याहू! टाटा आणि जलदसंगणन
उपक्रमींना कळवण्यास आनंद होतो की, आम्ही आधी येथे उल्लेखिलेला, टाटांनी निर्माण केलेला, जगातील चौथ्या क्रमांकाचा महासंगणक, याहू!च्या सहकार्याने आता भारतातील ख्यातनाम विद्यादानसंस्थांतील संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहे.
हे जलदसंगणन (क्लाऊड कॉम्प्युटिंग) म्हणजे काय ?
समजा तुम्हाला एक समस्या सोडवायची आहे. उदाहरणार्थ:
१. माझी जनुके अशी आहेत, मला भविष्यात कोणता रोग होण्याची शक्यता आहे ?
२. माझ्याकडे काही संस्थांचे समभाग आहेत, पुढच्या दहा वर्षांत त्यावर मला किती नफा मिळेल ?
३. माझ्या संस्थेने आपल्या संकेतस्थळाची जाहिरात अनेक स्थळांवर केलेली आहे, ती किती लोकांनी बघितली ?
ह्या सर्व प्रश्नंाची उत्तरे देण्यासाठी तुमच्या घरचा खाजगी संगणक उपयोगाचा नाही. एका संगणकावर हे सगळे करायचे म्हटले तर ह्या प्रत्येक प्रश्नाला किमान दहाहजार तास (अदमासे दीड वर्षे) लागतील. पण तासाभरात उत्तर हवे असेल, तर दहाहजारापेक्षा अधिक संगणक लागतील. तुम्हाला ते परवडणार नाहीत. कारण त्यांची किंमत ४०० कोटी रुपये, एवढी असेल.
पण समजा टाटांनी तुम्हाला एका तासासाठी त्यांचे दहाहजार संगणक ५ रुपये एका संगणकाला, एका तासाला असे उपलब्ध करून दिले तर ? एका तासाच्या वापरासाठी त्यांना फक्त पन्नास हजार रुपये द्यावे लागतील. ४०० कोटी रुपये देऊन माझा स्वत:चा महासंगणक बनवायचा, की तासभर वापरासाठी फक्त ५०००० रुपये द्यायचे हे तुम्ही ठरवा.
मला तरी दुसरा पर्याय आवडेल.
हाच तो संगणनाचा ढग (जलद).
(मीच तयार केलेला "जलदसंगणन" हा शब्द मलाच भावलेला आहे, कारण मूळ "क्लाऊड कॉम्प्युटिंग" मधला "क्लाऊड" आणि, जलद म्हणजे वेगवान हादेखील अर्थ अंतर्भूत आहे. शब्दभांडाराला अशा शब्दांची गरज आहे.)
हे जलदसंगणन यापुढे खुपच महत्वाचे ठरणार आहे, म्हणून टाटा आणि याहू! ह्या दोन बलाढ्य संस्थांनी जलदसंगणन संशोधन केंद्र उभारले आहे. ह्या केंद्रात हडूप ह्या जलदसंगणन आज्ञावलीवर आधारित प्रणाली विकसीत करण्यात येणार आहेत. (बढाई मरण्याची तशीही मला सवय आहेच, पण येथे सांगणे आवश्यक आहे, की हडूप ह्या आज्ञावलीच्या गाभ्याच्या विकसनात मी गेली तीन वर्षे कार्यरत आहे.)
हडूप ही मुक्तस्रोत प्रणाली आहे. मी गेले वर्षभर ह्या प्रणालीविषयी शेकडो लोकांना पारंगत करतो आहे. तुम्हाला अथवा तुमच्या संस्थेला ह्या प्रणालीत रस असेल, तर मला कळवा. ह्या उन्हाळ्यात भारताची फुकट यात्रा करण्यास मी उत्सुक आहे :-) (मी सहा तासांच्या ह्या प्रशिक्षणासाठी -फक्त- एक हजार डॉलर्स घेतो. प्रवास खर्च वेगळा. प्रोजेक्ट कन्सल्टिंग, अर्थात प्रकल्पसल्ल्याचे शुल्क वेगळे, बरे का? )
(उपक्रम आणि इतर स्थळांवरील माझ्या मित्रमैत्रिणींनी मी आजवर कशात एवढा व्यग्र होतो, हे आपुलकीने विचारले आहे. ह्या लेखातून त्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आता हे काम मार्गी लागले, की उपक्रम आणि अशाच इतर स्थळांवरील सदस्यंाना पिडण्यासाठी मी मोकळा असेन, तेव्हा ही ऍडव्हान्स वार्निंग समजावी :-)
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

मूळ बातमी
टाटांच्या महासंगणकाविषयी मूळ चर्चाप्रस्ताव येथे वाचा.
- जमशेदजी सर्किट टाटा
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
अभिनंदन
अभिनंदन सर्कीटराव आणि याहू!
बातमी आणि माहीती इंटरेष्टींग आहे. आपल्याकडे याचा चांगला उपयोग करून घेतला जावोत ही मन:पूर्वक इच्छा!
बाकी हडूप शिकायला १००० डॉलर्स + इतर अजून मागितल्यामुळे आम्ही फक्त, "सर्कीटराव, टाटा!" इतकेच म्हणून गप्प बसतो :)
तुम्हाला फुकट !!
अहो, असे टाटा ! म्हणू नका !
