतिमा आहे.

यांतील निळा भाग मलाही पटतो पण लाल भाग नाही अर्थात ती तुमच्या मनातील प्रतिमा आहे पण उपक्रमाची निर्मिती स्वतंत्र हेतूने असावी असे वाटते.

मनोगतावर आजकाल कुणीही मला आवडणारे, म्हणजे तंत्रज्ञान, गणित, विज्ञान विषयक लेख लिहीत नाहीत.

यांत आपण काही सदस्यांची नावे घेतलीत पण ती शुद्ध हेतूने आणि आदराने घेतली असावी. यापैकी मीराताई आणि वरदाताई इतरत्रही माहितीपूर्ण लेखन करताना दिसत नाहीत. (दिवाळीमनोगताचा लेख सोडून देऊ, वर्षभरात १ लेख म्हणजे तो विनंतीनुसार इ. ही असू शकतो) हा कदाचित कार्यव्यग्रतेचा परिणाम असावा.

बाकी, काही भाग मात्र अनावश्यक वाटला.

आपापल्या आवडीप्रमाणे लोकांना लिहू द्या की. त्यात त्रास करून घ्यायचे रागवायचे काय?

संगणक क्षेत्रातील बातमी म्हणजे ती आम्ही हक्काने तुमच्याकडून येईल अशी अपेक्षा करतो.
उद्या पौराणिक कथेवर तुम्ही लेख टाकलात तर म्या पामराने कुठे जायचं हो? उलट माझ्या कार्यक्षेत्रावर हल्ला झाला म्हणून मलाच डिवचल्यासारखं व्हायचं. -:) ह. घ्या.

उपक्रम का उपक्रमी?

या चर्चेचा मथळा पाहून वेळे अभावी मी यातील काहीच वाचले नव्हते. म्हणलं बिचार्‍या "उपक्रमकर्त्यांना" एकदम "यूसलेस" मथळ्यापासून युसलेस मधे काढायचे मला काही रूचले नाही. काही झाले तरी एक विनामुल्य सेवा त्यांनी दिली आहे, जर कुणाला ती "युसलेस" वाटली तर त्याने येथे येण्याच्या भानगडीत का पडावे. आता साधे पहा, याहू मेल आणि गुगल मेल दोन्ही विनामुल्य सेवा. आम्हाला दोन्हीचा वापर करून झाल्यावर " याहू मेल" सेवा काही बाबतीत यूसलेस वाटली. पण त्यासाठी आम्ही काही याहू ग्रूप काढून काथ्याकूट करत बसलो नाही. तर गुमान जीमेल वापरायला लागलो. तर असे कुणालाही वागता येते. असो.

पण आत्ता वाचताना लक्षात आले की ह्यात केवळ उपक्रमच नव्हे तर बॉस्टन/बाल्टीमोर अर्थात माझ्यावर आणि धनंजयवर आणि तत्सम उपक्रमींवर ही नाराजीचा रोख होता. थोडक्यात आपणास युसलेसच म्हणायचे असेल तर ते वास्तवीक उपक्रमींना म्हणायला हवे, त्या ऐवजी आपण उपक्रमलाच का म्हणालात ते समजले नाही... याचे मूळ तत्कालीन कारण अर्थातच सावरकरांवरील लेख/चर्चा. सर्वप्रथम तो लेख आणि प्रतिसाद, ज्या अर्थी कुठलेही कारण देऊन अथवा न देऊन उडवला नाही, त्या अर्थी तो लेख आणि प्रतिसाद उपक्रम माध्यमासाठी योग्य आहे असे मी गृहीत धरतो. त्यात सुरवातीस सांगायचे राहीले पण लेखाचे अचानक कारण हे या आधी सध्या काय वाचाताय या चर्चेत सावरकरांविषयी ज्या अनेक गोष्टी लिहील्या गेल्या ते होते. ते वाचत असताना, मला मी दिलेल्या लेखाचा संदर्भ मिळाला. वाटले की त्यांच्या बद्दलची आधीची चर्चा ही त्यांचे लेखन न वाचता केवळ इतरांनी काय लिहीले आहे याचा संदर्भ देऊन होत आहे आणि बर्‍याचदा तसेच इतरत्रही होते तेंव्हा लोकांना तो मूळ लेख वाचायला मिळूदेत. मग जे काही साद-प्रतिसाद झाले ते मिसळपाववर चर्पटपंजरीवरील चर्चेसारखे झाले. त्यात काहीच गैर नव्हते.

