तो मी नव्हतोच

आज दुपारी उपक्रमावर थोडा वेळ घालवून आता थोड्या वेळापूर्वी (शुक्रवारी रात्री) पुन्हा उपक्रम बघितले, तर माझ्या नावाने तीन चार प्रतिसाद आलेले होते. अत्यंत विचित्र भाषेत, आणि अगदी माझ्या सही सकट !

मी ताबडतोब व्यवस्थापनाला व्यनि वगैरे पाठवून ते प्रतिसाद काढण्याची विनंती केली, माझा पासवर्ड देखील बदलायला सांगितला !

हा कोण माझा शत्रू माझ्या नावाने असले लिहितो आहे, याचा विचार करत होतो. तेवढ्यात माझ्याच कडून मलाच आलेली इमेल बघितली.

त्यात लिहिले होते: "मी ***शी पैज जिंकली. पुन्हा आपला संगणक सुरू ठेवून बाहेर जाऊ नकोस."

माझ्याच एका "मित्राने" संध्याकाळी माझ्याच कार्यालयातील संगणकावरून माझ्या उपक्रमावरील नावाने ते प्रतिसाद लिहिले होते, आणि वरून मला इमेलही पाठवली होती.

मित्रच होता म्हणून एवढ्यावर निभावले. इतर कुणाला तशी हुक्की आअली असती, तर काय काय केले असते कुणास ठावूक, कारण माझे संपूर्ण आर्थिक आणि इतर कामही संगणकावरूनच चालते. ब्राऊझर च्या कुपीत सर्व माहिती ठेवलेली आहे.

एक मोठा धडा शिकलो.

तुम्हीही शिकावा म्हणून हा लेखन प्रपंच.

- युयुत्सु

हे सही!

वा! सहीच किस्सा आहे हा!

चला,
माझे आपल्या प्रतिसादावरचे साद पडसाद गृहीत धरु नका मग!

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

त्याला

आपल्या मित्राला मराठीच काय
तर उपक्रमाच्या खाचाखोचांचीही चांगलीच माहीती दिसते आहे.
काय खर्‍या नावाने येतो हा बिलंदर माणूस उपक्रमावर म्हणे?

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

ओळखा पाहू!

ओळखा. (एक हिंटः हा मित्र माझ्यानंतर एका महिन्याने उपक्रमावर आला.) अजूनही (स्वतःच्या नावाने) येथे लेखन केलेले नाही.

- युयुत्सु

--
फोनेटिक इनपुट मेथड्समुळे मदरटंगमध्ये थॉट्स एक्स्प्रेस् करणे इझी झाले आहे. मराठीत लिहा.

आयडीया मस्त आहे

खरं खोटं 'देव' जाणे पण काहीही बरळलेलं खपवायला ही आयडीया मस्त आहे :-)

--
हे लिहिणारा माझा 'मित्र' देखिल असु शकतो ह्याची नोंद घ्यावी

हेच म्हणतो.

खरं खोटं 'देव' जाणे पण काहीही बरळलेलं खपवायला ही आयडीया मस्त आहे :-)

सहमती हाये,जे लिव्हाचं ते लिव्हाचं मंग म्हणाचं म्या नै लिव्हलं.

वारे भौ ! समजा आम्ही एखांद्या बाई माणसाले उपक्रमावर गुलुगुलु बोलू ,चावट लिहू .
ती का उखडली आमावर,मंग म्हणू आमी नै लिव्हलं बरं का !

-----------------------------------------------------------
हे लिहिणारा 'बाबूरावचा' आफीसमधला 'मित्र' देखिल असु शकतो ह्याची नोंद घ्यावी .
------------------------------------------------------------

हम्म!

तुमच्या मित्राला तुमची इश्टाईल उर्फ शैली बरीच माहित दिसते.

तरीही मला असं वाटून गेलं की या प्रतिसादाची जी सुरुवात आहे ती खास आपल्या शब्दांतील वाटत नाही.

