नेहमी पडणारे प्रश्न

मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?

 1. शक्यता-१ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर आहे. उदा. चिंटू लोकसत्तेच्या (आता सकाळच्या) संकेतस्थळावर आहे.

  1. चित्रावर आपल्या मूषकाच्या उजव्या बटनाने टिचकी मारा. त्यानंतर प्रॉपर्टीज वर टिचकी मारा

  2. नवीन उघडलेल्या (प्रॉपर्टीजच्या) खिडकीतून चित्राच्या जागेची(Address/URL) प्रत बनवा (कॉपी करा).

 2. शक्यता-२ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर नाही (कदाचित तुमच्या संगणकावर आहे)

  1. असे चित्र उपलब्ध करून देण्यासाठी ते आधी जालावर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी flickr किंवा तत्सम सेवादात्यांचा वापर करावा

  2. चित्रे जालावर उपलब्ध झाली की 1.1 आणि 1.2 मध्ये सांगितल्याप्रमाणे चित्राची जागा कॉपी करून घ्या

  3. फ्लिकरवर चढवलेल्या चित्राचा दुवा मिळवण्यासाठी,
   1. त्या चित्रावर टिचकी मारा, म्हणजे थोड्या मोठ्या आकारात तेच चित्र असलेले दुसरे पान दिसेल.

   2. त्या चित्रावर असणाऱ्या यादीतील (मेन्यूतील) "ALL SIZES" वर टिचकी मारा.

   3. आता तेच चित्र वेगवेगळ्या आकारात दाखवणारे पान दिसेल.

   4. त्यातील चित्राखाली असलेल्या "Grab the photo's URL"मधील दुव्याची प्रत बनवा (कॉपी करा)

 3. मजकुरात जिथे चित्र चिकटवायचे असेल तिथे कर्सर ठेऊन संपादन खिडकीच्या वर असणार्‍या या बटनावर टिचकी मारावी. त्यानंतर उघडणाऱ्या छोट्या खिडकीत चित्राचा दुवा (Image URL), चित्राचे शीर्षक (Caption), संलग्नता (Alignment, 'right' किंवा 'left' यापैकी आवश्यकतेनुसार), आणि चित्र उपलब्ध झाले नाही तर दाखवायचा पर्यायी मजकूर (Alternate text) या गोष्टी भराव्यात

 4. चित्राचा आकार फार मोठा असेल तर चित्र देताना आकारात बदल करावा. समजा जालावर चढवलेल्या चित्राचा आकार "१२८० x ९६०" इतका आहे. या चित्राची रुंदी ६४८ होण्यासाठी उंची ४८६ इतकी करावी लागेल. त्यासाठी
  <img src="चित्राचा दुवा" width="648" height="486">
  असे लिहा.

विशेष चिन्हे उदा. गणितातील, विज्ञानातील चिन्हे कशी दाखवायची?

जालावर एचटीएमल मधील विशेष चिन्हांची माहिती देणारी बरीच पाने आहेत. उदा. या आणि या पानांवर अश्या चिन्हांची यादी आणि ती दाखवण्यासाठी आवश्यक 'कोड' उपलब्ध आहे. उपक्रमवर अशी विशेष अक्षरे दाखवण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी

काही उदाहरणे पाहा.

<font face=arial>&#946;</font> β
<font face=arial>&#169;</font> ©
<font face=arial>&#8747;</font>
<font face=arial>&#950;</font> ζ