बाकी विचार केल्यास मी शक्यतितके राजकारण अथवा तत्सम विषयावर आपणहून सुरवात करत नाही. चालू चर्चेत काही गैर दिसले तर मात्र उडी मारतो...

आता राहीला प्रश्न टाटाने तयार केलेला सूपर काँप्यूटर आणि त्यावर कोणी का लिहीले नाही हा. ही बातमी माध्यमात वाचल्यावर आणि त्यावरील अग्रलेख वाचल्यावर नक्कीच आनंद झाला. आणि मला वाटले की यावर कोणीतरी नक्कीच अधीक माहीती देईल. तसे झाले नाही. झाले असते तर चांगले होते, झाले नाही म्हणून वाईट आहे असे मात्र मला नक्कीच वाटत नाही. आता असे बघा, की आपणास जे क्षेत्र भावते त्यावर लिहीले नाही म्हणून आपली तक्रार. तशी तक्रार काय मी पण करू शकतो....

पर्यावरण हा माझा आवडता विषय आणि माझ्या दृष्टीने भारताच्या दृष्टिनेपण अतिशय महत्वाचा विषय. आज सुपरकाँप्यूटरपेक्षा चांगल्या हवापाण्याची जास्त गरज आहे. पण असले समाजवादी बोलणे मलाच रुचत नाही. या दोनही गोष्टी बातमी, आनंद, काळजी म्हणून "मुच्युअली एक्सूझीव्ह" आहेत आणि त्या तशाच अशा ठिकाणी वाचाव्यात असे वाटते. येथे (उपक्रम, मिसळपाव, मनोगत) येणारा वाचक आणि प्रतिसाद देणारा वर्ग हा काही अंशी विरंगुळा म्हणून येतो तर काही अंशी स्वतःकडे असलेले ज्ञान, अवांतर लेखन कौशल्य "शेअर" करत असतो/ते. ज्याला/जीला जे आवडेल/रस असेल त्याने ते घ्यावे. मी सुरवातीस पर्यावरणावर लेख लिहीले पण लक्षात आले की ते वाचणार्‍यांची संख्या आणि मीच लिहीलेले "दारू एक दॄष्टांत" अथवा "तीन देवीयाँ" वाचणार्‍यांची संख्या यात मोठी तफावत आहे. त्यात तक्रार करत बसलो नाही कारण हे म्हणजे एनबीसीने त्यांना श्रोतृवर्ग मिळत नाही म्हणत नुसतीच कुरकुर केल्यासरखे होते. मग मी त्यावर लिहायचे थांबलो पण इतर जे लिहीता येईल आणि ज्यात मला आनंद मिळेल ते लिहीत गेलो.

आपण टाटाच्या कॉम्यूटरवरून लिहीले नाही म्हणूने नाराज आहात. पण तंत्रज्ञान आणि समाजोपयोगी अजूनही बर्‍याच गोष्टि घडत आहेत पण त्याला मिळणारा वाचकवर्ग मर्यादीतच राहणार. गेल्या आठवड्यात दिल्लीत "इंटरनॅशनल टॉयलेट समीट" भरली होती. ही थट्टा अथवा मस्करी नही आहे, खरेच आणि मी ही आधी हसलोच. ज्या येथील व्यक्तीने मला सांगीतले की मी कॉन्फरन्सला भारतात चालले आहे आणि नंतर नाव सांगीतले, तेंव्हा चेहेर्‍यावर मला देखील गंभीर भाव ओढून ताणून आणावे लागले! पण नंतर त्यावर उत्सुकते पोटी वाचले तेंव्हा असल्या दुर्लक्षीलेल्या विषयवार काम करणार्‍यांबद्दल आणि त्या प्रश्नाबद्दल माहीती कळली. एकदा वाटले की लिहावे, पण नंतर "रिऍलीटी चेक" स्वतःलाच बसवून घेतला आणि थांबलो. रतीब टाकल्यासारखे केवळ माहीतीचा डोस पाजणारे लेख लिहीले तर केवळ "चिदानंदरुपः शिवोह्ं" असे म्हणू शकू पण त्याचे मुल्य वाढायच्या ऐवजी कमीच होइल असे वाटते. अर्थात पर्यावरण विषय ज्या "जनरल रीडरशिप" कडे पोचण्याची गरज आहे त्या पुढच्या पिढीसाठी मला अचानक धर्माधीकारींच्या "चाणक्य मंडळाच्या दिवाळी अंकात लिहीण्याची संधी मिळाली आणि तसा मी माहीती दिलीही, त्याचा किती नक्की उपयोग होईल यावर विचार अथव बाकीच्यांवर टिका करत न बसता.