शुक्रवारी रात्री दिलेले असे काही प्रतिसाद जे आपले नाहीत ते आपण दुव्यांनी दाखवावे.

पासवर्ड

मी ताबडतोब व्यवस्थापनाला व्यनि वगैरे पाठवून ते प्रतिसाद काढण्याची विनंती केली, माझा पासवर्ड देखील बदलायला सांगितला !

पासवर्ड बदलायला व्यवस्थापन कशाला पाहिजे? तुम्ही स्वतः देखिल बदलू शकता ना?
बाकी भारीच आहे की तुमचा हा 'मित्र'! आज संगणक बंद करायला विसरलात उद्या पैशाचे पाकिट विसरलात तर??

हे तरी नक्की तुम्हीच का? !!

आता ही चर्चा तरी खर्‍या युयुत्सुंनी सुरू केली आहे का, कसे कळायचे?

हा लखोबा लोखंडे कोण आहे?

चित्रांनी म्हणल्याप्रमाणे मला पण खरेच प्रश्न पडतो की हे लिहीणारे पण नक्की तुम्हीच का?

आपल्याशी वाद घातला तरी आपल्या संगणकीय ज्ञानाबद्दल तिळमात्र शंका नाही. तेंव्हा अशी व्यक्ती स्वतःचे आर्थिक व्यवहार कचेरीतील संगणकावर इतरांना (थोडे संगणकीय "विशेष" ज्ञान असलेल्या) व्यक्तीस सहज प्राप्त करता येतील असे ठेवेल यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे...

दालमे कुछ काला है!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
की सगळीच डाळ काळी आहे? माझाही ह्या भाकडकथेवर विश्वास नाही.

अशक्य !

युयुत्सु महाराज अशी चुक करु शकतात ? शक्य नाही !

पण काही शक्यता...
१. त्या ला (मित्राला तुमच्या) तुमचा कुटशब्द देखील माहीत असावा (अथवा तुम्ही जाताना जाण्याची नोंद केली नसणार)
२. बाहेर जाताना तुम्ही आपला संगणक चालूच ठेवला व त्या संगे आपली महत्वाची कामे देखील.
३. तुम्ही आपल्या संगणकामध्ये कुटशब्द सेवा चालू ठेवलेली नाही आहे.

जर वरील शंका बरोबर असतील तर मात्र हे तुमच्या नावाला बट्टा लावण्याचे काम आहे !

जो मानव २४ तास संगणाकावर (बरोबर) काम करतो तो अश्या छोट्या पण महत्वाच्या चुका करु शकतो ह्यावर विश्वास होत नाही आहे !

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

मानव! :)

जो मानव २४ तास संगणाकावर (बरोबर) काम करतो तो अश्या छोट्या पण महत्वाच्या चुका करु शकतो ह्यावर विश्वास होत नाही आहे !

बाय द वे, युयुत्सू हा 'मानव' आहे? असेल असेल! :))

दाल मे काला

डाळीत काही काळे, किंवा अख्खी डाळच काळी, हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.
माझ्या लेखनशैलीची माहिती असणार्‍यांनी मला व्यनिंतून "काहीतरी चमत्कारिक वाटले", हे लिहिले, ह्यातच मला समाधान आहे.
असो, उपक्रमावर ह्या आयडीने हा माझा शेवटचा प्रतिसाद आहे.

- युयुत्सु

--
फोनेटिक इनपुट मेथड्समुळे मदरटंगमध्ये थॉट्स एक्स्प्रेस् करणे इझी झाले आहे. मराठीत लिहा.

योगायोग...

आज माझ्या"होमपेज"वर जी काही "रँडम" वाक्ये येतात त्यात खालील वाक्य वाचायला मिळाले:

The probability of someone watching you is proportional to the stupidity of your action.

:-)

मला आपल्या चातुर्याबद्दल १% पण शंका नाही त्यामुळे या चर्चेच्या सुरवातीस जे कारण दिले ते मान्य करायला इतरांप्रमाणेच अवघड जात आहे.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.