तुम्हाला फुकट शिकवू की आम्ही !
काही झालं तरी जुने संबंध आपले..
- सर्किट
(लोकहो, त्या हजार डालर्स नंतर एक ;-) द्यायला विसरलो.. क्षमस्व.. तरीदेखील कुणी देणार असेल, तर आमची ना नाही )
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
याहू!च्या सहकार्याने
>>याहू!च्या सहकार्याने आता भारतातील ख्यातनाम विद्यादानसंस्थांतील संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहे.<<
याहूच्या सहकार्याने म्हणजे काय ? महासंगणक "जलदसंगणन संशोधन केंद्र" इथे ठेवलेला आहे का ?? (म्हणुन याहूच्या सहकार्याने का ?)
उपयोगासाठी पैसे
सदर महासंगणकाच्या उपयोगासाठी संशोधकांना जो खर्च येईल, तो याहू टाटांना देणार आहे.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
अच्छा
मग जरा अजुन माहीती द्या की. भारतातील ख्यातनाम विद्यादानसंस्थांतील संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना विनामूल्य वापरासाठी नक्की काय करायचे? कोणाला गाठायचे?
कृपया नुस्ती वर्तमानपत्रातील "फीलगुड" बातमी नको, पुर्ण माहीती द्यावी.
याहु बरोबर युती काय केली www.crlindia.com संकेतस्थळ झोपले की!!!
अद्याप
अद्याप ह्या प्रकल्पात सहभागी होणार्या सर्व संस्थांची यादी प्रकाशित करणे बाकी आहे. सध्या "आय आय टी, मुंबई" ह्या एका संस्थेचे नाव मी अनौपचरिक रीत्या जाहीर करत आहे.
लवकरच इतर...
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
अभिनंदन.
प्रिय सर्किटराव,
मनपूर्वक अभिनंदन.
एक शंका. आपण शब्दभांडार सारखा स्तुत्य उपक्रम चालवता आणि सोपे सोपे शब्द मराठीत मात्र वापरत नाही? (ऍडव्हान्स वार्निंग = आगावू सूचना, भावी संभाव्य उत्पाताची नांदी, सांभाळ इत्यादी इत्यादी) ( हे सर्व खरडवहीत लिहायला हवे होते असे वाटते पण.. तुमच्या सौजन्याचा लाभ घ्यायची इच्छा टाळता येत नाही).
असो. परत एकदा शुभेच्छा.
आपला,
द्वारकानाथ
माफ करा
आगावू सूचना हा शब्द वापरायला हवा होता.
क्षमस्व.
उत्साहाच्या भरात बोटांतून इंग्रजी शब्द टंकण्यात येतात. हे प्रयत्नपूर्वक टाळायला हवे.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
सूचना
वॉर्निंग = सूचना? सूचना ही बर्याचदा 'नम्र सूचना' असते वॉर्निंग कधीच 'नम्र वॉर्निंग' नसते. वॉर्निंग म्हणजे चेतावनी (हिंदी )बजावणी (मराठी).. 'मी तुम्हाला आधिच बजावून सांगतोय' ही वाक्य रचना अधिक योग्य असावी!!
-----------------------------------------------
शब्दभांडारात शब्द भरताना उत्साहाच्या भरात घाई करू नये.
हडूप्!
हडूप्! असे म्हटल्यावर अगदी हाकलून लावल्यासारखे वाटले. ;-)
हैयो हैयैयो! :-)
अभिनंदन
सर्कीटराव आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन !
ओपन् सोर्स् प्रणालीच्या माहितीकरता $ १००० कशाला ? ते समजले नाही. ह. घ्या . ! :-)
वा!
वा! हे वाचून अतिशय आनंद झाला...
याचा वापर फक्त आय आय टी पुरता मर्यादीत न राहता संगणक शिक्षणातील सर्व संस्थांना लोकशाही पद्धतीने अथवा नंबर लावून मिळावा हीच सदिच्छा!
त्याच प्रमाणे हा संगणक 'काय करू शकतो' व त्याचा 'वापर कसा करून घेता येईल' यावर अजून वाचायला आवडेल.
तसेच ही सूवीधा आता उपलब्ध आहे हे शिक्षण संस्थांना कसे कळवले जाणार आहे?
आपला
गुंडोपंत
धन्यवाद
ह्या प्रकल्पाविषयी, भारतातील अनेक उच्च महाविद्यालयांना आधीच कळवण्यात आलेले आहे.
त्या सर्वांच्या उत्तरांच्या अभिलाषेत आहे.
नुकतेच (गेल्या मंगळवारी) अमेरिकेत सान्ता क्लारा येथे "हडूप" प्रणालीच्या वापरकर्त्यांचे एक संमेलन याहू! ने भरवले होते. सुमारे साडेतीनशे लोक हजर झाले होते. त्यातील फक्त साठ याहू! मधून आले होते.
कळवण्यास आनंद होतो, की याहूने ह्या मुक्त स्रोत आज्ञावलीला दिलेला पाठिंबा, आमच्या मूल प्रतिस्पर्ध्याने, म्हणजे गूगलने देखील प्रतिपाठिंबीत केलेला आहे. अमेरिकेतल्या सहा विद्यापीठांत "हडूप" विषयीच्या अभ्यासक्रमांना गूगलने अर्थपुरवठा केलेला आहे.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?