असो हा केवळ काही व्यक्तिगत डिफेन्स नाही. पण या चर्चेत आम्हालाही गोवल्याचे समजल्यावर "silence can be misinterpreted as acceptance" असे होऊ शकते म्हणून हा खुलासा.

हे थोडेसे पटले नाही.

मी सुरवातीस पर्यावरणावर लेख लिहीले पण लक्षात आले की ते वाचणार्‍यांची संख्या आणि मीच लिहीलेले "दारू एक दॄष्टांत" अथवा "तीन देवीयाँ" वाचणार्‍यांची संख्या यात मोठी तफावत आहे. त्यात तक्रार करत बसलो नाही कारण हे म्हणजे एनबीसीने त्यांना श्रोतृवर्ग मिळत नाही म्हणत नुसतीच कुरकुर केल्यासरखे होते. मग मी त्यावर लिहायचे थांबलो पण इतर जे लिहीता येईल आणि ज्यात मला आनंद मिळेल ते लिहीत गेलो.

उलट तुम्ही लिहायला हवे होते.जर लोकांना ते कळत नसेल तर लहान भागांत किंवा थोडे सोपे करून लिहायला हवे पण सोडून देऊ नका. तुमचे पर्यावरणावरचे लेख उत्कृष्ट होते. तसे लेख यायला हवेत. याबाबतीत मात्र मी बाल्टीमोरवाल्यांचे कौतुक करेन. ;-) त्यांनी नेटाने व्याकरण महाभाष्याचे भाग पूर्ण केले.

प्रतिसाद कमी येतात म्हणून आवडीचे लिहिणे कृपया सोडू नका. याचा अर्थ केवळ एवढाच घ्या की लोकांना अधिक सुलभीकरण हवे आहे. यांत फायदा एका अर्थी लेखकाचाच असतो कारण त्याला आपले लेखन कसदार करायची संधी मिळते.

एकूणात

एकूणात हा सर्व प्रकार क्यालिफोर्निया वि. बोस्टन/बाल्टिमोर असा दिसतो आहे. आम्हा अमेरिकेबाहेरिल मंडळींना यातले फरक कळत नाहीत. तेव्हा आम्ही सुखेनैव भारत-पाक म्याचचा स्कोअर बघतो. पण मताची पिंक टाकायचीच म्हटली तर (भले शाबास!) जो जे वांछील तो ते लिहो/वाचो असे आमचे मत आहे. उदा. एखाद्याला एखादे मासिक/पुस्तक आवडत असेल तर सुखाने वाचू द्यावे, असे आमचे लोकशाहीस पुष्टी देणारे मत आहे.

अवांतर : स्वतःचा उल्लेख आम्ही असा केल्यास प्रतिसादाचे वजन अदमासे ३४७.८७ग्रॅ. वाढते असे आत्ताच आमच्या लक्षात आले आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आता कळलं...

अवांतर : स्वतःचा उल्लेख आम्ही असा केल्यास प्रतिसादाचे वजन अदमासे ३४७.८७ग्रॅ. वाढते असे आत्ताच आमच्या लक्षात आले आहे.

आता कळलं गुंडोपंतांचे वजन झपाट्याने कसे वाढते आहे ते ;))))

आपला
वजनदार व्यक्तिमत्व
गुंडोपंत

किलो

स्वतःच्या प्रतिसादात स्वतःला माझे म्हणण्याऐवजी गुंडोपंत म्हटले की १ किलो वजन वाढते. ;-)

अभिजित...

