आनंदवन : काही चित्रे

बाबा आमटेंनी लावलेल्या ह्या छोट्या रोपट्याचा आता झालेला वटवृक्ष. ही छायाचित्रे मी जुलै २००७ मध्ये घेतली आहेत. बाबा तेव्हा आनंदवनातच होते, संध्याकाळी त्यांना एका ढकलगाडीतून त्यांचे सहकारी आनंदवनात फिरवायचे. त्यांचे छायाचित्र काढायचे भान राहिले नाही. क्षमस्व.

धन्यवाद

तुमच्याबरोबर आम्हीही आनंदवन फिरलो.

असेच

तुमच्याबरोबर आम्हीही आनंदवन फिरलो.

असेच म्हणतो

-ऋषिकेश

सहमत आहे.

.

आभार

छायाचित्रे मोठी करून चिकटवल्याबद्दल आभार. मगाशीच पाहिली पण लहान असल्याने नीट दिसत नव्हती.
आनंदवनात कुष्ठरोगी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी खूपच प्रयत्न केलेले दिसतात.
बाबा आमटे यांनी नंतर आनंदवनातील रोजचे काम पुढच्या पिढीवर सोपवले असे कुठेसे वाचले. मला ते पाहून असे वाटले की आज तेथील लोकांच्या त्यांच्या गरजा काळाप्रमाणे तशाच आहेत की बदलल्या आहेत? तुम्हाला काही दिसले असल्यास त्याबद्दल जरूर लिहावे.

भडास

चित्राताई,

बाबा गेले. त्यांच्या सेवाभावावर आजवर जगत आलेल्या आणि पुढेही जगू इच्छिणार्‍यांनी त्यांच्या इच्छेचे पालन वगैरे केले. नाही म्हटले तरी, बरे वाटले.

मुळात ही छायचित्रे मी माझ्या दर दोन वर्षांनी होणार्‍या आनंदवनाच्या भेटीत बदल टिपावे म्हणून केली होती.

असो. सूज्ञांस सांगणे न लगे.

ह्या बदलांविषयी मी (किंवा आनंदवनाशी संलग्न असलेले इतर लोक) सहमत असतीलच असे नाही.

मुळात मुक्तांगण उभारणीत पु. ल. देशपांडे ह्यांच नामनिर्देश होऊ नये, किंवा उत्तरायणात गोंदियाच्या सौ. शालिनी कमलाकर कुलकर्णी ह्यांचा नामनिर्देश न करता पाट्या टाकता आल्या नसत्या का ?

असो.

(आता आनंदवनात मॅक्डॉनल्ड्स ची वाट पाहतोय. त्याचा एकमेव विरोधक बाबा गेला.)

- सर्किट

--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

काम कसे चालले आहे?

कुष्ठरोगाबद्दल इंग्लिशमध्ये लिहीण्यामागचा अर्थही आता समजला असे वाटते. पण जर जमानाच जाहिरातीचा आहे तर काय करणार?
बदल होणारच, मॅक्डोनल्ड सगळीकडे आले तर आनंदवनातच ते येणार नाही असे होणार नाही. (असे पाहून हताश व्हायला होते, पण काही पर्याय नाही अशा निर्णयापर्यंत मी आले आहे). मुख्य पहायचे ते काम कसे चालले आहे आणि आपल्याला काही करता येऊ शकते का.

बस हेच

कुष्ठरोगाबद्दल इंग्लिशमध्ये लिहीण्यामागचा अर्थही आता समजला असे वाटते.

बस. ते छायचित्र घेण्यमागचा हेतू तोच.

आत्तापर्यंत फक्त तुम्हाला कळलाय तो.

पण तुमच्या दुसर्‍या प्रश्नाविषयी. काम कसे चालले आहे ? काम व्यवस्थित आहे. समाजसेवेच्या सध्याच्या व्याख्येनुसार सगळे व्यवस्थित. काही अपंगांच्या प्रॉस्थेटिक लिंब्जवर "स्पॉन्सर्ड बाय, अमुक ढमुक" असे सगळे व्यवस्थित आहे.

पण बाबा गेले काही वर्षे हे पाहण्याच्या परिथितीत नव्हते, हे चांगले झाले.

- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

पण ते चिंचेचे झाड

आनंदवनाच्या सद्यस्थितीविषयी मला आणि आनंदवनाच्या स्नेह्यांना काहीही वाटत असो, वरील छायचित्रांतील एक चित्र मी बाबांचे प्रतिक म्हणून ठेवलेले आहे. ते चिंचेचे झाड मुक्तांगणाच्या बाजूलाच आहे. अंगाला काटे, फळेही अगदी आंबट.. पण त्याच्या भोवती सुंदर काठ बांधलेला.. रोजच्या कामातून वर्कशॉपमधून थकून भागून आलेले महारोगी तिथे बसतात. स्वतःला ही संधी दिली म्हणून बाबांना मनःपूर्व्क धन्यवाद देत..

बाबाचं जीवन सार्थ झालंय, नाही का ?

- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

शंभर टक्के

सार्थ !

धन्यवाद ..

धनंजय यानी अचूक शब्दात मांडलेय् .

धन्यवाद

आनंदवन बघण्याचा योग आजपर्यंत आला नव्हता, तो घडवून आणल्याबद्दल अनेक धन्यवाद.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

चांगली चित्रे

चांगली चित्रे
व नंतरची स्थिती विचार कराय्ला लावेलशी आहे.
गुप्तदान ही जुनी झाली कल्पना हेच खरे.

मागे विकास की प्रकाश कुणीतरी आमटे पम्तप्रधान विधर्भातयेउन तेथे आले नाही म्हणून नाराज झाल्याचे वाचले होते . त्याचा अर्थ लागतो आहे का.

शिवानी

आनन्दवनात जावेसे वाटते आहे

आनन्दवनात जावेसे वाटते आहे