सर्वच प्रतिसाद

श्री. गुंडोपंतांच्या आद्य प्रतिसादापासून शेवटच्या श्री. राजेन्द्रांच्या प्रतिसादापर्य़ंत सर्वच प्रतिसाद, खास करून प्रियाली, धनंजय आणि विकास यांचे विषयाला धरून असल्याने आवडले. उपक्रमावरचा मूळ आरोप मात्र रुचला नाही. टाटांचा महासंगणक ही सर्वांनी वाचलेली माहिती, धक्कादायक किंवा चर्चेस उद्युक्त करणारी बातमी नाही. उपक्रमावर अशा बातम्या याव्यात की ज्यांच्यावर साधक-बाधक चर्चा होऊ शकेल. ज्या गोष्टीवर कुठलेच तात्त्विक किंवा औपहासिक वाद होत नाहीत. ती कसली बातमी? मार्क ट्वेनने व्याख्या केल्याप्रमाणे माणसाला कुत्रा नाही, तर कुत्र्याला माणूस चावला तर ती बातमी!--वाचक्‍नवी

उपक्रमावरचा आरोप आणि थोडे वेगळे वळण

उपक्रमावरचा आरोप आणि इतर काही आरोप ही खास सर्किटशैली आहे. या "सर्किट शैलीचा" त्रास प्रत्येकाला कधीनाकधी झाला असेल याची १००% खात्री आहे. ;-) परंतु, या सर्किट शैलीची ओळख पटल्यावर सर्किटांनी या शैलीत लिहिले नाही तर त्रास होऊ लागतो याची खात्री बाळगा, (स्वानुभव) तेव्हा कृपया, उपक्रमावरील आरोप मनाला लावून कोणीही घेऊ नका.

पण या चर्चेला वेगळे वळण देता येईल:

१. मीराताई आणि वरदाताई या उपक्रमावर कधीच लिहित नव्हत्या. त्यांनी सदस्यत्व घेऊन येथे लिहिले पाहिजे असे बंधन त्यांच्यावर नाहीच. हे बंधन कोणावरही नाही. परंतु, जे पूर्वीपासून लिहित होते (मग विषय कोणताही असो.) ते, अजानुकर्ण, अभिजित - भटकंती, तात्या - शास्त्रीय संगीत, अनु- उपकरणे, शशांक - शास्त्रीय लेख आणि इतर ते कार्यव्यग्रतेशिवाय अन्य कोणत्या कारणाने लिहायचे बंद झाले का हे शोधता येईल. ;-)

२. उपक्रमावरील वाचकांची आणि सदस्यांची संख्या वाढण्यासाठी कोणी प्रयत्न करण्यास इच्छुक असतील तर त्यांनी ते करावेत. मी माझ्यातर्फे असे प्रयत्न करत असते. त्यामुळे अधिक लोक इथे वाढले तर अधिक विषय चर्चेत येतील किंवा अपुर्‍या सदस्यसंख्येमुळे दुर्लक्षिले जाणारे विषय लक्षात घेतले जातील.

३. काही सदस्य जे गुणी आहेत, जसे, ऋषीकेश, चाणक्य, वाचक्नवी, निनाद, बिरुटे, सुमीत, विसुनाना तो आणि इतर (ज्यांची नावे आली नाहीत त्यांची माफी मागते.) या लोकांनी आपापल्या आवडीनुसार सहभाग वाढवायला हवा.

ज्यांची नावे प्रतिसादासाठी वापरली ती आदराने वापरली आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यक्तिगत रोख यांत नाही.

हा भाग मान्य...

>>>उपक्रमावरचा आरोप आणि इतर काही आरोप ही खास सर्किटशैली आहे. या "सर्किट शैलीचा" त्रास प्रत्येकाला कधीनाकधी झाला असेल याची १००% खात्री आहे. ;-) परंतु, या सर्किट शैलीची ओळख पटल्यावर सर्किटांनी या शैलीत लिहिले नाही तर त्रास होऊ लागतो याची खात्री बाळगा, (स्वानुभव) तेव्हा कृपया, उपक्रमावरील आरोप मनाला लावून कोणीही घेऊ नका.

वरील भाग अगदी मान्य!

बाकी सर्कीट शैलीत अजून एक गोष्ट सध्या वाढलेली दिसते, ती म्हणजे त्यांचे "धुमकेतूत्व " (कदाचीत नवीन शब्द तयार झाला असेल). एकंदरीत पाहता ते मधेच धुमकेतू सारखे येतात, गनिमी कावा केल्या सारखे लिहीतात आणि नंतर अस्तंगत होतात, मग परत काही काळाने परत तोच खेळ...:-)

गनिमी कावा

नाही हो, कसलाही कावा वगैरे नाही. मनात आलं, लिहिलं !

- सर्किट हॅली

सहमती

उपक्रमावरील वाचकांची आणि सदस्यांची संख्या वाढण्यासाठी कोणी प्रयत्न करण्यास इच्छुक असतील तर त्यांनी ते करावेत. .....लोकांनी आपापल्या आवडीनुसार सहभाग वाढवायला हवा.

हे अगदी पटले. आत्ताही बघा, या प्रस्तावाला नेहमीच्याच जुन्या जाणत्या लोकांचेच जास्त करून प्रतिसाद आहेत. नवीन लोकांना लिहायला आमंत्रण दिले पाहिजे हे नक्की.

नक्कीच

माझे नाव या गुणी सदस्यांच्या यादीत पाहुन सुखद आश्चर्य वाटले.
माझे काही तसे फार लिखाण नाही. मागे सॅप वर व अवांतर कोक वगैरे असे काही लिखाण केले होते तितकेच.
सॅप चर अजून लिखाण क्रायचे मनात आहे पण प्रत्य्क्षात उतरत नाही, जमेल तसे करेन.

मागचे दोन (खरेतर दीडच) लेख ठीक जमले होते. पण पुढे काही खास उतरलेच नाही.

लिखाण करायचे नक्कीच मनात आहे.

-निनाद

चर्चेस उद्युक्त

टाटांचा महासंगणक ही सर्वांनी वाचलेली माहिती, धक्कादायक किंवा चर्चेस उद्युक्त करणारी बातमी नाही.

फक्त धक्कादायक बातम्यांचा उल्लेख करायला उपक्रमाचे स्वरूप "पेज थ्री" सारखे आहे/असायला हवे, असे का वाटते आपल्याला ?

तसेच असेल, तर आपली इच्छा पूर्ण करतो. हा महासंगणक बनवायला नरेन्द्र करमरकर ह्यांनी टाटांना गळ घातली, आणि १०० मिलियन डॉलर्स टाटांनी त्यांना दिले. त्यानंतर सहा महिन्यांतच टाटा सन्स च्या संचालक मंडळाशी मतभेदांमुळे करमरकर सीआरएल सोडून गेले.

- सर्किट

तर्कक्रीडास्थळ

उपक्रम वालावरकरशेटजींचे तर्कक्रीडाक्षेत्र झाले आहे ही टीका अजिबात आवडली नाही. गंभीर विषयावर तात्त्विक डोकेफोड करताना अधूनमधून गुंडोपंत, तात्या आणि यना यांचा मेंदूला मौज देणारा सहभाग नसेल तर उपक्रम मरुस्थल होईल.-वाचक्‍नवी

अहो

अहो
या मोठ्या लोकांत कुठे माझे नाव घेता साहेब?

बाकी आपल्या कौतुकाने सुखावलो हे मान्य करतो! :)

आपला
गुंडोपंत

इतर ज्ञानशाखा आणि विषय

गणित, तंत्रज्ञान, स्थापत्य, पर्यावरणविज्ञान या विषयांचे महत्त्व पूर्णतः मान्य करून, त्या त्या विषयांवर लिखाण करणार्‍या लोकांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करूनसुद्धा हे म्हणावेसे वाटते की, इतर सामाजिक बदल, राजकीय मते आणि विचारप्रणाली, साहित्यातील नवे-जुने प्रवाह, देशात-परदेशात राहणार्‍या व्यक्तिंच्या दैनंदिन आयुष्यातील आणि एकूण आयुष्यातील बदल , नवीन जगात त्यांना पटलेली स्वतःची ओळख आणि पडलेले जगण्याबद्द्लचे छोटे मोठे प्रश्न हेसुद्धा महत्त्वाचे आहे असे मला वाटते. तंत्रज्ञान शिकायचे त्यासाठी देशात-परदेशात अनेक साधने आहेतच. पुस्तके आहेत. त्या सार्‍यांचे इथे वारे वहावेत असे अनेकांप्रमाणे मलाही वाटतेच.

मला असे एकूण वाटते की मुद्दा आहे तो पन्ह्याचा - (मराठीमधे सांगायचे तर बॅंड-विड्थ चा.) हे "स्थळ" नवे आहे. जसजसे नवनव्या क्षेत्रातील लोक येत रहातील तसतशी विषयांची व्याप्ति, खोली वाढेलच.

मूळ विषयाचे शीर्षक बाकी मनोरंजक आहे. "यूटीलिटी"चा ज्यालात्याला समजलेला अर्थ वेगवेगळा आहे शेवटी. त्या अर्थानुसार गोष्टी युज्-फुल् किंवा युज्-लेस् वाटतात.

कचरा

आजचा "कचरा" ( मग तो जालावरचा असो) ही उद्याची "संपत्ती "आहे. जतन करुन ठेवा.
प्रकाश घाटपांडे

खुलासा

पण मीराजींचे गणितविषयक लेख बंद पडले, ते पडलेच.

हे थोडे खरे आहे. पण पूर्णपणे बंद पडले नाहीत. तात्पुरते बंद पडले त्याला कारण माझा आळस आणि इतर कामात व्यस्त राहिल्यामुळे वेळाचा थोडाफार अभाव. पण लवकरच गणितविषयक लेख लिहिण्याचा संकल्प सोडला आहे.

सर्वात आनंदाची बातमी

चला, माझ्या "सर्किट शैली" तील प्रस्तावाचा *मला* झालेला सर्वाधिक फायदा , म्हणजे मीराताईंचा संकल्प.

"एक पाय नाचव रे गोविंदा", "चार रंगांची समस्या", "अनंत" असे उत्कृष्ट लेख आजवर वाचल्याने आपल्या आगामी लेखनाबद्दल खूपच अपेक्षा आहेत.

लेखाचा संकल्प लवकर सिद्धीस न्यावा, ही आग्रहाची विनंती.

(अद्याप लेख लिहायला सुरुवात केली नसेल, तर "फर्माच्या शेवटच्या प्रमेयावर" लिहावे, असे सुचवू का ?)

- सर्किट

वेगळा दृष्टीकोन

उपक्रमवर सध्या येतात किती लोक? तर शंभर दोनशे. त्याततले पाच-दहा-पंधरा विकास, धनंजय यांच्या सारखे मडक्याच्या जागी ज्ञानभांडार असणारे लोक येथे भरपूर लिहीत असतात. दहा कोटीच्या पुढे असणार्‍या एकून मराठी लोकांतील जे काही लाख लोक इंटरनेट वापरतात त्यातील काही हजार जरी उपक्रमावर वळवले तरी सर्किटरावांची तक्रार चुटकीसरशी दूर होईल. जर या नवीन सदस्यातील शंभरेक जन सर्किटरावांनी उल्लेखलेल्या विविध विषयातले ज्ञानी असतील तरी पुरे.

मला वाटते आहेत त्याच सदस्यांनी चौफेर लेखन करावे हे मत चूक नसले तरी त्यांच्याकडून अशी अपेक्षा न ठेवता नवीन सदस्य येथे आणता येतील असे प्रयत्न आपण करू शकतो. सध्या आहेत त्यांना सध्या चालले आहे ते चालवू द्या वा नवीन काय करायचे ते करु द्या. पटतेय काय?

आपला,
(स्वच्छंदि) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अहो मी का उअगाच ओरडतोया?

केन्डेसाहेब,
अहो, मी ते गुगलवर उपक्रम "मराठी" असा सर्च केल्यावर सापडावे असे याच साठी ओरडतोय हो!
मराठी = उपक्रम असे समीकरण व्हायला हवे ना त्यासाठी.

आपसुक लोक येतीलच ना?

आपला
गुंडोपंत

संख्या

उपक्रमवर सध्या येतात किती लोक? तर शंभर दोनशे.

इथं बघायला मिळणार्‍या 'संकेत स्थळांवरील पुणेरी पाट्या 'तर ह्याचे कारण नसाव्यात?

उपाय

उपक्रम आपल्याला युसलेस का वाटले ते सांगीतलेत. ते तसे वाटू नये ह्यासाठी काही उपाय? नक्की काय केले म्हणजे उपक्रम आपल्यामते पुन्हा युसफुल होइल? त्यावरही जरा मार्गदर्शन करा ना!

टायटल

'उपक्रम : एक युसलेस संकेत स्थळ' असं कॅची टायटल जरी दिलं असलतं तरी लेखनाचा मथितार्थ 'उपक्रमी : ए युसलेच बंच ऑफ पीपल' असा होतो.
पुलीटीकली करेक्ट राहण्यासाठी हा बदल केलेला दिसतो. कारण आपण मांडलेल्या व्यथेत मला तरी 'उपक्रम' ऍज ए संकेतस्थळ कुठेही कमी पडले असे वाटत नाही!